२ फ़ेब्रुआरी १९५९ रोजी रशिया मधील उरल पर्वत रांगेतील द्याटलोव खिंडीत काही पर्वतारोही अतिशय गूढ रित्या मृत्यू पावले. आज पर्यंत ह्या घटनेवर प्रचंड अभ्यास झाला आहे पण मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही. अनेक चित्रपट, पुस्तके इत्यादी माध्यमातून हि घटना लोकांना आज सुद्धा आठवण करून देते कि ह्या जगांत मानवी समजे पलीकडील अनेक गोष्टी आहेत.

द्याटलोव हा रशियन पर्वतारोही आपल्या इतर ९ साथिदारां बरोबर ओर्तोरेण ह्या पर्वताची सर करण्यासाठी बाहेर निघाला. सदर पर्वत वर्ग ३ मधील असल्याने चढण्यास सर्वांत मुश्किल होता पण सर्व १० लोक अतिशय अनुभवी पर्वतारोही होते. नियमानुसार १२ फेब्रुवारी ला ते परत खाली पोचणार होते आणि न पोचल्यास इतर लोक त्यांचा शोध घेण्यास निघणार होते.

१२ फेब्रुवारीला द्याटलोव परत आला नाही आणि सर्वांनाच त्यांची चिंता जाणवू लागली. २० फेब्रुवारी रोजी एक मोठा गट द्याटलोव ला शोधण्यासठी निघाला. २६ फेब्रुवारी पर्यंत रशियन आर्मी , विमानदळ इत्यादी शोध कार्यांत सहभागी झाले. २६ फेब्रुवारी रोजी सर्व प्रथम मिखैल ह्या विद्यार्थ्याला द्याटलोव चा तंबू शोधून काढण्यात यश आले.

सदर तंबूत बर्फ साचला होता, तंबू रिकामी असून अंत फक्त कपडे आणि बूट होते. तंबू आंतून फाडला गेला होता आणि सर्व चमू त्या भोकांतून पळून गेल्याची लक्षणे होती. विलक्षण गोष्ट म्हणजे त्यांचे सर्व समान आत होते. गरम कपडे, बूट इत्यादी. एकूण ८ ते ९ लोकांच्या पावूल खुणा लोकांना सापडल्या. कुणीही बूट घातले नव्हते. काही लोकांनी फक्त पायमोजे घातले होते तर काही जनी फक्त एक बूट तर अनेक लोक चक्क अनवाणी पळले होते.

शोध कर्त्यांनी पावूल खुणा चा पाठलाग केला. तंबू पासून सुमारे ५०० फुट अंतरावर एक छोटीशी दरी होती तेथे सर्व लोक पळाले असण्याचा संभव होता. शेवटी एका केदार वृक्षाच्या खाली शोध कर्त्यांना पहिली दोन मृत शरीरे सापडली. त्या दोघांनी शेकोटी पेटविण्याचा प्रयत्न केला होता. दोघांच्या शरीरावर फक्त अंडरवेर होती आणि पायात मोजे सुद्धा नव्हते. केदार वृक्षाची एक खाडी मोडली होती ज्यातून स्पष्ट होते एक दोघां पैकी एकाने वर चढून तंबू कडे पाहण्याचा पर्यंत केला होता.

तंबू आणि केदार वृक्ष ह्यांच्या मध्ये आणखीन ३ मृत शरीरे सापडली. तिघी लोक तंबूच्या दिशेने पळून जाताना मेले होते हे स्पष्ट होते तिन्ही शरीरे एक मेक पासून सुमारे २०० फुट अंतर्वर सापडली होती.

इतर ४ मृतांचा पत्ता लागायला ६० दिवसापेक्षा जास्त कालावधी लागला शेवटी केदार वृक्षा पासून सुमारे ७५ मीटर अंतरावर एका दरीत चारी शरीरे सापडली.  सुमारे ४ मीटर खोल बर्फंत ते गाडून गेले होते. ४ जणांच्या शरीरावर जास्त प्रमाणात कपडे होते आणि जिवंत राहिलेल्यांनी मृत व्यक्तींचे कपडे घातले होते अश्या खुणा होत्या.

तपासकार्य

५ मृत सापडल्यानंतर तपास काम सुरु झाले. सर्व लोक कडाक्याच्या थंडी मुले मेले असा निष्कर्ष डॉक्टरनी काढला. फक्त एका व्यक्तीच्या डोक्यावर फ़्रेक्चर होते पण ते जीव घेणे नव्हते. नंतर मे महिन्यात इतर ४ प्रेते सापडल्या नंतर मात्र तपास बदलला ४ लोकांच्या डोक्यावर फार मोठी फ़्रेक्चर होती. डॉक्टरच्या म्हणण्या नुसार एका कार अपघाता प्रमाणे त्यांच्या डोक्यावर प्रहार झाला होता.

विलक्षण गोष्ट म्हणजे दाब्लीना ह्या मुली शिवाय इतर कुनाच्या शरीरावर दुसरे (कवटी सोडून ) कुठलेही फ्रेक्च्रर नव्हते. दाब्लीना ची जीभ, डोळे , खालचा ओंठ आणि कवटीचा एक भाग गायब होते.

आधी तपास कर्त्यांनी कयास केला कि त्या भागांतील मानसी नावाच्या आदिवासी जमातीने कदाचित त्यांना मारले असावे पण, कुठेही हातापायी झाल्याची खून नसल्याने तो कयास बाजूला सरला.

एक व्यक्तीने हे काम रशियन यति चे असल्याचा सिद्धांत मांडला. रशियन येती ची दंत कथा प्रसिद्ध असून येती जीभ काढून खातो अशी समजून होती.

किंवा हा अपघात रशिअन आर्मी ने घडवून आणला असावा असे सुद्धा आनेक लोक मानतात. रशियन आर्मी त्या वेळी काहीतरी खास हत्याराची चाचणी घेत असावी आणि ह्या मुलांच्या मृत्यू त्यांत चुकून झाला असावा. काही लोकांनी त्या रात्री आकाशांत एक विशिष्ट प्रकारचा प्रकाश पहिला होता.

सर्वांत मानण्याजोगे स्पष्टीकरण असे होते कि रात्री कपडे काढून झोपल्या नंतर रात्री एक छोटी हिमवासारण आली असवी आणि घाबरून सर्वांनी पळ काढला असावा. पाळता पाळता ४ लोक दरीत पडले असावे. इतर ५ लोक वाचले पण परत अंधारांत तंबू शोधत शोधत थंडीने त्यांचा मृत्यू झाला असावा.

आज पर्यंत ह्या घटनेवर १५ पेक्षा जास्त चित्रपट किंवा टीवी भाग प्रदर्शित झाल आहेत आणि किमान ३ महत्वाची पुस्तके लिहिली गेली आहते. द्यात्लोव संग्रहालय ह्या घटने नंतर उभे राहिले आणि तेथे सर्व ९ पर्वतारोहींचे समान जपून ठेवले गेले आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel