आणि नंतर त्याचा अध:पात झाला; स्वत:च्या फाजील महत्त्वाकांक्षेमुळेंच त्याचा नि:पात झाला. आपल्या साम्राज्यांत रशिया व इंग्लंड यांचाहि समावेश करावयाला तो उत्सुक होता; म्हणून सहा लाख सैन्य घेऊन तो मॉस्कोवर स्वारी करण्यास निघाला, पण पुढें कित्येक महिन्यांनंतर कांहीं हजर दरिद्री, भिकार, मरतुकड्या, नि:सत्त्व व निरुत्साही शिपायांसह पराभूत होऊन परत आला. त्याला जय मिळत होते तोंपर्यंत त्याच्या यशोज्योतीभोंवतीं पतंगाप्रमाणें मरण्यास ते तयार होते. पण मॉस्कोहून ही जी अनर्थकारक पिछेहाट झाली तिनें फ्रेंचांचे डोळे उघडले. नेपोलियन हा जगाला दिपवूं पाहणारा एक शुध्द वेडपट आहे हें त्यांनीं ओळखलें. त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या रोगानें लाखों तरुण शिपायांना नाहक मृत्युमुखांत लोटलें होतें. नेपोलियननें पुन: असला कांहीं खोडसाळपणा करूं नये म्हणून त्याचे देशबांधव व्यवस्था करूं लागले. या मूर्खपणाला आळा बसला पाहिजे असें त्यांना वाटूं लागलें. म्हणून त्यांनीं त्याला एल्बा वेटावर हद्दपार केलें. पण तो अकरा महिन्यांनीं तेथून निसटला व स्वत:च्या वेड्या व चढाऊ लष्करशाहीनें पुन: एकदां जगांत दरारा बसविण्याची खटपट करूं लागला. तथापि सुदैवानें या वेळचें त्याचें हत्याकांड अल्पायुषी ठरलें. ही खुनाखुनी, ही लूटमार, फार दिवस चालली नाहीं. पळून आल्यापासून नव्वदच दिवसांनीं वॉटर्लू येथें त्याचा पराभव झाला. त्यानें गलबतांतून अमेरिकेंत जाण्याचा प्रयत्न केला; पण इंग्रजांनीं त्याला पकडून सेंट हेलेना बेटाच्या निर्जन किनार्‍यावर स्वत:च्या गुन्हेगार वृत्ती-भोगेच्छा व आकांक्षा-मनांत खेळवीत बसावयाला पाठवून दिलें. आयुष्याचीं शवेटची सात वर्षे त्यानें येथें आपल्या आठवणी लिहिण्यांत घालविलीं. या स्मृतींत त्यानें स्वत:ला जवळजवळ महादेव बनविलें आहे. १८२१ सालीं तो कॅन्सरनें मरण पावला व जगाला थोडासा विसावा मिळाला.

- ३ -

फ्रेंच राज्यक्रान्ति करणार्‍या पुढार्‍यांनीं एक फार मोठी चूक केली : त्यांना तलवारीच्या जोरावर आपल्या कल्पनांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. जगाला मुक्त करण्यासाठीं त्यांनीं सैन्य उभें केलें. पण हेंच साधन हातीं घेऊन नेपोलियननें स्वत:च्याच देशाला गुलाम केलें. यशासाठीं हिंसेवर विसंबून राहणार्‍या फ्रेंच क्रान्तीचा गळा शेवटीं हिंसेनेंच दाबला जाणें अपरिहार्य होतें व तें नेपोलियननें केलें.

नेपोलियननें फ्रान्सची मर्यादा तीच युरोपची मर्यादा करण्याची खटपट केली. कारण, त्याला स्वत:च्या क्षुद्र दिमाखासाठीं सारें युरोप रंगभूमि म्हणून हवें होतें. पण सारें करून तो सेंट हेलेना बेटावर जाऊन बसला, तेव्हां युरोपचें श्मशान झालें होतें ! फ्रान्स पूर्वीपेक्षां लहान झाला. नेपोलियनवर स्वत:च्या जीवननाटकांतील शेवटचा प्रवेश उष्ण कटिबंधांतील एका अज्ञात आणि निर्जन बेटावर करावा लागला. अनंत आकाश व अफाट सागर हेच तेवढे प्रेक्षक होते.

अलेक्झांडर खूप दारूची मेजवानी झोडून मेला, हॅनिबॉलनें शत्रू सारखे पाठींस लागले म्हणून आत्महत्या केली, सीझरला सर्वांत मोठा विजय मिळावयाचा होता त्याच दिवशीं तो मारला गेला आणि नेपोलियनला एखाद्या क्रूर, वन्य श्वापदाप्रमाणें कैद करून मरण्यासाठीं दूर ठेवण्यांत आलें. इतिहासांतल्या या सर्वांत मोठ्या चार सेनापतींपैकीं एकाच्याहि हातून जगाच्या सुखांत किंवा संस्कृतींत तिळभरहि भर पडली नाहीं व खुद्द त्यांनाहि सुख लाभलें नाहीं. अशा या हडेलहप्पांशिवायच जगाचें नीट चालेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय