१ दानपारमिता
प्रथमतः तुम्ही गोरगरीबांना व आंधळ्यां पांगळ्यांना पै पैसा दानधर्म करा. दानानें तुमच्या मनांत कोमल दया उत्पन्न होऊन तुमची उन्नति करील व तुम्हास बोधिमार्गाच्या पहिल्या पायरीजवळ आणील. लहानपणापासून दानधर्माचा अभ्यास केल्यास तशा प्रसंगी लोककार्याला आपला देह देण्यासहि तुम्हास परवा वाटावयाची नाही.
२ शीलपारमिता
तुम्ही दानधर्म पुष्कळ केला; किंबहुना आपला प्राणहि लोककल्याणासाठीं देण्यास तयार झाला; पण तुमचें शील निर्मल नसलें, तर सन्मार्गांत तुमची उन्नति होणार नाहीं. प्राणघातापासून अलिप्त राहणें, खोट्या मार्गानें पैसा न कमावणें, मद्यपानादिक व्यसनापासून दूर राहणें व योग्यकाळापर्यंत ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमांत एकपत्नीव्रत पाळणें ह्याला शील म्हणतात. जिवावर पाळी आली तरी अशा शीलाचा तुम्ही भंग होऊं देतां कामाचा नये. दानधर्म करणें चांगलें; परंतु त्यायोगें तुमचें शील मलिन होत असलें, तर तो न केलेला बरा. लबाडीनें पैसा मिळवून किंवा चोरी करून मोठा दानधर्म करण्यापेक्षां शील परिशुद्ध ठेवून दिलेला पै पैसा अधिक श्रेयस्कर आहे असें समजा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.