पाली भाषेतः-

६५७ पुरिसस्स हि जातस्स कुठारी जायते मुखे।
याय छिन्दति अत्तानं बालो दुब्भासितं भणं।।१।।

६५८ यो निन्दियं पसंसति। तं वा निन्दति यो पसंसियो।
विचिनाति मुखेन सो कलिं। कलिना तेन सुखं न विन्दति।।२।।

६५९ अप्पमत्तो अयं कलि। यो अक्खेसु धनपराजयो।
सब्बस्सापि सहापि अत्तना। अयमेव महत्तरो कलि।
यो सुगतेसु मनं पदोसये।।३।।

६६० सतं सहस्सानं निरब्बुदानं। १छत्तिस च पञ्च च अब्बुदानि१।(१-१ म.-छत्तिंसति पंच च अब्बुदानं.)
यं अरियगरही निरयं उपेति। वाचं मनं च पणिधाय पापकं।।४।।

मराठी अनुवादः-

६५७. मनुष्य जन्मतांच त्याच्या तोंडांत कुर्‍हाड उत्पन्न होत असते, जिच्या योगानें मूर्ख दुर्भाषित वाक्य बोलून तो आपणालाच तोडतो.(१)

६५८. जो निन्द्य माणसाची प्रशंसा करतो, किंवा प्रशंसार्ह माणसाची निंदा करतो, तो आपल्या तोंडानें आपली हानि करतो, व त्या हानीच्या योगें सुख पावत नाहीं.(२)

६५९. जुगारांत पैसा गमावणें ही हानि (कलि) थोडी आहे. पण सुगतांविषयीं मन कलुषित करणें ही स्वत:सह सर्वस्वाची हानि म्हणून फार मोठी हानि होय.(३)

६६०. मन आणि वाचा पापकारक बनवून आर्यांची (साधूंची) निंदा करणारा एक लक्ष निरर्बुद व छत्तीस आणि पांच अर्बुद वर्षे नरकांत पडतो.(४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel