पाली भाषेत :-
११
[११. विजयसुत्तं]


१९३ चरं वा यदि तिट्ठं निसिन्नो उद वा सयं।
सम्मिञ्ञेति पसारेति एसा कायस्स इञ्ञना।।१।।

१९४ अट्ठिनहारुसंयुत्तो तचमंसावलेपनो।
छविया कायो पटिच्छन्नो यशाभूतं न दिस्सति।।२।।

मराठीत अनुवाद :-
११
[११. विजयसुत्त]


१९३. चालतांना, उभा असतां, बसला असतां किंवा बिछान्यांत पडला असतां, हा देह संकोच पावतो अथवा पसरतो. ही शरिराची हालचाल. (१)

१९४. हाडें आणि स्नायु ह्यांनीं युक्त व मांसानें आणि त्वचेनें लेपलेला हा काय छबीनें आच्छादल्यामुळें यथार्थतया दिसत नाहीं. (२)

पाली भाषेत :-

१९५ अन्तपूरो उदरपूरो यकपेळस्स वत्थिनो।
हृदयस्स पप्फासस्स वक्कस्स पिहकस्स च।।३।।

१९६ सिंघाणिकाय खेळस्स सेदस्स च मेदस्स च
लोहितस्स लसिकाय पित्तस्स च वसाय च।।४।।

१९७ अथऽस्स नवहि सोतेहि असुचि सवति सब्बदा।
अक्खिम्हा अक्खिगूथको कण्णम्हा कण्णगूथको।।५।।

१९८ सिंघाणिका च नासातो मुखेन वमतेकदा१ (१ म.-वमति एकदा.)
पित्तं सेम्हं च वभति कायम्हा सेदजल्लिका।।६।।

१९९ अथऽस्स सुसिरं सीसं मत्थलुंगस्स पूरितं।
सुभतो नं मञ्ञती२ (२. म.-मञ्ञति.) बालो अविज्जाय पुरक्खतो।।७।।

२०० यदा च सो मतो सेति उद्धुमातो विनीलको।
अपविद्धो सुसानस्मिं अनपेक्खा होन्ति ञातयो।।८।।

२०१ खादन्ति तं सुवाना१ (१ सी.-सुवाणा, रो.-सुपाणा.) च सिगाला च वका किमी।
काका गिज्झा च खादन्ति ये चऽञ्ञे सन्ति पाणिनो२(२ अ., रो., सी.- पाणयो.)।।९।।

२०२ सुत्वान बुद्धवचनं भिक्खु पञ्ञाणवा इध।
सो खो नं परिजानाति यथाभूतं हि पस्सति।।१०।।

२०३ यथा इदं तथा एतं यथा एतं तथा इदं।
अज्झत्तं च बहिद्धा च काये छन्दं विराजये।।११।।

२०४ छन्दरागविरत्तो सो भिक्खु पञ्ञाणवा इध।
अज्झगा अमतं सन्तिं निब्बाणपदमच्चुतं३ (३ म.-निब्बाणं पदमच्चुतं.) ।।१२।।

मराठीत अनुवाद :-

१९५. आंतड्यानें, कोठ्य़ांतील पदार्थांनीं, यकृत्-पिंडांनीं, मूत्राशयानें, हृदयानें, फुप्फुसानें, वृक्कानें आणि प्लीहेनें, (३)

१९६. शेंबडानें, थुंकीनें, घामानें, मेदानें, रक्तानें, लसिकेनें१, (१. हाडांच्या सांध्यांत वंगणासारखा उपयोगी पडणारा द्रव पदार्थ.) पित्तानें आणि वसेनें हा काय भरलेला आहे. (४)

१९७. आणि याच्या नवद्वारांतून सदोदित अशुचि पदार्थ निघत असतात. डोळ्यांतून डोळ्यांचा मळ, कानांतून कानांचा मळ, (५)

१९८. आणि नाकांतून शेंबूड निघतो, आणि मुखांतून एकादे वेळीं ओकतो; पित्त आणि कफ ओकतो. शरीरांतून घाम निघतो. (६)

१९९. आणि याचें पोकळ डोकें मेंदूनें भरलें आहे. अविद्येनें पुरस्कृत असा मूर्ख माणूस ह्या देहाला सुन्दर समजतो. (७)

२००. आणि जेव्हां तो देह मृत होऊन फुगलेला, निळा झालेला, स्मशानांत टाकलेला पडून राहतो, तेव्हां सगेसोयरे त्याची उपेक्षा करतात. (८)

२०१. त्याला कोल्हे, कुत्रे, लांडगे आणि किडे खातात; कावळे आणि गिधाडें खातात, किंवा तसेच इतर प्राणी खातात. (९)

२०२. इहलोकीं बुद्धोपदेश ऐकून ज्ञानवान् भिक्षु अशा त्या देहाला पूर्णपणें जाणतों; कारण तो यथार्थतया पाहतो. (१०)

२०३. जसें हें (माझें शरीर), तसें तें (मृत शरीर); जसें तें, तसें हें; (असें जाणून) आपल्या आणि परक्याच्या शरिराचा लोभ सोडून द्यावा. (११)

२०४. स्नेहलोभापासून विरक्त झालेला तो ज्ञानवान् भिक्षु अमृत-शान्तिरूप अढळ निर्वाणपद पावलेलाच आहे. (१२)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel