आधी नमन करु
देव गणपती
शारदा सरस्वती
मोरावरी ॥१॥
मोरया रे देवा
तुला दुर्वांची आवडी
एकविसांची जुडी
बाळासाठी ॥२॥
मोरया रे देवा
लाडू घे सोंडेवरी
पुत्र दे मांडीवरी
उषाताईला ॥३॥
मोरया देवाला
केले दुर्वांचे आसन
झाला मोरया प्रसन्न
भाईरायाला ॥४॥
मोरया रे देवा
तुला लिंपीन शेंदूर
पुत्र दे सुंदर
उषाताईला ॥५॥
मोरया रे देवा
तुला जास्वंदीचे फूल
मांडीये देई मूल
उषाताईला ॥६॥
मोरया रे देवा
सारी विघ्ने ही हाकावी
तान्हे बाळाला राखावी
दूरदेशी ॥७॥
मोरया रे देवा
सारी विघ्ने कर दूर
निर्विघ्न माझा कर
संवसार ॥८॥
आणा गणेशाला
गणेशचतुर्थीला
देईल सुदबुद्धीला
तान्हे बाळ ॥९॥
आणावा गणेश
विघ्ने तो करी दूर
सुखाला येवो पूर
गोपू बाळाच्या ॥११॥
आणावा गणेश
त्याला वाहू हिरव्या दुर्वा
प्रार्थू मनोरथ पुरवा
गणराया ॥१२॥
आणावे नारळ
करीन एकवीस मोदक
देव सिद्धिविनायक
कृपा करो ॥१३॥
संकष्ट चतुर्थी
आहे माझा नेम
भाचा सांगेन ब्राम्हण
गोपू बाळा ॥१४॥
संकष्ट चतुर्थी
चंद्र दिसतो हिरवा
सखी वेचते दुरवा
पूजेसाठी ॥१५॥
सर्वांच्या मागून
शिवाची करिती पूजा
भोळ्या सांबालागी माझा
प्रणिपात ॥१६॥
खोलामध्ये नांदे
नाही त्याचा गाजवाजा
भोळ्या सांबा माझा
नमस्कार ॥१७॥
रानीवनी वसे
माझा कैलासीचा राजा
भोळ्या सांबालागी माझा
प्रणिपात ॥१८॥
स्मशानी वसती
अंगाला विभूती
पती तो पार्वती
वरीतसे ॥१९॥
सर्पाची वेटाळी
ज्याच्या गळा वेढे देती
पती तो पार्वती
वरीतसे ॥२०॥
भैरव भुतांची
नाचे मंडळी सभोती
पती तो पार्वती
वरीतसे ॥२१॥
हातात डमरु
त्रिशूळ दुज्या हाती
पती तो पार्वती
वरीतसे ॥२२॥
नंदीचे वाहन
चंद्रमा माथ्यावरती
पती तो पार्वती
वरीतसे ॥२३॥
जगाचे कल्याणा
हलाहल सुखे पीती
पती तो पार्वती
वरीतसे ॥२४॥
जगाच्या कल्याणा
विषाचा घोट घेती
नीळकंठ झाली कीर्ती
शंकराची ॥२५॥
भोळा महादेव
या भोळा म्हणू नये
त्याच्या जटेमध्ये
गुपित गंगा वाहे ॥२६॥
भोळा महादेव
भोळे याचे देणे
त्याने मला दिले
त्याच्या विभूतीचे सोने ॥२७॥
भोळा महादेव
क्षणी प्रसन्न होतसे
दुष्ट असो सुष्ट असो
वर मागे तो देतसे ॥२८॥
भोळा महादेव
त्याला वाहा शिवामूठ
मग संसारी सुखाची
उषाताई तुला लूट ॥२९॥
चिलू माझा वेसारा
पापड पसारा
निघाला वेसवारा
कैलासात ॥३०॥
चिलू माझा दाणीया
भांगी भरल्या गोणीया
निघाल्या पेणीया
कैलासात ॥३१॥
त्रिश्चरण चेतवली
महानंदा घाली उडी
आला धावूनी तातडी
महादेव ॥३२॥
कुक्कुट मर्कुट
महानंदेने पाळीले
भद्रसेनेकडे आले
पुत्र दोन्ही ॥३३॥
पतिव्रता मोठ्या
पार्वती सावित्री
पवित्री धरित्री
त्यांच्यामुळे ॥३४॥
योगिनी सावित्री
यमापाशी गेली
पति घेऊनिया आली
स्वर्गातूनी ॥३५॥
पतिव्रता सावित्री
प्रतिज्ञा करुनी गेली
पति घेऊनिया आली
स्वर्गातूनी ॥३६॥
योगिनी सावित्री
संतोषवी यमराणा
मागते चुडेदाना
त्याचेपाशी ॥३७॥
सासू - सासर्यांच्या
आज्ञे गेली अरण्यात
जाहली कृतार्थ
दोघेजण ॥३८॥
यमाचे पाशातून
पति सोडवी सावित्री
जगती तिची कीर्ती
नारी गाती ॥३९॥
पति असे पाशी
धैर्य बसे त्याच्यापाशी
नाही झाली गोष्ट अशी
भूमंडळी ॥४०॥
सावित्री सावित्री
जरी म्हणतील ओठ
सौभाग्य नाही तुट
भूमंडळी ॥४१॥
सावित्री सावित्री
जरी म्हणतील नारी
त्यांचे या संवसारी
वज्रचुडे ॥४२॥
सावित्री सावित्री
म्हणती ज्या नारी
मंगळसूत्र दोरी
अक्षै त्यांची ॥४३॥
सावित्रीचे व्रत
करील जी नारी
जन्म सावित्री संसारी
होईल ती ॥४४॥
सावित्रीचे व्रत
करावे पवित्र
एकावे चरित्र
सावित्रीचे ॥४५॥
यमधर्माला आडवी
पतिव्रता किती मोठी
अपूर्व केल्या गोष्टी
सावित्रीने ॥४६॥
सावित्रीचा महिमा
अमर भूमंडळी
अबला झाली बळी
यमाहून ॥४७॥
सतीच्या प्रभावे
काळही मणी खचे
नाव घ्या सावित्रीचे
संसारात ॥४८॥
रामाची गं सीता
लक्ष्मणाची ग वयनी
दशरथाची पहिली
ज्येष्ठ सून ॥४९॥
पाचा वरुषांचे राम
अडचा वरुषींची सीता
धन्य तुझी दशरथा
सून आली ॥५०॥
सीतेला सासुरवास
कैकयीने केला
रामासारखा भ्रतार
तिला नाही भोग दिला ॥५१॥
अहिल्या शिळा झाली
गौतमाची कांता
रामराये वनी जाता
उद्धरली ॥५२॥
अहिल्या शिळा झाली
पतीच्या श्रापाने
दशरथाच्या लेकाने
उद्धरिली ॥५३॥
आश्चर्य आश्चर्य
रामरायाच्या पायाचे
शिळेतून वर येई
रुप अहिल्या सतीचे ॥५४॥
रामरायाच्या चरणाचा
भूमीला गं लागे कण
अहिल्या गं प्रगटली
न लागता एक क्षण ॥५५॥
राम लक्ष्मण
भरत शत्रुघ्न
चौघांमध्ये कोण
राज्य करी ॥५६॥
राम लक्ष्मण
गेले की काननात
भरत मनात
दुःखी कष्टी ॥५७॥
रामसीता वनी
माय कैकयी पाठवी
मनी भरत आठवी
नित्य त्यांना ॥५८॥
जटाधारी झाला
निजतो सुखे भुई
भरत जणू होई
वनवासी ॥५९॥
नको म्हणे राज्य
भरत कैकयीला
बंधू नाही असा झाला
जगत्रयी ॥६०॥
नंदिग्रामी राही
सदा रामनाप जपे
तपश्चर्या घोर तपे
भरत बंधू ॥६१॥
धन्य रे भरता
धन्य रे तू भाऊ
तुझी कीर्ती राहू
चिरजीव ॥६२॥
धन्य रे भरता
धन्य रे तुझे मन
तुझ्या स्मरणे लोचन
भरुनी येती ॥६३॥
धन्य रे भरता
धन्य रे तुझी भक्ती
आलेले राज्य हाती
सोडिले तू ॥६४॥
धन्य रे भरता
धन्य रे तुझी निष्ठा
आलेले राज्य हाता
सोडियेले ॥६५॥
राम चाले रथी
लक्ष्मण चाले पायी
एवढ्या पृथ्वीवर
असा बंधू झाला नाही ॥६६॥
राम चाले वाटे
लक्ष्मण झाडी खडे
असे बंधू झाले थोडे
पृथ्वीवर ॥६७॥
राम चाले वाटे
लक्ष्मण झाडी काटे
असे बंधू नाही कोठे
संसारात ॥६८॥
राम चाले वाटे
लक्ष्मण झाडी पाला
असा बंधू नाही झाला
भूमंडळी ॥६९॥
राम चाले वाटी
लक्ष्मण झाडी माती
असे बंधू झाले किती
कोण सांगा ! ॥७०॥
राम सीता वनी
लक्ष्मण फळे आणी
असा बंधू त्रिभुवनी
भाग्य भेटे ॥७१॥
रामकुंडावरी
हिरवा मंडप जाईचा
आंघोळीला आला
पुत्र कौसल्याबाईचा ॥७२॥
रामाच्या आंघोळीला
पाणी नाही विसाणाला
अमृताचे झरे
लाविले गं पाषाणाला ॥७३॥
रामकुंडावरी
रामरायाची आंघोळी
सावळी सीताबाई
तेथे काढिते रांगोळी ॥७४॥
रामकुंडावरी
रामराया संध्या करी
सावळी सीताबाई
अमृताने तांब्या भरी ॥७५॥
रामकुंडावरी
रामरायाची आरती
सभामंडपात
हात जोडून मारुती ॥७६॥
रामकुंडावरी
कुंवारणींची झाली दाटी
परकर चोळ्या वाटी
सीताबाई ॥७७॥
रामकुंडावरी
ब्राह्मणांची झाली दाटी
धोतरजोडे वाटी
रामराया ॥७८॥
रामकुंडावरी
सवाष्णीची झाली दाटी
हळदीकुंकू वाटी
सीतादेवी ॥७९॥
रामकुंडावरी
रामरायाची बिछाई
तेथे पाय चेपी
सावळी सीताबाई ॥८०॥
रामकुंडावरी
रामरायाची बिछाई
तेथे विडा देते
सावळी सीताबाई ॥८१॥
रामाला आला घाम
सीता पुसते घोळाने
पाहातसे तिच्या मुखा
रामराया गं प्रेमाने ॥८२॥
रामराया आला घाम
सीताबाई घाली वारा
पतिसंगतीत प्रेमे
वनवास कंठी सारा ॥८३॥
रामरायाला पडसे
सीता देते त्याला आले
पंचवटीमध्ये त्यांचे
पर्णकुटी घर झाले ॥८४॥
रामराया लावी
जाई मोगर्यांची फुले
सावळी सीताबाई
शिंपीतसे त्यांना दळे ॥८५॥
रामाला पुसते
सीता पाखरांची नावे
रामरायाने हसावे
कौतुकाने ॥८६॥
सीता रागावली
रानी रुसून बैसली
रामराये हसविली
स्पर्शमात्रे ॥८७॥
लक्ष्मण आणि
सीतामाईला मोरपीसे
सावळी सीताबाई
त्यांचे करीतसे पंखे ॥८८॥
राम लक्ष्मण
जसे मोतियांचे बाण
मध्ये शोभे सूर्यपान
सीताबाई ॥८९॥
राम लक्ष्मण
मोतियांची जोडी
मध्ये शोभती लालडी
सीताबाई ॥९०॥
राम लक्ष्मण
जसे धनुष्य बाण
मध्ये लावण्याची खाण
सीतादेवी ॥९१॥
राम लक्ष्मण
जसे मोतियांचे हार
शेवंती सुकुमार
सीताबाई ॥९२॥
सीता वनवासी
झाडांशी सांगे गोष्ट
दुष्ट ग रावण
तेथे ठेवी पापी दुष्टी ॥९३॥
सोन्याच्या चोळीचा
मोह सीतेला सुटला
कोण प्रपंची विटली
सर्व सुखा ॥९४॥
सीतेला लोभ जडे
रामराया मोह पडे
होणार ते ते घडे
लल्लाटीचे ॥९५॥
जटायू तो पक्षी
रामासाठी मेला
मरुन धन्य झाला
संसारात ॥९६॥
शबरीची बोरे
उष्टीमाष्टी खाशी
तू रे दिसशी अधाशी
रामराया ॥९७॥
शबरीची बोरे
उष्टीमाष्टी खाशी
शतजन्माचा
उपाशी रामराया ॥९८॥
शबरीची बोरे
एकटा राम खाई
सीतेचे त्याच्याशी
मग गोड भांडण होई ॥९९॥
शबरीची बोरे
अमृताहून गोड
कोण ठेविल त्यांना खोड
त्रैलोक्यात ॥१००॥
शबरीची बोरे
रामे मटकावीली
शबरी मुक्त केली
संसारात ॥१०१॥
सीतेच्या शोधासाठी
रामाने दिली सरी
मारुती गं राया
मग पडला विचारी ॥१०२॥
सीतेच्या शोधासाठी
रामाने दिली माळ
समुद्र लंघुनी
गेले अंजनीचे बाळ ॥१०३॥
अशोकाचे खाली
सीता रडतसे
मारुती देतसे
आश्वासन ॥१०४॥
अशोकाचे खाली
सीताबाई शोक करी
हनुमंते खूण दिली
रामरायाची ॥१०५॥
अशोकाचे खाली
सीतेची गळेसरी
तेथे मारुतीची फेरी
रात्रंदिस ॥१०६॥
अशोकाचे खाली
सीतेचा कमरपट्टा
तेथे मारुती झपाटा
रात्रंदिस ॥१०७॥
अशोकाचे खाली
सीतामाईचे कांकण
तेथे मारुती राखण
रात्रंदिवस ॥१०८॥
अशोकाचे खाली
सीताबाईची ही नथ
तेथे मारुतीचा पथ
रात्रंदिवस ॥१०९॥
अशोका फुले
शेंदरी रंगाची
फार आवडीची
जानकीच्या ॥११०॥
अशोकाच्या झाडा
फुलांचा नित्य बहर
सीतादेवीच्या डोळ्यांचा
त्याला मिळतो पाझर ॥१११॥
अशोकाची फुले
झुबके झुबके
पाहते कौतुके
दुःखी सीता ॥११२॥
अशोकाच्या झाडा
सीता घाली पाणी
नेत्र येतात भरोनी
रात्रंदिस ॥११३॥
अशोकवचनी
का हो सुकुमार फुले
जानकीच्या नेत्रातील
पोसली ती नित्य जळे ॥११४॥
अशोकवनींच्या
फुलांना का गोड वास
जानकीच्या त्यांना लागे
नित्य श्वासोच्छवास ॥११५॥
अशोकवनात
फुलांचा सडा पडे
परंतु सीता रडे
रात्रंदिस ॥११६॥
सागरावरती
सेतू बांधिला बाणांचा
दशरथाच्या पुत्राचा
पराक्रम ॥११७॥
सागरावरती
सेतू बांधला वानरी
तुझ्यासाठी ग सुंदरी
सीताबाई ॥११८॥
राम टाकी शिळा
परि बुडाल्या त्या तळी
रामाच्या नावाची
शिळा परि तरे जळी ॥११९॥
हसून मारुती
म्हणे राम रघुनाथा
देवा, तुमच्याहीपेक्षा
तुमच्या नावाची योग्यता ॥१२०॥
रामाच्या नावाने
शिळा सिंधूत तरती
आणि शिवाशंकराच्या
विषवेदना थांबती ॥१२१॥
रामाच्या नावाने
शिळा सागरी तरती
संसारी त्याच्या नावे
जडमूढ उद्धरती ॥१२२॥
राम चाले वाटे
लक्ष्मण झाडी वाळू
रामाचे बाण हळू
लंकेवरी ॥१२३॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे राख
रामाचे बाण लाख
लंकेवरी ॥१२४॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे वाळू
रामाचे बाण हळू
लंकेवरी ॥१२५॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडती दगड
रामाचे बाण रगड
लंकेवरी ॥१२६॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे रेती
रामाचे बाण येती
लंकेवरी ॥१२७॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे चुना
रामाचे बाण पुन्हा
लंकेवरी ॥१२८॥
हस्ते झाले मस्त
गगनी उडे गोळा
रामाचे बाण सोडा
लंकेवरी ॥१२९॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे सूप
रामाचे बाण खूप
लंकेवरी ॥१३०॥
हस्ती झाले मस्त
आकाशी काळोख
रामाचे बाण लाख
लंकेवरी ॥१३१॥
हस्ती झाले मस्त
गगनी अंधार
रामाची बाणधार
लंकेवरी ॥१३२॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे माती
रामाचे बाण येती
लंकेवरी ॥१३३॥
इंद्रजीत मारी
लक्ष्मण ब्रह्मचारी
रडते त्याची नारी
सुलोचना ॥१३४॥
बारा वर्ष राही
निराहार ब्रह्मचारी
म्हणून सौमित्र
रावणाच्या पुत्रा मारी ॥१३५॥
मारिला इंद्रजित
दिली दऊत देखणी
लक्ष्मुणे घात केला
भुजा दाखवी लिहुनी ॥१३६॥
रामाचे ह्रदय
कठिण वज्राचे
अग्नीत सीतेचे
सत्त्व पाही ॥१३७॥
रामाचे ह्रदय
जणू कठिण पाषाण
फूल आगीत घालून
बघतसे ॥१३८॥
पुष्पक विमानी
रामाच्या जवळी
शोभली सावळी
सीताबाई ॥१३९॥
शोभली जानकी
रामरायाच्या मांडीवरी
सीतेच्या तोंडावरी
प्रसन्नता ॥१४०॥
भरता भेटला
भेटला ह्रदयाला
रामरायाने न्हाणीला
नेत्रजळे ॥१४१॥
भरताच्या पाठीवर
राम फिरवितो हात
बारा वरसांचे कष्ट
दूर केले ॥१४२॥
बारा वरसांनी
कौसल्या भेटे रामा
ह्रदयी दाटे प्रेमा
माउलीच्या ॥१४३॥
कौसल्या माउली
रामाला धरी पोटी
उमटेना शब्द ओठी
काही केल्या ॥१४४॥
वाजंत्री वाजती
वाजती माळावर
राज्य अभिषेक
कौसल्याच्या बाळावर ॥१४५॥
वाजंत्री वाजती
चला सख्यांनो पाहायला
रामाची आरती
जाते मारुतीरायाला ॥१४६॥
राम लक्ष्मण
अर्धांगी सीता नारी
सेवेशी ब्रह्मचारी
मारुतीराय ॥१४७॥
राम लक्ष्मण
अर्धांगी सीता शोभे
सेवेशी दास उभे
मारुतीराय ॥१४८॥
सतरंज्यांना ठसे
लोडांना आरसे
रामरायाच्या सभे बसे
मारुतिराय ॥१४९॥
सतरंज्यांना ठसे
शोभती कमानी
रामरायाच्या दिवाणी
मारुतीराय ॥१५०॥
शिंदेशाही तोडे
सीताबाईच्या हातात
रामरायाच्या रथात
उजेड पडे ॥१५१॥
शिंदेशाही तोडे
राम सीतेला देणार
रामरायाच्या रथात
त्याचा उजेड पडणार ॥१५२॥
चला जाऊ पाहू
रामरायाची बिछाई
शेजारी रत्न टीक
सीताबाई ॥१५३॥
चला जाऊ पाहू
रामरायाची बैठक
हसून विडा देई
सीताबाई ॥१५४॥
नदीपलीकडे
कोणाची पालखी
रामरायाची जानकी
उतरली ॥१५५॥
मोठी मोठी मोती
रामरायाच्या सदर्याला
राणी मागते गजर्याला
सीताबाई ॥१५६॥
मोठी मोठी मोती
रामरायाच्या कोटाला
राणी मागते गोटाला
सीताबाई ॥१५७॥
मोठी मोठी मोती
रामरायाच्या पगडीला
राणी मागते बुगडीला
सीतादेवी ॥१५८॥
शिंदेशाही तोडे
सीताबाई कधी केले
राम इंदूरला गेले
त्याच्यासाठी ॥१५९॥
शिंदेशाही तोडे
राम सीतेला देणारा
पंचवटीचे सोनार
कारागीर ॥१६०॥
मोठी मोठी मोती
रामरायाच्या पलंगाला
राणी मागे लवंगाला
सीतादेवी ॥१६१॥
मोठी मोठी मोती
रामरायाच्या जोड्याला
राणी मागते तोड्याला
सीतादेवी ॥१६२॥
राम रथामध्ये
लक्ष्मण घोड्यावरी
मधून जाते डोली
जानकीची ॥१६३॥
सीतेला डोहाळे
रामाला काय कळे
निंबोणी रस गळे
शेल्यावरी ॥१६४॥
सीतेला डोहाळे
रामाला सांगावे
रुमाली आणावे
बाळ आंबे ॥१६५॥
सीता वनवासी
दगडाची केली उशी
अंकुश बाळ कुशी
वाढतसे ॥१६६॥
सीता वनवासी
दगडाची केली उशी
एवढ्या अरण्यात
तिला झोप आली कशी ॥१६७॥
सीता वनवासी
वनी कंटकांची दाटी
पाच महिन्यांचा
अंकुश बाळ पोटी ॥१६८॥
सीता वनवासी
दगडाची करी गादी
एवढ्या अरण्यात
तिला झोप आली कशी ॥१६९॥
सीता वनवासी
दगडाची केली बाज
अंकुश बाळ नीज
वनामध्ये ॥१७०॥
पाच महिन्याचा
अंकुश असे पोटी
घोर अरण्यात
सीतामाई केर लोटी ॥१७१॥
बाणामागे बाण
बाण येतील मागे पुढे
रामाच्या बाणांचे
लवांकुश कडी - तोडे ॥१७२॥
बाणांमागे बाण
बाण येती ग पिवळे
रामाशी लढती
लवांकुश ग कोवळे ॥१७३॥
बाणामागे बाण
बाण येती झराझरा
रामाच्या बाणांचा
लवांकुश ग कडदोरा ॥१७४॥
सीतेला सासुरवास
असा केला केसोकेसी
सीता गेली निजघामा
तिने वाटला देशोदेशी ॥१७५॥
सीतेला सासुरवास
असा केला परोपरी
सीता गेली निजधामा
तिने वाटला घरोघरी ॥१७६॥
सीतेला वनवास
कैकयीने नेली फणी
तिने बारा वर्षे वेणी
वर्ज्य केली ॥१७७॥
सीतेला सासुरवास
कैकयीने केला
बारा वर्षे दिला
वनवास ॥१७८॥
सीतेला डोहाळे
कैकयीने केले
राम नाही दाखविले
बारा वर्षे ॥१७९॥
सीता सांगे कथा
आपुल्या कर्माची
पापिष्टा रावणाची
लंका जळली ॥१८०॥
राम गेल वना
मारिले रावणा
राज्य दिले बिभीषणा
सोनियाचे ॥१८१॥
सीता सांगे स्वप्न
ऐक रे शहाण्या
सवतीवरी कन्या
देऊ नये ॥१८२॥
सीता सांगे स्वप्न
ऐक मंदोदरी
राम लंकेवरी
स्वार झाले ॥१८३॥
सीता सांगे स्वप्न
ऐक मंदोदरी
इंद्रजीत मारी
लक्ष्मण ॥१८४॥
सीता सांगे स्वप्न
ऐक मंदोदरी
राक्षस वानरी
संहारिले ॥१८५॥
सीतेच्या श्रापाने
डोंगर जळती
वानर म्हणती
रामनाम ॥१८६॥
सीतेच्या श्रापाने
लंकेची झाली होळी
तोंडे झाली काळी
वानरांची ॥१८७॥
आधी नमन करु
अंजनीच्या सुता
मारुती हनुमंता
रामभक्ता ॥१८८॥
आधी नमन करु
अंजनीबाईला
मग मारुतीरायाला
तिच्या पुत्रा ॥१८९॥
अंजनीबाई म्हणे
बाळ माझा बळिवंत
द्रोणागिरी पर्वत
उचलिला ॥१९०॥
घडीत आणीला
पर्वताचा चेंडू
हनुमंत वंदू
रामदूत ॥१९१॥
मनाचाही वेग
मारुतीच्या मागे
लंकेला रागे रागे
जाळीतसे ॥१९२॥
एकाच उडीत
समुद्र ओलांडी
जाऊनी सीता बंदी
रामदूत ॥१९३॥
रामाचा सेवक
मारुतीराया तो मानाचा
विडा पिकल्या पानांचा
सुकुनी गेला ॥१९४॥
पहाटेच्या प्रहर रात्री
मला वेशीकडे जाणे
त्याचे दर्शन आहे घेणे
मारुतीरायाचे ॥१९५॥
राम राम म्हणत
दारावरुन कोण गेला
रामराया तुझा चेला
मारुतीराय ॥१९६॥
राम राम म्हणुनी
नदीत कोण गेला
रामराया तुझा चेला
मारुतीराय ॥१९७॥
माझा गं दयाळू
वेशीच्या बाहेर उभा
मारुतीरायाचा
शेंदरी लाल झगा ॥१९८॥
रामाच्या बैसली
अर्धांगी सीता नार
सेवेला ब्रह्मचारी
मारुतीराय ॥१९९॥
ध्यान गं यशोदा
नेसली कशीदा
मांडिये मुकुंदा
न्हाणीयेले ॥२००॥
दैवाची यशोदा
नेसली पिवळे
मांडिये सावळे
परब्रह्म ॥२०१॥
दैवाची यशोदा
नेसली शेलारी
बैसली श्रीहरी
दूध पाजू ॥२०२॥
दैवाची यशोदा
नेसली पातळ
मांडीये घननीळा
नाचतसे ॥२०३॥
कृष्णाची यशोदा
नेसली जरतारी
मांडिया मुरारी
दूध पीई ॥२०४॥
यशोदेचे निर्या
कृष्ण धरुन उभा राही
चंद्रमा म्हणे देई
खेळावया ॥२०५॥
गायींना चारितो
यमुनेच्या तटी
भक्तांना संकटी
सांभाळितो ॥२०६॥
कृष्ण टाकी उडी
कळंब कडाडला
शेष दणाणला
पाताळात ॥२०७॥
कृष्ण उडी टाकी
कळंबाच्या मेजे
यमुने पाणी तुझे
गढूळले ॥२०८॥
गायीगुरे चारी
वाजवितो पावा
गोपाळकृष्ण घ्यावा
गोकुळीचा ॥२०९॥
खांदिये घोंगडी
अधरी धरी पावा
गोपाळकृष्ण गावा
गोकुळीचा ॥२१०॥
हाती शोभे काठी
गवळे सवंगडी
खांदिये घोंगडी
कृष्णजीच्या ॥२११॥
मोरमुगुट माथा
गळा वनमाळा
स्मरावा सावळा
गोकुळीचा ॥२१२॥
गोपाळकाला करी
यमुनेच्या तीरी
होऊन गोवारी
नंदजीचा ॥२१३॥
दैवाचा तू नंद
धन्य दैवाची यशोदा
आनंदाच्या कंदा
खेळविले ॥२१४॥
ज्याच्या नावे होती
संसारात मुक्त
यशोदा बांधीत
त्याला दावे ॥२१५॥
राक्षस संहारी
काळिया विहारी
यशोदा त्याला मारी
वेताटीने ॥२१६॥
तोंडात दाखवी
विश्व ब्रह्मांड सगळे
तेव्हा यशोदे कळले
बाळरुप ॥२१७॥
कृष्णे काळियाची
मर्दियेली फणी
काढीयला मणी
मस्तकींचा ॥२१८॥
गोविंद गोविंद
गोविंद ध्यानी मनी
गोविंद गोपांगणी
क्रीडा करी ॥२१९॥
वाजवून पावा
वेध लावी सर्वां
गोपाकृष्ण घ्यावा
गोकुळीचा ॥२२०॥
दही, दूध, लोणी
चोरुन वाटितो
कौतुक करितो
बाळकृष्ण ॥२२१॥
का गं सखी तुझे
डोळे लाल धुंद
काननी गोविंद
वाजवितो ॥२२२॥
गोवर्धनगिरी
बोटाने उचली
वाढतो गोकुळी
कंस शत्रू ॥२२३॥
गायी गोवर्धनी
चरती बारा राने
पावा जनार्दने
वाजविला ॥२२४॥
यशोदा म्हणते
कृष्ण माझा वरसाचा
कसा तो गोरसाचा
नाश करी ॥२२५॥
कृष्णनाथ काळा
जसा उडीदाचा दाणा
सोळा सहस्र गोपांगना
भुलविल्या ॥२२६॥
माझ्या दारावरुन
रंगीत गाडी गेली
कृष्णाने राधा नेली
गोकुळात ॥२२७॥
वाढता वाढता
सुटे द्रौपदीची चोळी
गोविंद सांभाळी
तिची लाज ॥२२८॥
चतुर्भुज केली
द्रौपदी निज सखी
भक्ताची लाज राखी
भगवंत ॥२२९॥
दोन हाती वाढी
दोन हाती बांधी
सावळी द्रौपदी
मांडवात ॥२३०॥
राजसूय यज्ञी
दुर्जन हसले
चतुर्भुज देवे केले
द्रौपदीला ॥२३१॥
राजसूय यज्ञी
द्रौपदीचे तुटे बिरडे
चतुर्भुज की गोविंदे
तिला केले ॥२३२॥
जाहले कौतुक
टकमक पाहती
पाठीराखा कमळापती
द्रौपदीचा ॥२३३॥
पाठीची बहीण
सुभद्रा होती जरी
प्रीती द्रौपदीची वरी
गोविंदाची ॥२३४॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी मीठ
नथीतील टीक
झळाळती ॥२३५॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी ताक
तिच्या दंडातील वाक
झळाळली ॥२३६॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी मठ्ठा
कमरेचा कमरपट्टा
झळकला ॥२३७॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी भात
नाकातील नथ
झळकली ॥२३८॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी खिरी
गळ्यातील सरी
झळकली ॥२३९॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी वडे
हातातील तोडे
झळकले ॥२४०॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी लोणचे
कृष्णाचे पान कोणचे
विचारिते ॥२४१॥
राजसूय यज्ञी
घंटानाद झाला
कृष्ण सांगे अर्जुनाला
शुकमहाराज आला ॥२४२॥
राजसूय यज्ञी
पूजा झाली ग कोणाची
झाली गोपाळकृष्णाची
गोविंदाची ॥२४३॥
द्रौपदीबाई म्हणे
नव्हे माझा सख्खा भाऊ
मायेचा कृष्णनाथ
किती त्याची वाट पाहू ॥२४४॥
द्रौपदीमाई म्हणे
जळो देवा माझे जिणे
कौरवांच्या सभे दुष्ट
गांजियले दुर्योधने ॥२४५॥
वस्त्र फेडी दुर्योधन
पहिला पितांबर
पाठीशी दामोदर
द्रौपदीच्या ॥२४६॥
वस्त्र फेडी दुर्योधन
दुसरी पैठणी
पाठीशी चक्रपाणी
द्रौपदीच्या ॥२४७॥
वस्त्र फेडी दुर्योधन
तिसरी वल्लरी
पाठीशी मुरारी
द्रौपदीच्या ॥२४८॥
वस्त्र फेडी दुर्योधन
चवथा ग शेला
पाठीशी सावळा
द्रौपदीच्या ॥२४९॥
वस्त्र फेडी दुर्योधन
पाचवे अमोल
पाठीशी घननीळ
द्रौपदीच्या ॥२५०॥
वस्त्र फेडी दुर्योधन
सहावे जरतारी
पाठीशी कंसारी
द्रौपदीच्या ॥२५१॥
वस्त्रे फेडूनीया
पापी चांडाळ दमला
कैवारी कृष्ण झाला
द्रौपदीचा ॥२५२॥
तुळशीपानांच्या
लाविल्या पत्रावळी
जेविले वनमाळी
द्वारकेत ॥२५३॥
देव भावाचा भुकेला
विदुराच्या कण्या खातो
अर्जुनाचे घोडे धुतो
नारायण ॥२५४॥
देव भावाचा भुकेला
विदुराच्या कण्या भक्षी
अर्जुनाचे घोडे रक्षी
नारायण ॥२५५॥
पांडवांची घरे
सोनियाच्या भिंती
एवढ्या इमारती
सोडून गेले रात्री ॥२५६॥
चक्रव्युही शिरे
पुत्र प्रतापी पार्थाचा
भाचा प्रत्यक्ष कृष्णाचा
अभिमन्यू ॥२५७॥
चक्रव्यूही शिरे
लाडका अर्जुनाचा
पती उत्तराबाईचा
अभिमन्यू ॥२५८॥
अभिमन्यू बाळ
सिंहाचे ग पिलू
लागले सारे पळू
कौरवांचे ॥२५९॥
अभिमन्यू बाळ
गरुडाचे ग पिलू
लागले सारे पळू
कौरवांचे ॥२६०॥
अभिमन्यू बाळ
सर्व मिळून मारिती
अधर्मयुद्ध करिती
द्रोणादीही ॥२६१॥
उत्तरेचा कंथ
लढून पडला
पाय त्याला हो मारिला
जयद्रथे ॥२६२॥
गोविंद गोविंद
मुखाने म्हणत
रणांत पडत
अभिमन्यू ॥२६३॥
गोविंद गोविंद
मंजुळ मुखी वाचा
पती पडे उत्तरेचा
रणांगणी ॥२६४॥
दुरुन दिसतो
सोन्याचा कळस
कृष्ण - अर्जुनांचा रथ
येत असे ॥२६५॥
कळीचा नारद
त्रैलोक्यात हिंडे
दुष्टांचे धिंडवडे
करीतसे ॥२६६॥
कळीचा नारद
उभारितो शेंडी
विणा तो खाकुंडी
शोभे सदा ॥२६७॥
कळीचा नारद
उडते त्याची शेंडी
उच्चार सदा तोंडी
रामनामाचा ॥२६८॥
कळीचा नारद
त्याचे रुप कोणा कळे
दुष्टांचा गर्व गळे
त्याच्यामुळे ॥२६९॥
वाल्याचा वाल्मिकी
नारदाने केला
असा कोण आहे
संती नाही उद्धरिला ॥२७०॥
तुळशी करु पूजा
तुळशीला आल्या शेंगा
पतिव्रता माझी गंगा
उषाताई ॥२७१॥
तुळशी गं बाई
हिरवा तुझा पाला
सत्यभामेने गोविंदाला
दान दिले ॥२७२॥
तुळशीला पाणी घाली
तुळस कोवळी
पुत्र मागते सावळी
उषाताई ॥२७३॥
तुळशी गं बाई
तुझा जन्म रानीवनी
बैस अंगणात
जागा देते वृंदावनी ॥२७४॥
तुळशीला पाणी घाली
तुळशीखाली बसे
प्रत्यक्ष गंगा दिसे
मायबाई ॥२७५॥
सकाळी उठोनी
तोंड पाहिले एकीचे
माझ्या जीवाच्या सखीचे
तुळशीबाईचे ॥२७६॥
तुळस पिकली
तिला आल्या शेंगा
तिला पाणी घाली
माउली माझी गंगा ॥२७७॥
तुळशी गं माये
तुझ्या मंजुळ्या झळकती
तेथे कृष्णनाथ खेळती
सारीपाट ॥२७८॥
काशी काशी म्हणून
लोक जाती गं धावत
काशी माझ्या अंगणात
तुळसादेवी ॥२७९॥
तुळशी ग बाई
तुझे वाळून झाले फाटे
पलंगाला केली गाते
गोविंदाच्या ॥२८०॥
तुळशी ग माई
हिरवा तुझा पाला
शेल्याला रंग दिला
भाईरायांनी ॥२८१॥
तुळशी ग बाई
तुझी कातर कातर पाने
येता जाता गोविंदाने
विडा नेला ॥२८२॥
काशी काशी म्हणूनी
लोक जाती दुरी
काशी माझ्या घरी
तुळसादेवी ॥२८३॥
संध्याकाळ झाली
वाजले गं सात
तुळशीला हात
जोडीयेले ॥२८४॥
देव गणपती
शारदा सरस्वती
मोरावरी ॥१॥
मोरया रे देवा
तुला दुर्वांची आवडी
एकविसांची जुडी
बाळासाठी ॥२॥
मोरया रे देवा
लाडू घे सोंडेवरी
पुत्र दे मांडीवरी
उषाताईला ॥३॥
मोरया देवाला
केले दुर्वांचे आसन
झाला मोरया प्रसन्न
भाईरायाला ॥४॥
मोरया रे देवा
तुला लिंपीन शेंदूर
पुत्र दे सुंदर
उषाताईला ॥५॥
मोरया रे देवा
तुला जास्वंदीचे फूल
मांडीये देई मूल
उषाताईला ॥६॥
मोरया रे देवा
सारी विघ्ने ही हाकावी
तान्हे बाळाला राखावी
दूरदेशी ॥७॥
मोरया रे देवा
सारी विघ्ने कर दूर
निर्विघ्न माझा कर
संवसार ॥८॥
आणा गणेशाला
गणेशचतुर्थीला
देईल सुदबुद्धीला
तान्हे बाळ ॥९॥
आणावा गणेश
विघ्ने तो करी दूर
सुखाला येवो पूर
गोपू बाळाच्या ॥११॥
आणावा गणेश
त्याला वाहू हिरव्या दुर्वा
प्रार्थू मनोरथ पुरवा
गणराया ॥१२॥
आणावे नारळ
करीन एकवीस मोदक
देव सिद्धिविनायक
कृपा करो ॥१३॥
संकष्ट चतुर्थी
आहे माझा नेम
भाचा सांगेन ब्राम्हण
गोपू बाळा ॥१४॥
संकष्ट चतुर्थी
चंद्र दिसतो हिरवा
सखी वेचते दुरवा
पूजेसाठी ॥१५॥
सर्वांच्या मागून
शिवाची करिती पूजा
भोळ्या सांबालागी माझा
प्रणिपात ॥१६॥
खोलामध्ये नांदे
नाही त्याचा गाजवाजा
भोळ्या सांबा माझा
नमस्कार ॥१७॥
रानीवनी वसे
माझा कैलासीचा राजा
भोळ्या सांबालागी माझा
प्रणिपात ॥१८॥
स्मशानी वसती
अंगाला विभूती
पती तो पार्वती
वरीतसे ॥१९॥
सर्पाची वेटाळी
ज्याच्या गळा वेढे देती
पती तो पार्वती
वरीतसे ॥२०॥
भैरव भुतांची
नाचे मंडळी सभोती
पती तो पार्वती
वरीतसे ॥२१॥
हातात डमरु
त्रिशूळ दुज्या हाती
पती तो पार्वती
वरीतसे ॥२२॥
नंदीचे वाहन
चंद्रमा माथ्यावरती
पती तो पार्वती
वरीतसे ॥२३॥
जगाचे कल्याणा
हलाहल सुखे पीती
पती तो पार्वती
वरीतसे ॥२४॥
जगाच्या कल्याणा
विषाचा घोट घेती
नीळकंठ झाली कीर्ती
शंकराची ॥२५॥
भोळा महादेव
या भोळा म्हणू नये
त्याच्या जटेमध्ये
गुपित गंगा वाहे ॥२६॥
भोळा महादेव
भोळे याचे देणे
त्याने मला दिले
त्याच्या विभूतीचे सोने ॥२७॥
भोळा महादेव
क्षणी प्रसन्न होतसे
दुष्ट असो सुष्ट असो
वर मागे तो देतसे ॥२८॥
भोळा महादेव
त्याला वाहा शिवामूठ
मग संसारी सुखाची
उषाताई तुला लूट ॥२९॥
चिलू माझा वेसारा
पापड पसारा
निघाला वेसवारा
कैलासात ॥३०॥
चिलू माझा दाणीया
भांगी भरल्या गोणीया
निघाल्या पेणीया
कैलासात ॥३१॥
त्रिश्चरण चेतवली
महानंदा घाली उडी
आला धावूनी तातडी
महादेव ॥३२॥
कुक्कुट मर्कुट
महानंदेने पाळीले
भद्रसेनेकडे आले
पुत्र दोन्ही ॥३३॥
पतिव्रता मोठ्या
पार्वती सावित्री
पवित्री धरित्री
त्यांच्यामुळे ॥३४॥
योगिनी सावित्री
यमापाशी गेली
पति घेऊनिया आली
स्वर्गातूनी ॥३५॥
पतिव्रता सावित्री
प्रतिज्ञा करुनी गेली
पति घेऊनिया आली
स्वर्गातूनी ॥३६॥
योगिनी सावित्री
संतोषवी यमराणा
मागते चुडेदाना
त्याचेपाशी ॥३७॥
सासू - सासर्यांच्या
आज्ञे गेली अरण्यात
जाहली कृतार्थ
दोघेजण ॥३८॥
यमाचे पाशातून
पति सोडवी सावित्री
जगती तिची कीर्ती
नारी गाती ॥३९॥
पति असे पाशी
धैर्य बसे त्याच्यापाशी
नाही झाली गोष्ट अशी
भूमंडळी ॥४०॥
सावित्री सावित्री
जरी म्हणतील ओठ
सौभाग्य नाही तुट
भूमंडळी ॥४१॥
सावित्री सावित्री
जरी म्हणतील नारी
त्यांचे या संवसारी
वज्रचुडे ॥४२॥
सावित्री सावित्री
म्हणती ज्या नारी
मंगळसूत्र दोरी
अक्षै त्यांची ॥४३॥
सावित्रीचे व्रत
करील जी नारी
जन्म सावित्री संसारी
होईल ती ॥४४॥
सावित्रीचे व्रत
करावे पवित्र
एकावे चरित्र
सावित्रीचे ॥४५॥
यमधर्माला आडवी
पतिव्रता किती मोठी
अपूर्व केल्या गोष्टी
सावित्रीने ॥४६॥
सावित्रीचा महिमा
अमर भूमंडळी
अबला झाली बळी
यमाहून ॥४७॥
सतीच्या प्रभावे
काळही मणी खचे
नाव घ्या सावित्रीचे
संसारात ॥४८॥
रामाची गं सीता
लक्ष्मणाची ग वयनी
दशरथाची पहिली
ज्येष्ठ सून ॥४९॥
पाचा वरुषांचे राम
अडचा वरुषींची सीता
धन्य तुझी दशरथा
सून आली ॥५०॥
सीतेला सासुरवास
कैकयीने केला
रामासारखा भ्रतार
तिला नाही भोग दिला ॥५१॥
अहिल्या शिळा झाली
गौतमाची कांता
रामराये वनी जाता
उद्धरली ॥५२॥
अहिल्या शिळा झाली
पतीच्या श्रापाने
दशरथाच्या लेकाने
उद्धरिली ॥५३॥
आश्चर्य आश्चर्य
रामरायाच्या पायाचे
शिळेतून वर येई
रुप अहिल्या सतीचे ॥५४॥
रामरायाच्या चरणाचा
भूमीला गं लागे कण
अहिल्या गं प्रगटली
न लागता एक क्षण ॥५५॥
राम लक्ष्मण
भरत शत्रुघ्न
चौघांमध्ये कोण
राज्य करी ॥५६॥
राम लक्ष्मण
गेले की काननात
भरत मनात
दुःखी कष्टी ॥५७॥
रामसीता वनी
माय कैकयी पाठवी
मनी भरत आठवी
नित्य त्यांना ॥५८॥
जटाधारी झाला
निजतो सुखे भुई
भरत जणू होई
वनवासी ॥५९॥
नको म्हणे राज्य
भरत कैकयीला
बंधू नाही असा झाला
जगत्रयी ॥६०॥
नंदिग्रामी राही
सदा रामनाप जपे
तपश्चर्या घोर तपे
भरत बंधू ॥६१॥
धन्य रे भरता
धन्य रे तू भाऊ
तुझी कीर्ती राहू
चिरजीव ॥६२॥
धन्य रे भरता
धन्य रे तुझे मन
तुझ्या स्मरणे लोचन
भरुनी येती ॥६३॥
धन्य रे भरता
धन्य रे तुझी भक्ती
आलेले राज्य हाती
सोडिले तू ॥६४॥
धन्य रे भरता
धन्य रे तुझी निष्ठा
आलेले राज्य हाता
सोडियेले ॥६५॥
राम चाले रथी
लक्ष्मण चाले पायी
एवढ्या पृथ्वीवर
असा बंधू झाला नाही ॥६६॥
राम चाले वाटे
लक्ष्मण झाडी खडे
असे बंधू झाले थोडे
पृथ्वीवर ॥६७॥
राम चाले वाटे
लक्ष्मण झाडी काटे
असे बंधू नाही कोठे
संसारात ॥६८॥
राम चाले वाटे
लक्ष्मण झाडी पाला
असा बंधू नाही झाला
भूमंडळी ॥६९॥
राम चाले वाटी
लक्ष्मण झाडी माती
असे बंधू झाले किती
कोण सांगा ! ॥७०॥
राम सीता वनी
लक्ष्मण फळे आणी
असा बंधू त्रिभुवनी
भाग्य भेटे ॥७१॥
रामकुंडावरी
हिरवा मंडप जाईचा
आंघोळीला आला
पुत्र कौसल्याबाईचा ॥७२॥
रामाच्या आंघोळीला
पाणी नाही विसाणाला
अमृताचे झरे
लाविले गं पाषाणाला ॥७३॥
रामकुंडावरी
रामरायाची आंघोळी
सावळी सीताबाई
तेथे काढिते रांगोळी ॥७४॥
रामकुंडावरी
रामराया संध्या करी
सावळी सीताबाई
अमृताने तांब्या भरी ॥७५॥
रामकुंडावरी
रामरायाची आरती
सभामंडपात
हात जोडून मारुती ॥७६॥
रामकुंडावरी
कुंवारणींची झाली दाटी
परकर चोळ्या वाटी
सीताबाई ॥७७॥
रामकुंडावरी
ब्राह्मणांची झाली दाटी
धोतरजोडे वाटी
रामराया ॥७८॥
रामकुंडावरी
सवाष्णीची झाली दाटी
हळदीकुंकू वाटी
सीतादेवी ॥७९॥
रामकुंडावरी
रामरायाची बिछाई
तेथे पाय चेपी
सावळी सीताबाई ॥८०॥
रामकुंडावरी
रामरायाची बिछाई
तेथे विडा देते
सावळी सीताबाई ॥८१॥
रामाला आला घाम
सीता पुसते घोळाने
पाहातसे तिच्या मुखा
रामराया गं प्रेमाने ॥८२॥
रामराया आला घाम
सीताबाई घाली वारा
पतिसंगतीत प्रेमे
वनवास कंठी सारा ॥८३॥
रामरायाला पडसे
सीता देते त्याला आले
पंचवटीमध्ये त्यांचे
पर्णकुटी घर झाले ॥८४॥
रामराया लावी
जाई मोगर्यांची फुले
सावळी सीताबाई
शिंपीतसे त्यांना दळे ॥८५॥
रामाला पुसते
सीता पाखरांची नावे
रामरायाने हसावे
कौतुकाने ॥८६॥
सीता रागावली
रानी रुसून बैसली
रामराये हसविली
स्पर्शमात्रे ॥८७॥
लक्ष्मण आणि
सीतामाईला मोरपीसे
सावळी सीताबाई
त्यांचे करीतसे पंखे ॥८८॥
राम लक्ष्मण
जसे मोतियांचे बाण
मध्ये शोभे सूर्यपान
सीताबाई ॥८९॥
राम लक्ष्मण
मोतियांची जोडी
मध्ये शोभती लालडी
सीताबाई ॥९०॥
राम लक्ष्मण
जसे धनुष्य बाण
मध्ये लावण्याची खाण
सीतादेवी ॥९१॥
राम लक्ष्मण
जसे मोतियांचे हार
शेवंती सुकुमार
सीताबाई ॥९२॥
सीता वनवासी
झाडांशी सांगे गोष्ट
दुष्ट ग रावण
तेथे ठेवी पापी दुष्टी ॥९३॥
सोन्याच्या चोळीचा
मोह सीतेला सुटला
कोण प्रपंची विटली
सर्व सुखा ॥९४॥
सीतेला लोभ जडे
रामराया मोह पडे
होणार ते ते घडे
लल्लाटीचे ॥९५॥
जटायू तो पक्षी
रामासाठी मेला
मरुन धन्य झाला
संसारात ॥९६॥
शबरीची बोरे
उष्टीमाष्टी खाशी
तू रे दिसशी अधाशी
रामराया ॥९७॥
शबरीची बोरे
उष्टीमाष्टी खाशी
शतजन्माचा
उपाशी रामराया ॥९८॥
शबरीची बोरे
एकटा राम खाई
सीतेचे त्याच्याशी
मग गोड भांडण होई ॥९९॥
शबरीची बोरे
अमृताहून गोड
कोण ठेविल त्यांना खोड
त्रैलोक्यात ॥१००॥
शबरीची बोरे
रामे मटकावीली
शबरी मुक्त केली
संसारात ॥१०१॥
सीतेच्या शोधासाठी
रामाने दिली सरी
मारुती गं राया
मग पडला विचारी ॥१०२॥
सीतेच्या शोधासाठी
रामाने दिली माळ
समुद्र लंघुनी
गेले अंजनीचे बाळ ॥१०३॥
अशोकाचे खाली
सीता रडतसे
मारुती देतसे
आश्वासन ॥१०४॥
अशोकाचे खाली
सीताबाई शोक करी
हनुमंते खूण दिली
रामरायाची ॥१०५॥
अशोकाचे खाली
सीतेची गळेसरी
तेथे मारुतीची फेरी
रात्रंदिस ॥१०६॥
अशोकाचे खाली
सीतेचा कमरपट्टा
तेथे मारुती झपाटा
रात्रंदिस ॥१०७॥
अशोकाचे खाली
सीतामाईचे कांकण
तेथे मारुती राखण
रात्रंदिवस ॥१०८॥
अशोकाचे खाली
सीताबाईची ही नथ
तेथे मारुतीचा पथ
रात्रंदिवस ॥१०९॥
अशोका फुले
शेंदरी रंगाची
फार आवडीची
जानकीच्या ॥११०॥
अशोकाच्या झाडा
फुलांचा नित्य बहर
सीतादेवीच्या डोळ्यांचा
त्याला मिळतो पाझर ॥१११॥
अशोकाची फुले
झुबके झुबके
पाहते कौतुके
दुःखी सीता ॥११२॥
अशोकाच्या झाडा
सीता घाली पाणी
नेत्र येतात भरोनी
रात्रंदिस ॥११३॥
अशोकवचनी
का हो सुकुमार फुले
जानकीच्या नेत्रातील
पोसली ती नित्य जळे ॥११४॥
अशोकवनींच्या
फुलांना का गोड वास
जानकीच्या त्यांना लागे
नित्य श्वासोच्छवास ॥११५॥
अशोकवनात
फुलांचा सडा पडे
परंतु सीता रडे
रात्रंदिस ॥११६॥
सागरावरती
सेतू बांधिला बाणांचा
दशरथाच्या पुत्राचा
पराक्रम ॥११७॥
सागरावरती
सेतू बांधला वानरी
तुझ्यासाठी ग सुंदरी
सीताबाई ॥११८॥
राम टाकी शिळा
परि बुडाल्या त्या तळी
रामाच्या नावाची
शिळा परि तरे जळी ॥११९॥
हसून मारुती
म्हणे राम रघुनाथा
देवा, तुमच्याहीपेक्षा
तुमच्या नावाची योग्यता ॥१२०॥
रामाच्या नावाने
शिळा सिंधूत तरती
आणि शिवाशंकराच्या
विषवेदना थांबती ॥१२१॥
रामाच्या नावाने
शिळा सागरी तरती
संसारी त्याच्या नावे
जडमूढ उद्धरती ॥१२२॥
राम चाले वाटे
लक्ष्मण झाडी वाळू
रामाचे बाण हळू
लंकेवरी ॥१२३॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे राख
रामाचे बाण लाख
लंकेवरी ॥१२४॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे वाळू
रामाचे बाण हळू
लंकेवरी ॥१२५॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडती दगड
रामाचे बाण रगड
लंकेवरी ॥१२६॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे रेती
रामाचे बाण येती
लंकेवरी ॥१२७॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे चुना
रामाचे बाण पुन्हा
लंकेवरी ॥१२८॥
हस्ते झाले मस्त
गगनी उडे गोळा
रामाचे बाण सोडा
लंकेवरी ॥१२९॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे सूप
रामाचे बाण खूप
लंकेवरी ॥१३०॥
हस्ती झाले मस्त
आकाशी काळोख
रामाचे बाण लाख
लंकेवरी ॥१३१॥
हस्ती झाले मस्त
गगनी अंधार
रामाची बाणधार
लंकेवरी ॥१३२॥
हस्ती झाले मस्त
गगनी उडे माती
रामाचे बाण येती
लंकेवरी ॥१३३॥
इंद्रजीत मारी
लक्ष्मण ब्रह्मचारी
रडते त्याची नारी
सुलोचना ॥१३४॥
बारा वर्ष राही
निराहार ब्रह्मचारी
म्हणून सौमित्र
रावणाच्या पुत्रा मारी ॥१३५॥
मारिला इंद्रजित
दिली दऊत देखणी
लक्ष्मुणे घात केला
भुजा दाखवी लिहुनी ॥१३६॥
रामाचे ह्रदय
कठिण वज्राचे
अग्नीत सीतेचे
सत्त्व पाही ॥१३७॥
रामाचे ह्रदय
जणू कठिण पाषाण
फूल आगीत घालून
बघतसे ॥१३८॥
पुष्पक विमानी
रामाच्या जवळी
शोभली सावळी
सीताबाई ॥१३९॥
शोभली जानकी
रामरायाच्या मांडीवरी
सीतेच्या तोंडावरी
प्रसन्नता ॥१४०॥
भरता भेटला
भेटला ह्रदयाला
रामरायाने न्हाणीला
नेत्रजळे ॥१४१॥
भरताच्या पाठीवर
राम फिरवितो हात
बारा वरसांचे कष्ट
दूर केले ॥१४२॥
बारा वरसांनी
कौसल्या भेटे रामा
ह्रदयी दाटे प्रेमा
माउलीच्या ॥१४३॥
कौसल्या माउली
रामाला धरी पोटी
उमटेना शब्द ओठी
काही केल्या ॥१४४॥
वाजंत्री वाजती
वाजती माळावर
राज्य अभिषेक
कौसल्याच्या बाळावर ॥१४५॥
वाजंत्री वाजती
चला सख्यांनो पाहायला
रामाची आरती
जाते मारुतीरायाला ॥१४६॥
राम लक्ष्मण
अर्धांगी सीता नारी
सेवेशी ब्रह्मचारी
मारुतीराय ॥१४७॥
राम लक्ष्मण
अर्धांगी सीता शोभे
सेवेशी दास उभे
मारुतीराय ॥१४८॥
सतरंज्यांना ठसे
लोडांना आरसे
रामरायाच्या सभे बसे
मारुतिराय ॥१४९॥
सतरंज्यांना ठसे
शोभती कमानी
रामरायाच्या दिवाणी
मारुतीराय ॥१५०॥
शिंदेशाही तोडे
सीताबाईच्या हातात
रामरायाच्या रथात
उजेड पडे ॥१५१॥
शिंदेशाही तोडे
राम सीतेला देणार
रामरायाच्या रथात
त्याचा उजेड पडणार ॥१५२॥
चला जाऊ पाहू
रामरायाची बिछाई
शेजारी रत्न टीक
सीताबाई ॥१५३॥
चला जाऊ पाहू
रामरायाची बैठक
हसून विडा देई
सीताबाई ॥१५४॥
नदीपलीकडे
कोणाची पालखी
रामरायाची जानकी
उतरली ॥१५५॥
मोठी मोठी मोती
रामरायाच्या सदर्याला
राणी मागते गजर्याला
सीताबाई ॥१५६॥
मोठी मोठी मोती
रामरायाच्या कोटाला
राणी मागते गोटाला
सीताबाई ॥१५७॥
मोठी मोठी मोती
रामरायाच्या पगडीला
राणी मागते बुगडीला
सीतादेवी ॥१५८॥
शिंदेशाही तोडे
सीताबाई कधी केले
राम इंदूरला गेले
त्याच्यासाठी ॥१५९॥
शिंदेशाही तोडे
राम सीतेला देणारा
पंचवटीचे सोनार
कारागीर ॥१६०॥
मोठी मोठी मोती
रामरायाच्या पलंगाला
राणी मागे लवंगाला
सीतादेवी ॥१६१॥
मोठी मोठी मोती
रामरायाच्या जोड्याला
राणी मागते तोड्याला
सीतादेवी ॥१६२॥
राम रथामध्ये
लक्ष्मण घोड्यावरी
मधून जाते डोली
जानकीची ॥१६३॥
सीतेला डोहाळे
रामाला काय कळे
निंबोणी रस गळे
शेल्यावरी ॥१६४॥
सीतेला डोहाळे
रामाला सांगावे
रुमाली आणावे
बाळ आंबे ॥१६५॥
सीता वनवासी
दगडाची केली उशी
अंकुश बाळ कुशी
वाढतसे ॥१६६॥
सीता वनवासी
दगडाची केली उशी
एवढ्या अरण्यात
तिला झोप आली कशी ॥१६७॥
सीता वनवासी
वनी कंटकांची दाटी
पाच महिन्यांचा
अंकुश बाळ पोटी ॥१६८॥
सीता वनवासी
दगडाची करी गादी
एवढ्या अरण्यात
तिला झोप आली कशी ॥१६९॥
सीता वनवासी
दगडाची केली बाज
अंकुश बाळ नीज
वनामध्ये ॥१७०॥
पाच महिन्याचा
अंकुश असे पोटी
घोर अरण्यात
सीतामाई केर लोटी ॥१७१॥
बाणामागे बाण
बाण येतील मागे पुढे
रामाच्या बाणांचे
लवांकुश कडी - तोडे ॥१७२॥
बाणांमागे बाण
बाण येती ग पिवळे
रामाशी लढती
लवांकुश ग कोवळे ॥१७३॥
बाणामागे बाण
बाण येती झराझरा
रामाच्या बाणांचा
लवांकुश ग कडदोरा ॥१७४॥
सीतेला सासुरवास
असा केला केसोकेसी
सीता गेली निजघामा
तिने वाटला देशोदेशी ॥१७५॥
सीतेला सासुरवास
असा केला परोपरी
सीता गेली निजधामा
तिने वाटला घरोघरी ॥१७६॥
सीतेला वनवास
कैकयीने नेली फणी
तिने बारा वर्षे वेणी
वर्ज्य केली ॥१७७॥
सीतेला सासुरवास
कैकयीने केला
बारा वर्षे दिला
वनवास ॥१७८॥
सीतेला डोहाळे
कैकयीने केले
राम नाही दाखविले
बारा वर्षे ॥१७९॥
सीता सांगे कथा
आपुल्या कर्माची
पापिष्टा रावणाची
लंका जळली ॥१८०॥
राम गेल वना
मारिले रावणा
राज्य दिले बिभीषणा
सोनियाचे ॥१८१॥
सीता सांगे स्वप्न
ऐक रे शहाण्या
सवतीवरी कन्या
देऊ नये ॥१८२॥
सीता सांगे स्वप्न
ऐक मंदोदरी
राम लंकेवरी
स्वार झाले ॥१८३॥
सीता सांगे स्वप्न
ऐक मंदोदरी
इंद्रजीत मारी
लक्ष्मण ॥१८४॥
सीता सांगे स्वप्न
ऐक मंदोदरी
राक्षस वानरी
संहारिले ॥१८५॥
सीतेच्या श्रापाने
डोंगर जळती
वानर म्हणती
रामनाम ॥१८६॥
सीतेच्या श्रापाने
लंकेची झाली होळी
तोंडे झाली काळी
वानरांची ॥१८७॥
आधी नमन करु
अंजनीच्या सुता
मारुती हनुमंता
रामभक्ता ॥१८८॥
आधी नमन करु
अंजनीबाईला
मग मारुतीरायाला
तिच्या पुत्रा ॥१८९॥
अंजनीबाई म्हणे
बाळ माझा बळिवंत
द्रोणागिरी पर्वत
उचलिला ॥१९०॥
घडीत आणीला
पर्वताचा चेंडू
हनुमंत वंदू
रामदूत ॥१९१॥
मनाचाही वेग
मारुतीच्या मागे
लंकेला रागे रागे
जाळीतसे ॥१९२॥
एकाच उडीत
समुद्र ओलांडी
जाऊनी सीता बंदी
रामदूत ॥१९३॥
रामाचा सेवक
मारुतीराया तो मानाचा
विडा पिकल्या पानांचा
सुकुनी गेला ॥१९४॥
पहाटेच्या प्रहर रात्री
मला वेशीकडे जाणे
त्याचे दर्शन आहे घेणे
मारुतीरायाचे ॥१९५॥
राम राम म्हणत
दारावरुन कोण गेला
रामराया तुझा चेला
मारुतीराय ॥१९६॥
राम राम म्हणुनी
नदीत कोण गेला
रामराया तुझा चेला
मारुतीराय ॥१९७॥
माझा गं दयाळू
वेशीच्या बाहेर उभा
मारुतीरायाचा
शेंदरी लाल झगा ॥१९८॥
रामाच्या बैसली
अर्धांगी सीता नार
सेवेला ब्रह्मचारी
मारुतीराय ॥१९९॥
ध्यान गं यशोदा
नेसली कशीदा
मांडिये मुकुंदा
न्हाणीयेले ॥२००॥
दैवाची यशोदा
नेसली पिवळे
मांडिये सावळे
परब्रह्म ॥२०१॥
दैवाची यशोदा
नेसली शेलारी
बैसली श्रीहरी
दूध पाजू ॥२०२॥
दैवाची यशोदा
नेसली पातळ
मांडीये घननीळा
नाचतसे ॥२०३॥
कृष्णाची यशोदा
नेसली जरतारी
मांडिया मुरारी
दूध पीई ॥२०४॥
यशोदेचे निर्या
कृष्ण धरुन उभा राही
चंद्रमा म्हणे देई
खेळावया ॥२०५॥
गायींना चारितो
यमुनेच्या तटी
भक्तांना संकटी
सांभाळितो ॥२०६॥
कृष्ण टाकी उडी
कळंब कडाडला
शेष दणाणला
पाताळात ॥२०७॥
कृष्ण उडी टाकी
कळंबाच्या मेजे
यमुने पाणी तुझे
गढूळले ॥२०८॥
गायीगुरे चारी
वाजवितो पावा
गोपाळकृष्ण घ्यावा
गोकुळीचा ॥२०९॥
खांदिये घोंगडी
अधरी धरी पावा
गोपाळकृष्ण गावा
गोकुळीचा ॥२१०॥
हाती शोभे काठी
गवळे सवंगडी
खांदिये घोंगडी
कृष्णजीच्या ॥२११॥
मोरमुगुट माथा
गळा वनमाळा
स्मरावा सावळा
गोकुळीचा ॥२१२॥
गोपाळकाला करी
यमुनेच्या तीरी
होऊन गोवारी
नंदजीचा ॥२१३॥
दैवाचा तू नंद
धन्य दैवाची यशोदा
आनंदाच्या कंदा
खेळविले ॥२१४॥
ज्याच्या नावे होती
संसारात मुक्त
यशोदा बांधीत
त्याला दावे ॥२१५॥
राक्षस संहारी
काळिया विहारी
यशोदा त्याला मारी
वेताटीने ॥२१६॥
तोंडात दाखवी
विश्व ब्रह्मांड सगळे
तेव्हा यशोदे कळले
बाळरुप ॥२१७॥
कृष्णे काळियाची
मर्दियेली फणी
काढीयला मणी
मस्तकींचा ॥२१८॥
गोविंद गोविंद
गोविंद ध्यानी मनी
गोविंद गोपांगणी
क्रीडा करी ॥२१९॥
वाजवून पावा
वेध लावी सर्वां
गोपाकृष्ण घ्यावा
गोकुळीचा ॥२२०॥
दही, दूध, लोणी
चोरुन वाटितो
कौतुक करितो
बाळकृष्ण ॥२२१॥
का गं सखी तुझे
डोळे लाल धुंद
काननी गोविंद
वाजवितो ॥२२२॥
गोवर्धनगिरी
बोटाने उचली
वाढतो गोकुळी
कंस शत्रू ॥२२३॥
गायी गोवर्धनी
चरती बारा राने
पावा जनार्दने
वाजविला ॥२२४॥
यशोदा म्हणते
कृष्ण माझा वरसाचा
कसा तो गोरसाचा
नाश करी ॥२२५॥
कृष्णनाथ काळा
जसा उडीदाचा दाणा
सोळा सहस्र गोपांगना
भुलविल्या ॥२२६॥
माझ्या दारावरुन
रंगीत गाडी गेली
कृष्णाने राधा नेली
गोकुळात ॥२२७॥
वाढता वाढता
सुटे द्रौपदीची चोळी
गोविंद सांभाळी
तिची लाज ॥२२८॥
चतुर्भुज केली
द्रौपदी निज सखी
भक्ताची लाज राखी
भगवंत ॥२२९॥
दोन हाती वाढी
दोन हाती बांधी
सावळी द्रौपदी
मांडवात ॥२३०॥
राजसूय यज्ञी
दुर्जन हसले
चतुर्भुज देवे केले
द्रौपदीला ॥२३१॥
राजसूय यज्ञी
द्रौपदीचे तुटे बिरडे
चतुर्भुज की गोविंदे
तिला केले ॥२३२॥
जाहले कौतुक
टकमक पाहती
पाठीराखा कमळापती
द्रौपदीचा ॥२३३॥
पाठीची बहीण
सुभद्रा होती जरी
प्रीती द्रौपदीची वरी
गोविंदाची ॥२३४॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी मीठ
नथीतील टीक
झळाळती ॥२३५॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी ताक
तिच्या दंडातील वाक
झळाळली ॥२३६॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी मठ्ठा
कमरेचा कमरपट्टा
झळकला ॥२३७॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी भात
नाकातील नथ
झळकली ॥२३८॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी खिरी
गळ्यातील सरी
झळकली ॥२३९॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी वडे
हातातील तोडे
झळकले ॥२४०॥
राजसूय यज्ञी
द्रौपदी वाढी लोणचे
कृष्णाचे पान कोणचे
विचारिते ॥२४१॥
राजसूय यज्ञी
घंटानाद झाला
कृष्ण सांगे अर्जुनाला
शुकमहाराज आला ॥२४२॥
राजसूय यज्ञी
पूजा झाली ग कोणाची
झाली गोपाळकृष्णाची
गोविंदाची ॥२४३॥
द्रौपदीबाई म्हणे
नव्हे माझा सख्खा भाऊ
मायेचा कृष्णनाथ
किती त्याची वाट पाहू ॥२४४॥
द्रौपदीमाई म्हणे
जळो देवा माझे जिणे
कौरवांच्या सभे दुष्ट
गांजियले दुर्योधने ॥२४५॥
वस्त्र फेडी दुर्योधन
पहिला पितांबर
पाठीशी दामोदर
द्रौपदीच्या ॥२४६॥
वस्त्र फेडी दुर्योधन
दुसरी पैठणी
पाठीशी चक्रपाणी
द्रौपदीच्या ॥२४७॥
वस्त्र फेडी दुर्योधन
तिसरी वल्लरी
पाठीशी मुरारी
द्रौपदीच्या ॥२४८॥
वस्त्र फेडी दुर्योधन
चवथा ग शेला
पाठीशी सावळा
द्रौपदीच्या ॥२४९॥
वस्त्र फेडी दुर्योधन
पाचवे अमोल
पाठीशी घननीळ
द्रौपदीच्या ॥२५०॥
वस्त्र फेडी दुर्योधन
सहावे जरतारी
पाठीशी कंसारी
द्रौपदीच्या ॥२५१॥
वस्त्रे फेडूनीया
पापी चांडाळ दमला
कैवारी कृष्ण झाला
द्रौपदीचा ॥२५२॥
तुळशीपानांच्या
लाविल्या पत्रावळी
जेविले वनमाळी
द्वारकेत ॥२५३॥
देव भावाचा भुकेला
विदुराच्या कण्या खातो
अर्जुनाचे घोडे धुतो
नारायण ॥२५४॥
देव भावाचा भुकेला
विदुराच्या कण्या भक्षी
अर्जुनाचे घोडे रक्षी
नारायण ॥२५५॥
पांडवांची घरे
सोनियाच्या भिंती
एवढ्या इमारती
सोडून गेले रात्री ॥२५६॥
चक्रव्युही शिरे
पुत्र प्रतापी पार्थाचा
भाचा प्रत्यक्ष कृष्णाचा
अभिमन्यू ॥२५७॥
चक्रव्यूही शिरे
लाडका अर्जुनाचा
पती उत्तराबाईचा
अभिमन्यू ॥२५८॥
अभिमन्यू बाळ
सिंहाचे ग पिलू
लागले सारे पळू
कौरवांचे ॥२५९॥
अभिमन्यू बाळ
गरुडाचे ग पिलू
लागले सारे पळू
कौरवांचे ॥२६०॥
अभिमन्यू बाळ
सर्व मिळून मारिती
अधर्मयुद्ध करिती
द्रोणादीही ॥२६१॥
उत्तरेचा कंथ
लढून पडला
पाय त्याला हो मारिला
जयद्रथे ॥२६२॥
गोविंद गोविंद
मुखाने म्हणत
रणांत पडत
अभिमन्यू ॥२६३॥
गोविंद गोविंद
मंजुळ मुखी वाचा
पती पडे उत्तरेचा
रणांगणी ॥२६४॥
दुरुन दिसतो
सोन्याचा कळस
कृष्ण - अर्जुनांचा रथ
येत असे ॥२६५॥
कळीचा नारद
त्रैलोक्यात हिंडे
दुष्टांचे धिंडवडे
करीतसे ॥२६६॥
कळीचा नारद
उभारितो शेंडी
विणा तो खाकुंडी
शोभे सदा ॥२६७॥
कळीचा नारद
उडते त्याची शेंडी
उच्चार सदा तोंडी
रामनामाचा ॥२६८॥
कळीचा नारद
त्याचे रुप कोणा कळे
दुष्टांचा गर्व गळे
त्याच्यामुळे ॥२६९॥
वाल्याचा वाल्मिकी
नारदाने केला
असा कोण आहे
संती नाही उद्धरिला ॥२७०॥
तुळशी करु पूजा
तुळशीला आल्या शेंगा
पतिव्रता माझी गंगा
उषाताई ॥२७१॥
तुळशी गं बाई
हिरवा तुझा पाला
सत्यभामेने गोविंदाला
दान दिले ॥२७२॥
तुळशीला पाणी घाली
तुळस कोवळी
पुत्र मागते सावळी
उषाताई ॥२७३॥
तुळशी गं बाई
तुझा जन्म रानीवनी
बैस अंगणात
जागा देते वृंदावनी ॥२७४॥
तुळशीला पाणी घाली
तुळशीखाली बसे
प्रत्यक्ष गंगा दिसे
मायबाई ॥२७५॥
सकाळी उठोनी
तोंड पाहिले एकीचे
माझ्या जीवाच्या सखीचे
तुळशीबाईचे ॥२७६॥
तुळस पिकली
तिला आल्या शेंगा
तिला पाणी घाली
माउली माझी गंगा ॥२७७॥
तुळशी गं माये
तुझ्या मंजुळ्या झळकती
तेथे कृष्णनाथ खेळती
सारीपाट ॥२७८॥
काशी काशी म्हणून
लोक जाती गं धावत
काशी माझ्या अंगणात
तुळसादेवी ॥२७९॥
तुळशी ग बाई
तुझे वाळून झाले फाटे
पलंगाला केली गाते
गोविंदाच्या ॥२८०॥
तुळशी ग माई
हिरवा तुझा पाला
शेल्याला रंग दिला
भाईरायांनी ॥२८१॥
तुळशी ग बाई
तुझी कातर कातर पाने
येता जाता गोविंदाने
विडा नेला ॥२८२॥
काशी काशी म्हणूनी
लोक जाती दुरी
काशी माझ्या घरी
तुळसादेवी ॥२८३॥
संध्याकाळ झाली
वाजले गं सात
तुळशीला हात
जोडीयेले ॥२८४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.