थायलंड मध्ये थेरावाद बौद्ध लोक बहुसंख्यांक आहेत, तरी देखील तिथला राष्ट्रीय ग्रंथ रामायण आहे. ज्याला थाई भाषेत "राम-कियेन" म्हणतात. त्याचा अर्थ राम कीर्ती असा आहे, जो वाल्मिकी रामायणावर आधारित आहे. या ग्रंथाची मूळ प्रत सन १७६७ मध्ये नष्ट झाली होती. चक्री राजा प्रथम राम (१७३६-१८०९) याने आपल्या स्मरणशक्तीने तो ग्रंथ पुन्हा लिहिला. थायलंड मध्ये रामायणाला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करणे शक्य झाले कारण तिथे भारतासारखे दुटप्पी हिंदू नाहीत, जे नावाचे हिंदू आहेत आणि हिंदूंचे खरे शत्रू हे असले दुटप्पी हिंदूच आहेत.


थायलंड मध्ये राम कियेन वर आधारित नाटक आणि बाहुल्यांचा खेळ पाहणे धार्मिक कार्य मानले जाते. राम कियेन मधील मुख्य पात्रांची नावे अशा प्रकारे आहेत -

१ राम (राम),

२ लक (लक्ष्मण),

3 पाली (बाली),

४ सुक्रीप (सुग्रीव),

५ ओन्कोट (अंगद),

६ खोम्पून ( जाम्बवन्त ) ,

७ बिपेक ( विभीषण ),

८ तोतस कन ( दशकण्ठ ) रावण,

९ सदायु ( जटायु ),

१० सुपन मच्छा ( शूर्पणखा )

११ मारित ( मारीच ),

12 इन्द्रचित ( इंद्रजीत ) मेघनाद ,

१३ फ्र पाई( वायुदेव ), इत्यादी.

थाई राम कियेन मध्ये हनुमानाच्या पत्नीचे नाव देखील आहे, जे इथल्या लोकांना माहिती नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel