काही क्षणांच्या शांततेनंतर रोहिदास म्हणाला,

“सर्व छायाचित्रे पाहिल्यानंतर त्याच्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाची किंवा पुनर्जन्माची शक्यता संपुष्टात आली आहे. आता नवीन स्पष्टीकरण काय आहे? ”

काही क्षणांच्या शांततेनंतर, KGB म्हणाली,

“टाइम ट्रॅव्हल!” हे बोलताना ती लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघत होती. तिचे सर्व लक्ष तिच्या  उपकरणांवर होते.

“काय मूर्खपणा आहे! टाइम ट्रॅव्हल ही एक निव्वळ कल्पना आहे. काळ स्थिर नसतो की त्यात तुम्ही पुढे किंवा मागे जाऊ शकता. भूतकाळ हा भूतकाळ आहे आणि भविष्य अजून साकार झालेले नाही.” अभिषेक KGB चे म्हणणे खोडून काढत म्हणाला. परंतु  KGB ने त्याच्याकडे सपशेल  दुर्लक्ष केले.

डॉ.मेहता सर्वांना उद्देशून म्हणाले,

“रोहिदासच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःला अनंत म्हणवणारा हा मनुष्य स्वत: विष्णू गुप्त होता जे चाणक्याचे दुसरे नाव आहे आणि चंद्रगुप्त म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून मौर्य साम्राज्याचे सम्राट चंद्रगुप्त मौर्य! मला तर अनंतवर पूर्ण विश्वास आहे असे म्हंटले तर आता मला या विषयावर तुमचे मत जाणून घ्यायचे आहे.

"डॉ. मेहता, तुम्ही डॉक्टर आहात. या सगळ्यावर तुमचा विश्वास कसा असू शकतो? ” डॉ.सोनाली संतापल्या होत्या.

“ठीक आहे, डॉ. सोनाली पर्रीकर, मग कृपया तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढे जा आणि KGB ने शोधलेल्या कागदपत्रांमध्ये या सर्व लोकांची आणि त्यांच्या वडिलांची एकच चेहरा असलेली ओळख तार्किकदृष्ट्या योग्य आहे कशी आहे ते सिद्ध करा.” डॉ.मेहता रोखठोकपणे म्हणाले आणि  डॉ. सोनाली पर्रीकर अवाक झाल्या होत्या.

“सर, अनंत महाकाल यांनी सांगितलेला श्लोक मूळचा चाणक्याचा आहे.” KGB अजूनही तिच्या शोधात व्यस्त होती.

"चाणक्याचा भूतकाळ काय आहे?" अभिषेकने विचारले.

डॉ. मेहता काही बोलायच्या आधीच रोहिदासने उत्तर दिले,

“चाणक्यचा जन्म इसवी सन पूर्व ३५० मध्ये झाला होता असे मानले जाते. पण हा वादाचा मुद्दा आहे आणि त्याच्या जन्माबाबत अनेक कथा प्रचलित आहेत.

बौद्ध ग्रंथानुसार तक्षशिला हे त्यांचे जन्मस्थान आहे.

जैन धर्मग्रंथांमध्ये त्यांना द्रमिला म्हटले गेले आहे, याचा अर्थ ते दक्षिण भारतातील मूळ रहिवासी.

एका जैन मान्यतेनुसार, चाणक्याचा जन्म गोला प्रदेशातील चाणक गावात ब्राह्मण चनिम आणि त्याची पत्नी चनेश्वरी यांच्या पोटी झाला.

तर दुसरीकडे, त्याच्या वडिलांचे नाव चणक होते आणि चाणक्य हे नाव त्याच्या वडिलांच्या नावावरून पडले असे इतर स्त्रोतांचे मत आहे.

काही स्त्रोतांनुसार, चाणक्य हा उत्तर भारतात राहणारा ब्राह्मण होता. ते वेदांचे पंडित आणि भगवान विष्णूंचे भक्त होते.

जैन वृत्तांनुसार, त्यांनी चंद्रगुप्त मौर्याप्रमाणे वृद्धापकाळात जैन धर्म स्वीकारला होता.”

रोहिदास सांगत होता आणि सर्वजण ऐकत होते.

“चाणक्य एक भारतीय शिक्षक, तत्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकीय सल्लागार होते. त्यांना पारंपारिकपणे कौटिल्य किंवा विष्णू गुप्त म्हणून ओळखले जाते, ज्यांनी 'अर्थशास्त्र' हा प्राचीन भारतीय राजकीय ग्रंथ लिहिला. त्यांना भारतातील राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांचे कार्य आधुनिक अर्थशास्त्राचे उगमस्थान मानले जाते. गुप्त साम्राज्याच्या उत्तरार्धात त्यांचे कार्य नामशेष झाले आणि इसवी सन १९१५ पर्यंत त्यांचा शोध लागला नाही.”

रोहिदासने कथन केलेले चाणाक्याचे वर्णन सर्वांनी लक्षपूर्वक ऐकले. नंतर KGB तिच्या लॅपटॉपवरून त्याच्याविषयी अधिक माहिती वाचून पुढे म्हणाली,

“सुरुवातीला चाणाक्य तक्षशिला विद्यापीठात शिक्षक होता. चाणक्याने पहिला मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्याला सत्तेवर येण्यास मदत केली होती. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचे श्रेय त्याला मोठ्या प्रमाणावर दिले जाते. चाणक्यने दोन्ही सम्राट, सम्राट चंद्रगुप्त आणि त्याचा मुलगा सम्राट बिंदुसार यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम केले होते. एका वदंतीनुसार, चाणक्य यांनी वानप्रस्थ स्वीकारला होता, तिथे त्यांचा उपासमारीने मृत्यू झाला.

हेमचंद्राने लिहिलेल्या दुसऱ्या आख्यायिकेनुसार चाणक्याचा मृत्यू बिंदुसाराचा मंत्री सुबंधू याच्या कारस्थानामुळे झाला. त्याला चाणक्य आवडत नव्हते. त्याने बिंदुसाराला सांगितले की, चाणक्य त्याच्या आईच्या मृत्यूला जबाबदार आहे. बिंदुसार भयभीत आणि क्रोधीत झाला.  जेव्हा चाणक्यला समजले की राजा आपल्यावर रागावला आहे, तेव्हा त्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

जैन परंपरेनुसार त्यांनी काहीही न खाता किंवा न पिता उपाशी राहून मरण पत्करले. दरम्यान, जेव्हा राजाला कळले की चाणक्य त्याच्या आईच्या मृत्यूला जबाबदार नाही, तो एक अपघात आहे, तेव्हा त्याने सुबंधूला चाणक्यला संथारा म्हणजे उपोषण सोडण्यास मनधरणी करण्याचा आदेश दिला. याउलट सुबंधूने चाणक्याच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आखला. त्याला चाणक्याला जिवंत जाळायचे होते. परंतु चाणक्यच्या मृत्यूचा निश्चित उल्लेख सापडत नाही.”

पुढे अभिषेक म्हणाला,

"याचा अर्थ चाणक्यचा मृत्यू देखील अस्पष्ट आहे!"

“चाणक्य हा भारतातील एक महान विद्वान म्हणून ओळखला जातो. संपूर्ण उपखंडाची अखंड भारत अशी कल्पना करणाऱ्या पहिल्या व्यक्तींमध्ये अनेक राष्ट्रवादी त्यांची गणना करतात. भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिव शंकर मेनन यांनी चाणक्याच्या 'अर्थशास्त्रा'च्या स्पष्ट आणि नेमक्या नियमांची प्रशंसा केली आहे, जे आजही लागू होतात." KGB तिच्या स्क्रीनवर वाचत होती.

“पण अनंत महाकाळ यांनी सांगितले होते की त्यांनी या दोन्ही सम्राटांचा  सल्लागार म्हणून काम केले होते. आणि आजही तो जिवंत आहे सुमारे दोन अडीच हजार वर्षांचा नंतर . काय बकवास!" डॉ.सोनाली पर्रीकर संतप्तपणे म्हणाल्या.

“मी तर असे म्हणेन की तो वेगवेगळ्या युगांबद्दल बोलत आहे. कुठेतरी त्याने गावलगनचा मुलगा संजय आणि हस्तिनापूरचा मंत्री विदुर यांचाही  नावे उल्लेख केला होता.” अभिषेक त्याच्या मानभावी शैलीत बोलला.

"युग? अभिषेक, आम्हाला समजेल अशा भाषेत बोल." KGB उपहासात्मकपणे म्हणाली.

"बाळ KGB, तुला हे समजणे शक्य आहे असे मला तरी वाटत नाही" अभिषेक आणखीनच उपरोधिकपणे स्मितहास्य करत म्हणाला.

"तरीही, ‘अभिषेकजी’ तुम्ही आम्हाला समजावून सांगितले पाहिजे."

डॉ.सोनाली पर्रीकर यांनी मध्यस्थी केली. आता डॉ.सोनाली आणि KGB अभिषेक पुढे बोलण्याची वाट पाहत होत्या.अभिषेक आता अधिक रस घेऊन कथन करू लागला.

"हिंदू पुराणानुसार, काळाची चार युगांमध्ये विभागणी केली जाते-

सत्ययुग

त्रेतायुग

द्वापारयुग

कलियुग.”

सोनाली पर्रीकरने मानेने होकार दिला आणि विचारले  

"जर हा सिद्धांत असेल, तर या प्रत्येक युगात अंदाजे किती वर्षे आहेत?"

सोनाली पर्रीकरच्या प्रश्नांना उत्तर देताना अभिषेकने पेन आणि कागद उचलला आणि लिहायला सुरुवात केली,

“श्रीमद्भगवद्गीता, जो युगांचे वर्णन करणारा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे त्यातील वर्णनानुसार सत्ययुगाचे वय देवतांच्या ४,८०० वर्षांच्या बरोबरीचे आहे; त्रेतायुग ३६०० वर्षे आहे; द्वापार युग २४०० वर्षे आणि कलियुग देवतांच्या १२०० वर्षांच्या बरोबरीचे आहे.

एक देव वर्ष हे ३६० मानवी वर्षांच्या बरोबरीचे आहे आणि हे चार युग ४:३:२:१  च्या गुणोत्तरात आहेत. म्हणून युगांचा कालावधी खालीलप्रमाणे आहे.

४००० + ४०० + ४००  = ४८०० दिव्ययुगे (= १७२८००० मानवी वर्षे) = १ सत्ययुग

३००० + ३०० + ३०० = ३६०० दिव्ययुगे (= १२९६०००मानवी वर्षे) = १ त्रेतायुग

२००० + २०० + २०० = २४०० दिव्ययुगे (= ८६४००० मानवी वर्षे) = १  द्वापार युग

१००० + १०० + १००= १२०० दिव्ययुगे (= ४३२००० मानवी वर्षे) = १ कलियुग

कलियुग पूर्ण होण्याचा कालावधी आजपासून ४२७०० वर्षे आहे, याचा अर्थ कलियुगाची केवळ ५००० वर्षे झाली आहेत.

वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि भक्तांना जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णू वेळोवेळी अवतार घेतात आणि वर उल्लेख केलेल्या ४:३:२:१ चे गुणोत्तर समयानुपात देखील भगवान विष्णूचे दहा अवतार सूचित करतात, ज्यांना 'दशावतार' देखील म्हणतात.

विष्णूचे पहिले चार अवतार सत्ययुगात प्रकट झाले होते, त्यानंतर त्रेता युगामध्ये तीन अवतार, द्वापर युगामध्ये दोन आणि दहावा अवतार सध्याच्या कलियुगात प्रकट होईल. कलियुगाचा शेवट 'कल्कि अवतार' या अवताराने होईल असे म्हटले जाते, जो दुष्टांचा अंत करेल, सज्जनांना मुक्त करेल आणि पुन:श्च नवीन सत्ययुगाची सुरुवात करेल.पूर्वापार मान्यतेनुसार, सत्ययुगात भगवान विष्णूची उपासना हे आत्मसाक्षात्काराचे साधन होते. या काळातील बहुतेक लोक चांगुलपणाचे प्रतीक होते.

त्रेतायुगात, मनुष्याने आपले ज्ञान आणि सामर्थ्य सार्वभौमिक आणि ऐहिक आकर्षणाच्या गुणांमध्ये वाढवले, जे सकारात्मक, नकारात्मक आणि तटस्थ ऊर्जा आणि सर्जनशील आकर्षण आणि प्रतिकर्षणाचे दोन ध्रुव आहेत. या युगात लोक धर्म आणि नैतिक जीवनपद्धतींचे अनुसरण करीत होते.मात्र, सत्ययुगाच्या तुलनेत या युगात दैवी गुणांची एक चतुर्थांश घट झाली. रामायणातील प्रमुख पात्र प्रभू श्री राम याच कालखंडात वास्तव्य करत होते.

द्वापर युगात देवळात देवपूजा करणे हे आत्मसाक्षात्काराचे साधन होते. या कालावधीपर्यंत दैवी गुण ५० टक्क्यांनी कमी झाले होते.

आपण कलियुगात राहतो, अशुद्धता आणि दुष्टतेने भरलेल्या जगात. आनंदी गुण असणारे लोक दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. पूर, दुष्काळ, लढाई, गुन्हेगारी, कपट आणि फसवणूक हे या युगाचे वैशिष्ट्य आहे. परंतु याच युगात अंतिम मुक्ती मिळू शकते असे शास्त्र सांगते.

असे भाकीत केले जाते की कलियुगाच्या शेवटी भगवान शिव विश्वाचा अंत घडवून आणतील आणि सर्व भौतिक पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होईल. अशा विघटनानंतर, भगवान ब्रह्मा जगाची पुनर्निर्मिती करतील आणि मानवजात पुन्हा एकदा 'सत्याचे प्रतीक' बनेल.

"या युगांमध्ये काय फरक आहे थोडक्यात सांग?" डॉ.सोनाली.

“सत्ययुगात देवांचे जग आणि दानवांचे जग या दोन जगांत संघर्ष झाला होता. असुरांचे जग, त्याच्या दुष्टतेमुळे, एक वेगळेच जग होते.

त्रेतायुगात राम आणि रावण यांच्यात लढाई झाली. देव आणि दानव या दोघांनी दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्य केले, परंतु ते एकाच जगात पोहोचले होते.

द्वापरयुगातील युद्ध पांडव आणि कौरवांमध्ये झाले होते. ते असे युग होते ज्यात चांगले आणि दुष्ट एकाच कुटुंबात होते आणि त्यांच्यात संघर्ष होता.

प्रत्येक युगात हळू हळू दुष्ट चांगल्याच्या  जवळ येत गेले - प्रथम एकाच जगात, नंतर एकाच राज्यात आणि नंतर एकाच कुटुंबात!

“तुम्हाला माहीत आहे का? कलियुगात दुष्टता कुठे आहे? आपल्या आतच आहे. चांगलं आणि वाईट दोन्ही आपल्यातच राहतात. कोण जिंकणार? आपल्यातील चांगले किंवा वाईट काय विजयी होईल? हे द्वंद्व महायुद्ध आपल्या प्रत्येकाच्या मनात होणार आहे.”

सोनाली पर्रीकर यांनी त्याच्याकडे पाहिलं त्यांचे मन विचलित झाले होते.

"हा काय प्रकार आहे आणि आपण नक्की काय काम करत आहोत हे कोणी मला सांगू शकेल का? तुम्हा सर्वांचे लक्ष हरवून बसले आहे. या गोष्टी..भाकडकथा. हे सगळं अशक्य आहे आणि असंही या पौराणिक कथांना वास्तवाचा काही एक आधार नाही.” डॉ. सोनाली पर्रीकर कडाडल्या.

“असं कोण म्हणतं?” अभिषेकने विचारले.

"विज्ञान! विज्ञान म्हणते असे! तुझे कीर्तन पूर्ण झालं न कि सांग, आपण पुन्हा काम करूया जे करायला आपण आपल्या घरापासून हजारो किमी दूर इथे आलो आहोत."

डॉ. सोनाली पर्रीकर अशा भडकल्यानंतर, अभिषेकने नेमके उलट बोलेपर्यंत खोलीत काही क्षण शांतता पसरली होती.

“हे सर्व केवळ कीर्तन किंवा कथा नाहीयेत, हा आपला वारसा आहे. हा आपला भूतकाळआहे. आणि सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने ते सत्य आहे. विज्ञानापेक्षा वर काहीच नाही असे वाटते का तुम्हाला? मला आपणास एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, तुमच्या विज्ञानाने सूर्य आणि शक्तीमधील अंतर कधी शोधून काढले?"

डॉ. सोनाली पर्रीकर निरुत्तर होत्या. दुसरीकडे, KGB ने आपले तपासकौशल्य अतिशय वेगाने दाखवून दिले. Google वर काही क्लिक केल्यानंतर ती अभिमानाने म्हणाली,

“सतरावे शतक! जिओव्हानी कॅसिनी आणि जीन रिचर्ड यांनी सूर्य आणि शक्ती यांच्यातील अंतर निश्चित केले होते – १४० दशलक्ष किलोमीटर, सध्याच्या अधिकृत आकडेवारीपासून फक्त ९ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे."

अभिषेक लगेच म्हणाला,

"हनुमान चालिसा मध्ये एक श्लोक आहे

युग सहस्त्र योजन पर भानु

लील्यो तही मधुर फल जानू”

त्याने मार्कर उचलला आणि व्हाईट बोर्डवर काहीतरी लिहायला सुरुवात केली.

"येथे एक युग १२,०००  वर्षांच्या बरोबरीचे आहे. त्याचप्रमाणे १ सहस्त्र = १,००० आणि १ योजना = ८ मैल.

युग × सहस्त्र × योजना = पर भानु, याचा अर्थ –

१२,००० × १,००० × ८ मैल म्हणजेच ९,६०,००,००० मैल.

मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की

१ मैल = १.६३ किमी आणि

९,६०,००,००० मैल = ९,६०,००,००० × १.६३ किमी,

जे सूर्यापासून अंदाजे १५.३ कोटी किलोमीटर अंतरावर आहे.”

त्याला तोंडपाठ असलेले गणित त्याने फळ्यावर मांडून दाखवले.

सगळे आश्चर्यचकित होऊन एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. डॉ मेहता पुन्हा त्यांच्या खुर्चीकडे सरकले. अभिषेक व्हाईट बोर्डवर लिहिण्यात व्यस्त होता. डॉ. मेहता बसल्यानंतर अभिषेक पुढे म्हणाला,

“एवढेच नाही तर वेदांमध्ये ब्रह्मांड, ग्रह आणि इतर घटनांचे तपशीलवार वर्णन आधुनिक सभ्यता अस्तित्वात येण्यापूर्वीच त्या काळातील लोकांचे प्रचंड ज्ञान दर्शवते उपस्थित. सायना या वैदिक तज्ञाने इसवी सनाच्या चौदाव्या शतकात प्रकाशाचा वेग शोधून काढला होता.

त्यांच्या विधानाच्या भाषांतरानुसार,

‘अर्ध्या निमेषात २,२०२ योजनांचा प्रवास करणाऱ्या सूर्याला मी आदरपूर्वक नमस्कार करतो.’

आता मी तुम्हाला पुन्हा काही प्रसंग दाखवतो.”

व्हाईट बोर्डकडे बोट दाखवत तो म्हणाला.

“१ योजन म्हणजे अंदाजे ९ मैल

निमेष म्हणजे १ सेकंदाचा १६/७५ आहे.

त्यामुळे

२२०२ योजन × ९ मैल × ७५/८ निमेष हे १८५,७९४ मैल प्रति सेकंद

इतके आहे, जे १८६,२८२.३९७ मैल प्रति सेकंद या वास्तविक मूल्याप्रमाणे उल्लेखनीय आहे.

खरं तर, ऋग्वेद ऋचा क्रमांक ५.४०.५ मध्ये एक श्लोक आहे, ज्याच्या अर्थानुसार,

'हे सूर्या! जेंव्हा तुमच्या स्वतःच्या प्रकाशाने चंद्र प्रकाशित होतो त्याद्वारे तुम्हाला रोखले जाते, तेव्हा शक्ती अचानक अंधारमय होते.’

हे सूर्यग्रहणाचे अतिशय अचूक वर्णन आहे. मार्कर टेबलावर ठेवून, त्याने दीर्घ श्वास सोडला, जणू त्याच्या खांद्यावरून ओझे हलके झाले आहे. सर्वजण लक्षपूर्वक ऐकत होते आणि अभिषेक आपले ज्ञान प्रदर्शित करत  होता,

“तुम्ही विमानाचा शोध लावलेल्या दोन भावांना ओळखता का?”

"राईट ब्रदर्स!" KGB ने लगेच उत्तर दिले.

अभिषेकने होकारार्थी मान हलवली. तो म्हणाला  

“राइट ब्रदर्सने एकोणिसाव्या शतकात विमानाचा शोध लावला खरा  तथापि, आपण ज्याला ‘विमान’ म्हणतो त्याचे तपशील, यांत्रिकी आणि कार्यप्रणालीचे वर्णन शतकानुशतके आपल्या पौराणिक कथांमध्ये केले गेले आहे. किंबहुना 'रामायणा’ मध्येही पुष्पक विमानाचे वर्णन आहे. 'महाभारता'च्या द्रोणपर्वानुसार, विमानाचा उल्लेख गोलाकार वाहन असा आहे, जे पारा धातुमधून उत्सर्जित होणाऱ्या वाफेच्या साहाय्याने उच्च वेगाने उडू शकत होते.

इतकेच नाही तर विमान शास्त्रात महर्षी भारद्वाज यांनी ज्या विमानाचे वर्णन केले आहे, ते आपल्या सध्याच्या पिढीच्या विमानापेक्षाही खूप प्रगत आहे."

अभिषेकच्या समजावण्याच्या पद्धतीने खोलीतील प्रत्येकजण रोमांचित झाला होता. सोनाली पर्रीकर मात्र अजूनही प्रभावित झाल्या नाहीत. कसलीही तमा न बाळगता हसत त्या म्हणाल्या,

“किती दिवस हा मूर्खपणा सहन करावा लागणार आहे?”

खोलीत पिन-ड्रॉप सायलेन्स पसरला. रोहिदास त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला,

“हा मूर्खपणा नाही. मी विज्ञानावर शंका घेत नाही; पण तुम्हाला हेही मान्य करावे लागेल की आपल्या धर्मग्रंथात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची शतकानुशतके विज्ञानाला कल्पनाही नव्हती. तुम्ही डॉक्टर आहात ना? मला खात्री आहे की तुम्हाला 'सुश्रुत संहिता' या ग्रंथा बद्दल माहिती आहे?”

त्याने डॉ. सोनाली पर्रीकर यांना विचारले आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली.

KGB ने पटकन काहीतरी टाईप करत उत्तर दिले,

“हो, मलाही माहित आहे. हे सर्जिकल सायन्सवरील सर्वात जुने, सर्वोत्तम आणि उत्कृष्ट भाष्यांपैकी एक आहे. सुश्रुत यांनी लिहिलेला जगातील हा पहिला वैद्यकीय ज्ञानकोश आहे. सुश्रुत एक प्राचीन भारतीय शल्यचिकित्सक होते, ज्यांना 'शल्यचिकित्सा जनक' म्हणजेच पायोनियर ऑफ सर्जिकल सायन्स’ म्हणून ओळखले जाते. वाराणसी येथे सक्रिय असलेले ते मूळचे दक्षिण भारतीय वैद्य होते. त्यांच्या नावाचा पहिला उल्लेख बॉवर शिलालेखांमध्ये चौथे ते पाचवे शतक या दरम्यान केलेला आढळतो, जेथे हिमालयात राहणाऱ्या दहा ऋषींमध्ये सुश्रुता यांचे नाव गणले जाते. वाराणसीमध्ये त्यांनी साक्षात चिकित्सादेवता धन्वंतरी कडून शस्त्रक्रियेचे ज्ञान शिकून घेतल्याचे भारतीय ग्रंथांमध्येही नमूद आहे.”

एक समर्थक मिळाल्याने अभिषेकला आता आत्मविश्वास वाटत होता. त्यांनी डॉ. मेहता यांच्याकडे पाहिले, ते अतिशय लक्षपूर्वक ऐकत होते. सोनाली पर्रीकर अजूनही साशंक होत्या. KGB  मात्र या वादाचा आनंद लुटत होती.

डॉ.मेहता आपल्या खुर्चीवरून उठून उभे राहिले आणि सर्वांकडे बघत काही वेळाने म्हणाले,

“जरी मला पौराणिक कथांबद्दल फारशी माहिती नसली तरी, विज्ञान आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या आगमनापूर्वी प्राचीन उपचार पद्धती सुरू झाल्या या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.

एका वैज्ञानिक जर्नलमध्ये असे जाहीर करण्यात आले होते की, जिवंत मानवी दात छेदल्याचा पहिला आणि जुना पुरावा मेहरगढ येथे सापडला आहे. ७५०० ते ९००० वर्षांपूर्वी मेहरगढ येथील एका स्मशानभूमीत नऊ प्रौढ व्यक्तींच्या ११ दाढांमध्ये छिद्र पाडल्याचे पुरावे सापडले आहेत. हाडांच्या शस्त्रक्रियेचे पुरावे देखील सापडले, ज्यावरून असे दिसून आले की शस्त्रक्रिया तंत्रे आणि साधने प्राचीन भारतात अस्तित्वात होती. खरं तर, आयुर्वेदात भूलनाशक द्रव्य औषधी वनस्पतींपासून बनवले जात होते.”

तर दुसरीकडे डॉ.चंदावरकर आपल्या कार्यालयात बसून फोनवर बोलत होते. ते ज्या व्यक्तीशी बोलत होते त्याला ते 'सर' म्हणून संबोधत होते. डॉ.चंदावरकरांना फोनवरून काही आदेश दिले जात होते, असे भासत होते. प्रयोगशाळेच्या आणि इतर सर्व सदस्यांच्या सुरक्षेबाबत त्यांनी ‘सर’ यांना आश्वासन दिले. त्यानंतर टीम मधील इतर सदस्यांच्या सूचनांकडे लक्ष देणेही का महत्त्वाचे आहे हे त्यांनी स्पष्ट केले! शेवटी, चंदावरकर म्हणाले,

“धन्यवाद सर!” आणि त्यांनी फोन ठेवला.

पुढचे सेशन सुरू झाले.

क्रमश:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel