एकदा रात्री एक कोल्हा एका मुखवटे विकणार्याच्या दुकानात शिरला. तेथे खूप मुखवटे होते. त्यातील एकावर पाय ठेवून त्याच्याकडे नीट पाहात तो म्हणाला, 'हे डोकं फारच सुंदर दिसतं. खरं पण ह्यात रक्त नाही, मांस नाही व मेंदूही नाही. हे केवळ थट्टेच्या उपयोगी आहे !'
तात्पर्य
- ज्याला ज्ञान नाही त्याचे सौंदर्य थट्टेला पात्र होते. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.