एकदा एक आजोबा त्यांच्या सोसायटीच्या प्ले एरिया मध्ये उदास बसलेले होते. नेहमीप्रमाणे मुले खेळत होती. आजोबा नेहमी त्या मुलांशी चेंडू खेळत असत. कधीमधी त्यांना गोष्टीसुद्धा सांगत असत. आज मात्र आजोबा शून्यात नजर लावून उदास बसले होते.

 

म्हातारे आजोबा उदास बसलेले पाहून मुलांनी विचारले, "आजोबा आजोबा,काय झालं आज इतके उदास का आहात? कसला विचार करताय?"

 

"काही नाही बाळांनो, मी जरा माझ्या आयुष्याबद्दल विचार करतोय!", आजोबा म्हणाले.

 

"आजोबा  आम्हाला तुमच्याबद्दल सांगा ना प्लीज...", मुलांनी आग्रह धरला.

 

आजोबांनी थोडा वेळ विचार केला आणि मग ते म्हणाले, “मी लहान होतो तेव्हा माझ्यावर कोणतीच जबाबदारी नव्हती, माझ्या कल्पनेला मर्यादा नव्हती…. तेव्हा मी संपूर्ण जग सुधरवून टाकण्याचा विचार करायचो...”

 

पुढे मी थोडासा मोठा झालो…माझी बुद्धी थोडी वाढली….मग मला वाटायला लागलं की जग बदलणं हे खूप अवघड काम आहे…म्हणून मी माझं टार्गेट थोडं कमी केलं…जग नाही तर मी किमान माझा देशाला सुधरवून टाकू शकतो असं वाटलं.

 

नंतर मग अजून काही वर्षे लोटल्यावर मी तिशीचा झालो... तेव्हा मला वाटलं देश सुधरवणे ही काही क्षुल्लक गोष्ट नाही… प्रत्येकजण हे करू शकत नाही… मला फक्त माझं कुटुंब आणि जवळची माणसं यांना सुधरवू दे…

 

पण खरं सांगू मला तेही करता आले नाही.

 

आणि आता माझं वय झालंय. मी काही वर्ष नाही तर काही दिवसांसाठीच या जगात राहणार आहे, तेव्हा मला जाणवतय की जर मी स्वतःला सुधरवण्याचा विचार केला असता तर मी नक्कीच ते काम नक्कीच करू शकलो असतो… आणि कदाचित मला सुधारलेले पाहून माझे कुटुंब बदलले असते… आणि कुणास ठाऊक त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन हा देशही थोडा सुधरला असता… आणि मग कदाचित मी हे जग सुधरवू शकलो असतो!”

हे सांगताना आजोबांचे डोळे पाणावले होते आणि ते हळूच म्हणाले

 

 “मुलांनो! माझी चूक करू नका...काहीही सुधरवण्यापूर्वी स्वतःमध्ये बदल घडवून ...बाकी सर्व आपोआप बदलेल.

 

जग बदलण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे, पण त्याची सुरुवात स्वतःपासून होते. इतर काहीही बदलण्याआधी, आपण स्वतः बदलायला हवे...आपल्याला स्वतःला तयार करावे लागेल...आपल्यातील कौशल्य बळकट करावी लागतील...आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवावा लागेल...आपल्याला पक्का निर्धार  करावा लागेल...आणि तरच आपण प्रत्येक गोष्टीत सक्षम होऊ शकू यशस्वी होऊ शकू. आणि आपल्याला हवा असलेला बदल खरोखर घडवून आणू शकू.  

मित्रांनो, महात्मा गांधींनी हे तत्त्वज्ञान अतिशय प्रभावीपणे सांगितले आहे...

 

Be the change that you want to see in the world.

 

तर आजपासून आपण स्वतःच तो “बदल” बनू जो आपल्याला जगात करायचा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel