‘आणखी काही पाहिजे का?’

‘काही नको.’

‘थोडे पाणी द्याल का?’ ती शेतकरीण म्हणाली.

‘खरेच पाणी द्या आणून.’ रूपा म्हणाली.

‘डब्यात पाणी नाही?’

‘होते ते कधीच संपले. ऊन मी म्हणत आहे. सार्‍यांचे घसे पुन:पुन्हा कोरडे होतात.

‘मी अधिकार्‍याला सांगतो हां.’

‘आणि तुम्ही का बरोबर येत आहात?’

‘हो. मागूनच्या गाडीने. मी तुम्हांला वाटेत गाठीन.’

‘का हो, बारा माणसे उन्हाने मेली, खरे का?’

‘मी बाराचे ऐकलेले नाही; परंतु दोन मी पाहिले.’

‘दुष्ट आहेत मेले. कोणीच का यांना शिक्षा नाही करणार? कोणीच का आमची दाद घेणारे नाही?

‘तुम्हा स्त्रियांपैकी कोणी आजारी नाही ना?

‘पुरूषांपेक्षा स्त्रिया कोणी आजारी नाही ना?

‘पुरूषांपेक्षा स्त्रिया सहनशील असतात. आमच्यापैकी कोणी आजारी नाही. फक्त एकीच्या मनात आताच बाळंत व्हायचे आले. ती पलीकडच्या डब्यात विव्हळत आहे. तिला तेथे उतरवून नाही का घेण्यात येणार? एक स्त्री म्हणाली.

‘तुला काही हवे का, तुम्ही विचारलेत. त्या बाईला येथेच ठेवतील असे काही करा.’ रूपा म्हणाली.

‘आणि माझ्या नवर्‍याची भेट नाही का होणार? ते येणार आहेत मागूनच्या गाडीने.’ त्या शेतकरणीने विचारले.

‘पुरे बोलणे. व्हा चालते.’ एक अधिकारी येऊन म्हणाला.

‘अहो, ती एक स्त्री कैदी बाळंत होत आहे. तिला येथेच उतरवून घ्या. तुरुंगात पाठवा. पुढे केव्हा तिला पाठवा.’ प्रताप म्हणाला.

‘होऊ दे बाळंत. काही हरकत नाही. आम्ही पुढे बघू. आता नाही वेळ.’

तो अधिकारी म्हणाला. गाडीची शिट्टी झाली. स्टेशनातील घंटा वाजली.

‘प्रताप आणि शेतकरणीचा नवरा किसन दोघे तेथे उभे होते. किसनला पत्नीजवळ बोलता आले नाही.

‘प्रतापच्या गाडीला अजून दोन तास अवकाश होता. तो प्लॅटफॉर्मवर उभा होता. इतक्यांत एक कामगार येऊन म्हणाला, ‘तुम्ही का प्रताप?’

‘हो.’

‘तिकडे एक बाई आहेत. त्या तुम्हांला भेटू इच्छितात.’

प्रताप गेला. तो त्याला त्याची बहीण भेटली.

‘तू कोठे इकडे?’ त्याने विचारले.

‘आम्हीही जात आहोत. तू जात आहेस होय ना?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel