नमस्कार मित्रहो मी संदीप पुणेकर हि कथा एक सत्यघटना आहे आणि मी त्या घटनेचा साक्षीदार, आजच्या युगात अश्या काही गोष्टी कोणीच मानत नाही किंबहुना तसा आता नवीन कायदा पण निघाला आहे , सदर घटना पोलादपूर काशेदी गावामध्ये घडलेली आहे. गेल्या आठवड्यात मी माझ्या केसेससाठी कोर्टात गेलो होतो. अजून कोर्ट सुरु होण्यासाठी १५ मिनिटे होती. तेथे बसल्या बसल्या सहज विचारपूस म्हणून मी बाजूच्या बसलेल्या माणसाला मी त्याच्या केस बद्दल विचारले...
एक साठ वर्षाचा माणूस होता तो...
सोबत त्याची बायको आणि २५ वर्षाचा सडपातळ असा त्याचा मुलगा. सुनेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली तिच्या संशयात तिच्या घरच्यांनी आमच्यावर केस केली आहे. मुलगी शिकलेली होती. आणि एकदा सकाळी ती शौचास गेली आणि खूप वेळ झाला ती परतलीच नाही. आणि आम्ही जेव्हा जाऊन तिचा शोध घेतला.. तेव्हा गावाबाहेर असलेल्या विहिरीच्या बाजूला आम्हाला तिच्या चपला भेटल्या...
तेव्हा तेथे गावातील लोक जमा झाले व पोलिसांनी ती बॉडी पोस्टमोर्टम ला पाठवली.. नंतर पोलिसांनी घराची झडती घेऊन काही सुसाईड नोट किवा इतर काही पुरावा मिळतो का ते पाहिले...
पण त्यांना काहीच हाती लागले नाही.. पोस्टमोर्टममध्ये पण कोणत्याच प्रकारची मारहाण किवा अंगावर जखम दिसून आली नाही.शेवटी माहेरच्या लोकांनी संशयाने सासू सासरा आणि नवऱ्याला कस्टडी करायला लावली.. जेव्हा घटना घडली तेव्हा नवरा पुण्यात होता.. आणि तो तिकडेच जॉब करतो. फक्त महिन्यातून काही दिवसच तो कुटुंबाला भेटायला येतो. पोलीस लोकांनी त्याचा चांगलाच पाहुणचार केला तरी काहीच निष्पन्न झाले नाही नवऱ्याचा चेहरा पाहिला जात नव्हता तो इतका त्रासला होता.. आणि त्यात भर म्हणून रात्री त्यांच्या पैकी कोणाला झोप येत नव्हती कोणीतरी गळा दाबतय असे चित्र विचित्र स्वप्न त्यांना पडत होत , आणि कोर्टाचा सासेमेरा मागे लागला होता ...
शेवटी त्यांना मी एका ठिकाणचा पत्ता दिला.. आणि ती लोक त्या महाराजकडे गेली.. त्या महाराजाने त्यांच्या पद्धतीने माहिती घेतली...
आणि त्यांना सांगितले कि, त्यांची मेलेली सून हि "शेंदरी जखिण " झाली आहे. आणि तीच तुम्हाला त्रास देतेय व अजून काही प्रॉब्लेम सांगितले...
आणि एक महिन्याचा गुण दिला...
आणि त्या लोकांना खरच गुण आला...
सर्व स्वप्न बंद पडली...
आणि सर्व वाईट प्रकार देखील...
समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel