अबोल प्रेम.
आहे एक परी
थोडीशी लाजरी ,थोडीशी बावरी,
तरीही माझ्या मनाला हवी असणारी.
खुप प्रेम आहे माझं तिच्यावर,
आणि तिचंही तितकच माझ्यावर,
पण दोघांनीही बोट ठेवले होते तोंडावर,
आणि ठेवला होता दगड मनावर.
तिच्याही मनात तेच होते ,
जे होते माझ्या मनात ,
पण दोघांच्याही कंठातून
शब्द बाहेर यायला घाबरत होते.
खरं तर तिच्यावर प्रेम करतो अगदी लहानपणापासून ,
शाळेत तिच्या बाजूला बसायचो तेव्हापासून.
खूप काळ लोटून गेला
तरीही दोघांची मने अबोलच
परत मनामध्ये तोच विचार आला
आणि त्याच भावना काळजात तश्याच रूतून बसल्या होत्या सखोल.
आता माञ ठरवलं होत
दोघांच्याही मनानी
एकञ यायचं आहे दोघांनी आयुष्य जगायचं आहे एकमेकांच्या साथीनं
म्हणून प्रेमभावना व्यक्त ही केल्या थरथरत्या ओठानं
दोघांच्याही मनातील प्रेमभावना उत्कट झाल्या
मग माञ डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या
आता गाठ बांधायची आहे सूखी संसाराची एकञ यायचं आहे आयुष्यभरासाठी
आणि ग्वाही द्यायची आहे तिला
तू माझीच आहेस सात-जन्मासाठी......
......अभिजीत मस्कर