बाई : मग तुम्ही का तुरुंगांत जाल ?

वसंता : हो.

बाई : गांधीबाप्पा आम्हांला जमीन देणार आहे ना ?

वसंता : या शेटजींच्या जमिनी तुम्हांला वांटून देऊं. जो खपेल त्याची जमीन.

बाई : खरें रे भाऊ बोललास! आम्ही काम करतों. परंतु सत्तेची हातभर जमीन नाहीं. शहरांत राहतों त्याची का रे सारी असावी ?

वसंता : तुमचें म्हणणें बरोबर आहे.

बाई : तुमचे मायबाप आहेत ?

वसंता : आई आहे.

बाई : मग तुरुंगांत जाऊं देते ?

वसंता : ती रडते, पण मी जातों.

बाई : देवमाणसें आहांत तुम्ही. जगासाठीं तळमळ तुमची.

वेदपुरुष : वसंता! येत्या स्टेशनवर आपण उतरुं व पायींच जाऊं हिंडत हिंडत.

वसंता : चालेल. गुराख्यांबरोबर गप्पा मारूं. वाटेंत ते ठिकठिकाणीं भेटतील.

वेदपुरुष : या वेळेस गुराखी कोठून भेटणार ? हे कडक उन्हाळ्याचे दिवस. या वेळेस बाहेर चारा नसतो, कांहीं नसते.

वसंता : तरीहि ढोरांचे पाय मोकळे व्हावेत म्हणून त्यांना सोडण्यांत येत असतें. आणि घरीं तरी चारा कोठें असतो ? बाहेर काडी मिळेल तेवढीच.

वेदपुरुष : परवां मध्यें दोन दिवस पाऊस पडला तेवढ्यानेंच पुन्हा पृथ्वी हिरवी हिरवी झाली आहे बघ. जरा ओलावा मिळतांच गवत मान वर करतें.

वसंता : गरीब जनतेचेंहिं असेंच आहे. त्यांना जरा सहानभूति द्या कीं त्यांची मान वर होईल. त्यांच्याजवळ जरा प्रेमानें, आस्थेनें बोला, कीं लगेच त्यांच्या तोंडावर तेज फुलेल.

वेदपुरुष : स्टेशन आलें.

वसंता : जातों आम्ही.

भिल्ल बाई : बरें रे भाऊ.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel