'प्रबोधन - जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया' असे म्हणत जितेंद्र माने, कुसुम भोईर, डॉ.आशिष तांबे, गौरव गायकवाड, जयंत निकम आणि  निलेश कळसकर यांनी प्रबोधन हा ग्रुप फेसबुकवर सुरु केला. ग्रुपला मिळालेले यश आपणा सर्वांना माहितच आहे. त्या यशावर कळस चढवत प्रबोधन टीम आता आपले पहिले ई-पुस्तक आपल्यासमोर आणत आहे. यासाठी संपूर्ण प्रबोधन टीमतर्फे प्रबोधन टीमचे आभार, म्हणजे आपल्याचकडून आपले आभार.

प्रबोधन ग्रुपने अगदी सुरुवातीपासूनच कोणत्याही विरोधाला न जुमानता समाजातील अनेक चुकीच्या रूढी-परंपरा यांवर हल्ला चढविला आहे. हल्लीचे युग पाहता जो तो आपला बचाव करण्यात भलं मानत असतो. आपण बरं, आपलं काम बरं आणि आपलं घर भलं. हे सध्याच्या माणसाचे चित्र आहे. आणि अशा वातावरणात प्रबोधन टीम फेसबुकवर वस्तुस्थितीवर भाष्य करत परखडपणे आपले मत मांडते यासाठी प्रबोधन टीम खरोखरच कौतुकास पात्र ठरते. ग्रुपने प्रत्येक वेळी प्रबोधन करण्याचे कार्य केले आहे. कोणतीही  माहिती मिळताच ती माहिती खरं आहे का नाही, योग्य आहे की नाही हे सर्व पडताळून या टीमने समाज जागरूक ठेवण्याचे कार्य केले आहे. प्रबोधन टीममधील सदस्य फेसबुकवर कधीची वात्रट, वेळ काढून नेणारे, सगळे करतात तर आपण पण करू असे कोणतेही पोस्ट करताना दिसत नाही. या टीमने खऱ्या अथार्ने फेसबुकचा योग्य वापर केला आहे आणि प्रबोधन पेज मध्ये सामील होणायार् प्रत्येकाने आपले विचार अगदी योग्य प्रकारे फेसबुकवर मांडले आहे.

प्रबोधन समूहाचा आणखी एक फायदा असा की एकमेकांपासनू कितीही दूर असले, पूर्वीची कसलीही ओळख नसली, तरी आज हजारांच्या वर अनेक चांगली माणसे एकत्र आली आहेत. काहींनी एकमेकांचे फोन नंबर सुद्धा घेतले आहेत. प्रबोधनच्या माध्यमातून माझी अनेक चांगल्या माणसांशी ओळख झाली आहे. तुम्ही हे सदर वाचत आहात, तुमच्याशी सुद्धा माझी ओळख झाली आहे. असो, ओळखीचा भाग पुरे झाला. आता मूळ मुद्द्यावर येतो.

फेसबुक वरील एका ग्रुप वरून एक ई-पुस्तक अशी झेप प्रबोधन टीमने घेतलेली आहे. खरे तर ही एक झेप नाही तर हे एक नवे पर्व आहे. जगातील वेगवेगळ्या ठिकाणी मराठीतील विचारवंत/ लेखक/ पत्रकार/ जाणकार/ दिग्गज/ अभ्यासू व्यक्ती आपले अनमोल विचार ई-पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतील. याचा संपूर्ण लाभ हा आपल्याला आणि एकूणच आपल्या समाजाला होणार आहे. एक गंमत सांगावीशी वाटते, काही दिवसांनी मी सुद्धा या ग्रुपच्या संचालक मंडळामध्ये सामील झालो. आम्ही नंतर तो ग्रुप बंद करून फेसबुक पेज सुरु केले ज्याला आज देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

आपलाच अभिषेक ठमके
(संचालक मंडळातील सदस्य- प्रबोधन : जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel