सोशल मीडियाच्या बातम्यांवर नजर टाकल्यास वेळोवेळी जलपरी पाहण्याचे दावे करण्यात आले आहेत. अशा दाव्यांमध्ये जावा, पाकिस्तान, ब्रिटिश कोलंबिया आणि अगदी कॅनडातील दोन घटना समाविष्ट केल्या जाऊ शकतात ज्या  व्हेनकूवर आणि व्हिक्टोरियाच्या परिसरात घडल्या होत्या.अलीकडेच भारतातील पोरबंदरजवळील मधुपुरा गावाजवळील समुद्रकिनाऱ्यावर एक जलपरी मृतावस्थेत आढळल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. अनेक घटना घडल्या पण त्या सर्वांमध्ये कितपत तथ्य आहे हे सांगणे कठीण आहे.

शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास जलपरी किंवा जलपरीसारख्या कोणत्याही प्राण्याचे अस्तित्व नाही, तर ती माणसाने निर्माण केलेली केवळ कल्पना आहे. माणसाचा स्वभाव असा आहे की जोपर्यंत तो डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहत नाही तोपर्यंत तो तिच्या अस्तित्वात नसल्याबद्दल संभ्रमात असतो आणि जर जलपरीचं खरंच काही अस्तित्व असेल तर ती एक दिवस आपल्यासमोर नक्कीच येईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel