अवकाशातुन जाता जाता

सहज पाहिले मागे वळुनी

मिसळुन गेले साती सागर

पाची खंडे गेली जुळुनी !

अवकाशातुन जाता जाता

पुन्हा पाहिले वळुनी मागे

हिरव्या सुंदर भूगोलावर

झिळमिळणारे निळसर धागे !

अवकाशातुन येता येता

सहज पाहिले आम्ही खाली

खंड खंड उपखंड होऊनी

वसुंधरेची छकले झाली !

पर्वत कसले, भयाण भिंती

नदीनदीचा खंदक होतो

काळे...पिवळे...गव्हाळ...गोरे....

त्यांतहि अपुल्यापुरता जो तो !

अमुच्या ऐसे कुणी बिचारे

असतिल जे ग्रहगोलांवरती

कधी न यावे त्यांनी इकडे

दुरुन साजरी अमुची धरती !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel