पाली भाषेत :-

९०९ पस्सं नरो दक्खिति नामरूपं। दिस्वान वा ञस्सति१ तानिमेव। (१ नि.-ञायति.)
कामं बहुं पस्सतु अप्पकं वा। न हि तेन सुद्धिं कुसला वदन्ति।।१५।।

९१० निविस्सवादी न हि सुब्बिनायो२। पकप्पितं३ दिट्ठि पुरेक्खरानो। (२ सी., रो.-सुद्धिनायो, सुब्बिनयो.) (३ नि.-पकम्पिता.)
यं निस्सितो तत्थ सुभं वदानो। सुद्धिंवदो४ तत्थ तथद्दसा सो।।१६।। (४ नि.-सुद्धिवदो.)

९११ न ब्राह्मणो कप्पमुपेति संखं। न हि दिट्ठिसारी नऽपि ञाणबन्धु।
ञत्वा च सो सम्मुतियो पुथुज्जा। उपेक्खति उग्गहणन्तमञ्ञे५ ।।१७।। (५ म.-उग्गहणन्तिमञ्ञे.)

मराठीत अनुवाद :-


९०९ असें पाहणारा मनुष्य नामरूप तेवढेंच पाहील, आणि तें पाहून तेवढ्याचेंच त्याला ज्ञान होईल. ते त्याला अल्प किंवा पुष्कळ खुशाल पाहूं द्या. पण तेवढ्यानें शुद्धि होते असें सुज्ञ म्हणत नाहींत. (१५)

९१० आपण कल्पिलेल्या मताचा पुरस्कार करणार्‍याला व हट्टानें वाद करणार्‍याला उपदेशानें वळवितां येणें सोपें नाहीं. ज्या मताचा तो आश्रय करतो, त्यांतच कल्याण व शुद्धि आहे असें म्हणतो; कारण तशीच त्याची दृष्टी आहे. (१६)

९११ पण (खरा) ब्राह्मण सर्व गोष्टी जाणून विकल्पाला - संज्ञेला जात नाहीं. तो दृष्टीला धरून बसत नाहीं, व ज्ञानाचेंहि बंधन होऊं देत नाहीं. तो सामान्य लोकांचीं मतें जाणतो पण त्यांची उपेक्षा करतो. इतर लोक मात्र तीं स्वीकारतात.(१७)

पाली भाषेत :-

९१२ विसज्ज गन्थानि मुनीध लोके। विवादजातेसु न वग्गसारी।
सन्तो असन्तेसु उपेक्खको सो। अनुग्गहो उग्गहणन्तमञ्ञे१ ।।१८।। (१ म.-उग्गहणन्तिमञ्ञे)

९१३ पुब्बासवे हित्वा नवे अकुब्बं। न छन्दगू नोऽपि निविस्सवादो।
स विप्पमुत्तो दिट्ठिगतेहि धीरो। न लिप्पति२ लोके अनत्तगरही३।।१९।।(२नि.-लिम्पति.) (३ नि.-अनत्थगरही.)

९१४ स सब्बधम्मेसु विसेनिभूतो। यं किं चि दिट्ठं व सुतं मुतं वा।
स पन्नभारो मुनि विप्पयुत्तो४। न कप्पियो नूपरतो न पत्थियो ति (भगवा ति)।।२०।।
(४नि.-विप्पमुत्तो.)

महावियूहसुत्तं५  निट्ठितं। (५म.-महाब्यूह.)

मराठीत अनुवागद :-

९१२ मुनि या जगांतील ग्रन्थी सोडून देतो व विवादापन्न लोकांमध्यें कोणताही पक्ष घेत नाहीं. तो अशान्त लोकांत शान्त आणि उपेक्षक होतो, आणि दुसरे आपापल्या मतांचा आग्रह धरीत असतां तो अनाग्रही होतो. (१८)

९१३ तो पूर्वींचे आश्रव सोडून नवे जोडीत नाहीं, छंदानुसार जात नाहीं आणि हटवादीही होत नाहीं. तो आत्मनिंदा न करणारा सुज्ञ सांप्रदायिक मतांपासून मुक्त होतो व या जगांत बद्ध होत नाहीं. (१९)

९१४ जें काहीं दृष्ट, श्रुत किंवा अनुमित - (या सर्व गोष्टींवर त्यानें विजय मिळविल्यामुळें) ह्यापैकीं कशाशींही विरोधीभाव न बाळगणारा तो, भार टाकून देऊन विमुक्त झालेला मुनि विकल्प पावत नाहीं, विरत होत नाहीं आणि (कशाचीहि) याचना करीत नाहीं, असें भगवान् म्हणाला.(२०)

महावियूहसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel