५) श्रीमहागणपतिस्मरण
गणानांत्वा शौनकोगृत्समदो गणपतिर्जगती ।
गणपतिस्मरणे विनियोगः ॥
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥
ऋद्धिसिद्धिसहितं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं श्रीमहागणपति स्मरामि श्रीमहागणाधिपतये नमः । निर्विघ्नं कुरु ॥ ( नमस्कार करावा )
६) आसनशुद्धी
( भूमीला स्पर्श करावा. )
पृथिवीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः कूर्मेः देवता । सुतलं छंदः । आसने विनियोगः ॥
ॐ पृथ्वि त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता । त्वं च धारय मां देवि पवित्रं करु चासनम् ॥ ऊर्ध्वकेशि विरूपाक्षि मांसशोणितभोजने । तिष्ठ देवि शिखाबंधे चामुंडे ह्यपराजिते ॥
७) भूतोत्सारण
( हातात अक्षता घेऊन दक्षिणेस फेकाव्या. )
अपसर्पन्तु वामदेवो भूतान्यनुष्टुप भूतोत्सादने विनियोगः । ॐ अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिताः । ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञया ॥
अपक्रामंतु भूतानि पिशाचा सर्वतो दिशम् । सर्वेषामविरोधेन पूजाकर्म समारभे ॥
तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पांतदहनोपम । भैरवाय नमस्तुभ्यमनुज्ञां दातुमर्हसि ॥
पूजाकर्म समारभै । वामपादतलपार्श्वेन भूमिं त्रिस्ताडयेत्
( डाव्या पायाच्या तळाचा भाग भूमीस तीन वेळा लावावा. )
देवा आयान्तु । यातुधाना अपयान्तु ॥
विष्णो देवयजनं रक्षस्व इति भूमौ प्रादेशं कूर्यात् ।
( उजव्या हाताचा अंगठा व तर्जनी भूमीला लावावी. )
मनुष्यगंधनिवारणे विनियोगः । येभ्यो माता इत्यस्य गयःप्लात ऋषिः, विश्वेदेवा देवता, जगती छन्दः । एवापित्र इत्यस्य वामदेवगौतम ऋषिः बृहस्पतिर्देवता, त्रिष्टुप् छन्दः ।
( गणपतीला नमस्कार करावा. )
८) षडंगन्यास
( शरीरशुद्धयर्थ मांडे घालून दोन्ही हातांनी न्यास करावे. )
अंगुष्ठाभ्यां नमः । हृदयाय नमः ।
( तर्जनी, मध्यमा व अनामिका यांनी हृदयाला स्पर्श करावा. )
तर्जनीभ्यां नमः । शिरसे स्वाहा ।
( अंगुली व मध्यमा यांनी मस्तकाला स्पर्श करावा. )
मध्यमाभ्यां नमः । शिखायै वषट् ॥
( तर्जनी, मध्यमा व अंगुष्ठ यांनी शेंडीच्या जागी स्पर्श करावा. )
अनामिकाभ्यां नमः । कवचाय हुम् ॥
( दोन्ही हातांनी स्कंधापासून नाभीपर्यंत स्पर्श करावा. )
कनिष्ठिकाभ्यां नमः । नेत्रत्रयाय वौषट् ॥
( तर्जनी, मध्यमा व अनामिका यांनी नेत्र व ललाट यांना स्पर्श करावा. )
करतलकरपृष्ठाभ्यां नमः । अस्त्राय फट् । भूर्भुवस्वरोम् इति दिग्बंधः ॥
( दोन्ही हातांनी टाळी वाजवावी. )
९) कलशपूजा
( पाणी भरलीला कलशाला गंध व अक्षता लावलेले फूल चिकटवावे. )
कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः ।
मूले तत्र स्थितो ब्रह्माः मध्ये मातृगणाः स्मृताः ॥
कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ।
ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो ह्यथर्वणः ॥
अंगेश्व सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः ।
अत्र गायत्रीसावित्री शांतिः पुष्टिकरी तथा ।
आयान्तु देवपूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन्सन्निधिं कुरु ॥
कलशाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।
( नमस्कार करावा )
( भारतीय संस्कृतीत कलश हे मांगल्याचे प्रतीक शुभकार्यात कलशाची पूजा करण्याची प्रथा आहे. कलशपूजा म्हणजे अखिल ब्रह्मांडाची पूजा. कलशात सारे ब्रह्मांड सामावलेले आहे. कलशाच्या मुखी विष्णू, कंठामध्ये शंकर, तळाशी ब्रह्मा, मध्याभागी देवमाता म्हणजे मातृगण स्थित आहेत. कलशात सर्व सागरांचे पवित्र जल व सप्तखंडात्मक पृथ्वी समाविष्ट आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चारही वेदांचे यात वास्तव्य मानले असून, आपल्या सहा अंगासह सर्व वेद या कलशात आहेत. गायत्री, सावित्री नित्य शांती, पुष्टी देणार्या देवतांचे अधिष्ठान या कलशात आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सात नद्यांचे जल असून, 'तूच शिव, तूच विष्णू, तूच ब्रह्मा यांचे प्रतीक असणार्या कलशरूपी ब्रह्मांडदेवते, तुझ्यात सारी पंचमहाभूते व प्राणशक्तीचे वास्तव्य आहे' अशी ही प्रार्थना आहे. कलशपूजा ही सर्व ब्रह्मांडसमावेशक आहे. कलशाशिवाय कोणतीही पूजा होत नाही; म्हणून हे सर्व सांगितले आहे. )
१०) शंखपूजा
( शंखाला स्नान घालून गंध, पुष्प घालावे. शंखमुद्रा दाखवून नमस्कार करावा.)
शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता ।
पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥
त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवाय चाज्ञया ।
शंखे तिष्ठतिं विप्रेन्द्र तस्माच्छंखं प्रपूजयेत् ॥
त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृत करे ।
नमितः सर्वदेवेश्च पाञ्चजन्य नमोऽस्तु ते ॥
ॐ पाञ्चजन्याय विद्महे । पावमानाय धीमहि ।
तन्नः शंख प्रचोदयात् । शंखाय नमः ।
सकलपूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि ॥
११) घंटापूजा
घंटानादं कुर्यात् ( घंटा वाजवावी )
आगमनार्थे तु देवानां गमनार्थ तु रक्षसाम् ।
कुर्वे घंटारवं तत्र देवताऽह्वानलक्षणम् ॥
घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
( घंटेला गंध, अक्षता, फूल, हळदकुंकू वाहावे. )
१२) दीपपूजा
( समईला फुलाने गंध, फूले व हळदकुंकू वाहावे. )
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः । आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थाश्च प्रयच्छ मे । यावत्पूजासमाप्तिः स्यात्तावत् त्वं सुस्थिरो भव । दीपदेवताभ्यो नमः । सकलपूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि ॥
१३) प्रोक्षण
( दूर्वेने पूजासाहित्यावर व स्वतःवर पाणी शिंपडावे. )
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत्पुंडरीकाक्षं स बाह्माभ्यंतरः शुचिः ॥ पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत् ।
( हा मंत्र म्हाणावा आणि प्रोक्षण करावे )
१४) प्राणप्रतिष्ठा
दोन दूर्वांकुरांनी गणपतीला स्पर्श करून म्हणावे-
अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्वरः ऋषयः ।
ऋग्यजुः सामाथर्वाणि छंदासि परा प्रानशक्तिर्देवता ।
आं बीजम् । र्हीं शक्तिः । क्रौं कीलकम् ।
अस्या मूर्तौ देवकलासन्निध्यार्थ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः ।
ॐ आं, र्हीं, क्रौं,
अं यं रं लं वं शं षं सं हं क्षं अः क्रौं, र्हीं, आं देवस्य प्राणा इह प्राणाः ॥
ॐ आं, र्हीं, क्रौं,
अं यं रं लं वं शं षं सं हं क्षं अः क्रौं, र्हीं, आं, देवस्य जीव इह स्थितः ॥
ॐ आं, र्हीं, क्रौं,
अं यं रं लं वं शं षं सं हं क्षं अः क्रौं, र्हीं, आं,
देवस्यवाड्मनश्चक्षुः श्रोत्राजिव्हाघ्राणपाणिपादपायुपस्यादि सर्वेंद्रियाणि सुखं चिरं तिष्ठंतु स्वाहा ॥ ॐ असुनीते पुनरस्मासुचक्षु पुनः प्राणमिहनो धेहिभोगं । ज्योक्पश्येम सूर्यमुच्चरतमनुमते मृळयानः स्वस्ति ।
( ताम्हनात एक पळी पाणी उजव्या हातावरून सोडावे. नंतर दुर्वाकुराने गणपतीच्या पायाला स्पर्श करावा. )
अस्य देवस्य पंचदशसंस्कारसिद्धयर्थ पंचदश प्रणवावृत्तिः करिष्ये ।
ॐ ॐ असा प्रणवाचा पंधरा वेळा उच्चार करावा. नंतर दोन दूर्वांकुर तुपात बुडवून गणपतीच्या उजव्या डोळ्याला, नंतर डाव्या डोळ्याला त्या दूर्वेने तूप लावावे आणि म्हणावे-
ॐ तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत् । पश्येम शरदः शतं जीवेम शरदं शतम् ॥
गणपतीला हात जोडून म्हणावे-
रक्तांभोधिस्थपोतोल्लसदरुणंसरोजधिरूढा कराब्जे ।
पाशं कोदण्डभिक्षूद्भवमथ गुणमप्यंकुशं पञ्चबाणान् ॥
बिभ्राणा सृक्कपालं त्रिनयनलसिता पीनवक्षोरुहाढ्या ।
देवी बालर्कवार्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः परा नः ॥
( गणपतीच्या चरणांवर गंध, अक्षता, फूल वाहावे. गूळ, केळे आदीचा नैवेद्य दाखवावा. नमस्कार करावा. )
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.