(गीति)

देव-गजानन यांना, वरेण्य पुसतो उपासना दोन ।

पहिली अक्षर ऐसी, दुसरी ती मूर्तिमान या दोन ॥१॥

यांतिल मान्य कवन ती, करणें यास्तव सुयोग्य सांगावी ।

१।२.

आपण ईश्वरसाक्षी, आहां सर्वज्ञ म्हणुन सांगावी ॥२॥

गणपति म्हणे नृपाला, सगुण असें मी म्हणून मम भक्ती ।

३.

करणारा भक्त असा, मान्य मला तो करी सुहृद-भक्ती ॥३॥

हितकर प्राणीमात्रां, इंद्रियजेता तसाच ध्यानास ।

योग्य असुनियां जाणे, व्यक्त नि व्यापक अनाश रुपास ॥४॥

ध्यान करुनियां माझें, मजप्रत येतो तयास भवमुक्‍त ।

४।५.

करितों यास्तव माझी, सगुण-भक्‍ती करुन हो मुक्‍त ॥५॥

निर्गुणा उपासना ही, करणें आहे कठीण बहु साची ।

६.

निर्गुण भक्‍तीपासुन, प्राप्ती होते तशीच सगुणाची ॥६॥

येथें मुख्य असेची, भक्‍ती यास्तव करुन फल पावे ।

७.

ज्ञाते आणि समंजस, भक्‍ती करितां द्वआद्य फल पावे ॥७॥

भक्‍तीवांचुन मानव, भजन करि जरि तरीच चांडाळ ।

८.

भक्‍तिपुरःसर भजतो, विप्रांहुन तो वरिष्ठ चांडाळ ॥८॥

पूर्वी शुकसनकादिक, नारद आदी समस्त भक्‍तीतें ।

९.

करिते झाले यास्तव, मजप्रत आले करुन भक्‍ती ते ॥९॥

मजठायीं मनबुद्धी, ठेवुन करि नित्य भक्‍तिनें यजन ।

१०.

या योगें तूं मजप्रति, येशिल हें जाण भूपते वचन ॥१०॥

आतां अशा प्रकारें, मन ठेवाया समर्थ तूं नससी ।

 

११.

अभ्यास योग यांनीं, प्रयत्‍न मजप्रती येसी ॥११॥

तैसें करण्यासाठीं, समर्थ नससी करुन कर्मांसी ।

१२.

अर्पण करुनी मजसी, म्हणजे माझ्या कृपेस स्थित होसी ॥१२॥

हेंही करण्यासाठीं, कर्म करावें प्रकार ते तीन ।

१३.

त्यांचें फल त्यागाचा, यत्‍न करुनियां मलाच हो लीन ॥१३॥

माझेविषयीं आधीं, बुद्धी होणें असेंच उत्तम तें ।

उपरी ध्यान करावें, त्यागावें कीं समस्त अर्थांतें ॥१४॥

यापरि वर्तन करितां, शांती येते बहुतशी त्यानें ।

१४.

तदनंतर कथितों मी, ऐकें राया सुशांत चित्तानें ॥१५॥

मीपण त्यजणें आणिक, द्वेषही करणें नसेच वर्तन हें ।

समभावानें बघणें, वर्तन रुचतें खरोखरी तें हें ॥१६॥

लाभालाभ तसेची, सुखदुःखाला समान मानी तो ।

१५.

मान नि अपमानाला, समान मानी मला बहू रुचतो ॥१७॥

वाटत नाहीं लोकां, भय त्याचें नी तयास भय त्यांचें ।

१६.

उद्वेग कोप ज्याला, नाहीं त्याचें करीन प्रिय साचें ॥१८॥

शत्रूमित्रा नि शोका, यांना मानी समानसा जो तो ।

निंदा स्तुतीस मानी, समभावें तो रुचीरसा होतो ॥१९॥

भक्‍ती बुद्धी मौनी, निश्चय यांनीं प्रयुक्‍त नर ऐसे ।

१७.

निःसीम असा वागे, यातें मानी रुचीरसे खासे ॥२०॥

माझ्या उपदेशाचा, विचार करुनी सुवर्ततां मुक्‍त ।

१८.

होतो तो लोकांना, वंद्य निरंतर रुचीरसा भक्‍त ॥२१॥

इष्टानिष्ट प्राप्ती, मोह द्वेषास करित जो नाहीं ।

१९.

क्षेत्रक्षेत्रज्ञासी, जाणे जो तो मला रुचिर होई ॥२२॥

भूपति म्हणे प्रभूला, करुणासागर दयानिधे देवा ।

२०.

क्षेत्र-क्षेत्रज्ञाची, व्याख्या सांगा सुजाण त्या नांवा ॥२३॥

गणपति म्हणे वरेण्या, भूतें असती जगांत तीं पांच ।

त्यांचे गुणही तितुके, कर्म तशीं ज्ञान-इंद्रियें पांच ॥२४॥

मन-बुद्धी आणिक तो, आहे तिसरा नृपा अहंकार ।

२१.

एकुण तेविसांचा, मेळ असे तो जगांत साचार ॥२५॥

इच्छा धैर्य नि द्वेषा, सुखदुःख नि व्यक्तही मिळुन सारे ।

२२.

एक उणा तीस असा, तत्त्वाला क्षेत्र जाणती बा रे ॥२६॥

सार्‍या अंतर्यामीं, आणि मशीं जाण साच क्षेत्रज्ञ ।

२३.

सर्वांच्या समुदाया, आणिक मशिं ज्ञान विषय सर्वज्ञ ॥२७॥

इंद्रिय विषय विरक्तीं, शौचार्जव नी अदंभ गुरुसेवा ।

सोशिक स्वभाव आणिक, दोष असे जननमरण या सर्वां ॥२८॥

जाणे मानव त्याच्या, स्पष्टपणालाच नांव हें ज्ञान ।

२४.

विश्वाचे ठायीं ती, समदृष्टी वदति यास कीं ज्ञान ॥२९॥

एकान्तवास शांती, इंद्रियनिग्रह तशीच दृढभक्ती ।

२५.

यांना ज्ञान म्हणावें, ऐकें राया मदीय ही उक्ती ॥३०॥

आतां ऐकें भूपा, ज्ञान असें जें तयास जे विषय ।

सांगतसें मी तुजला, ऐकुन वागें सुजाण तें काय ॥३१॥

ज्ञानापासुन मुक्तचि, संसारांतुन त्वरीत तूं होसी ।

 

२६.

निर्वाणपदीं पावसि, ऐकें राया मदीय बोधासी ॥३२॥

आहे अनादि साचें, इंद्रियविरहित तसेच तीन गुण ।

भोगुन पण ते वर्जुन, असतें अव्यक्त आणखी खूण ॥३३॥

इंद्रियविषयांठायीं, अवभासक नी तशींच चिन्हें हीं ।

 

२७.

सत्यासत्यापासुन, अलग असें ब्रह्म समज भूपा हीं ॥३४॥

धारण करि विश्वातें, जगतां व्यापक असून लिप्त नसे ।

नानापरि दिसणारें, आंतुन वरुनहि सुपूर्ण तें भासे ॥३५॥

अंधारापलिकडचें, अति सूक्ष्महि जाणण्यास तें कठिण ।

२८.

तेजाला तेजस्वी, करणारें जाणण्यास योग्यपण ॥३६॥

केवळ ज्ञानानें जें, जाणाया योग्य आणि प्राचिन तें ।

२९.

त्याला ब्रह्म म्हणावें, लक्षण हें सांगतों नृपा तूंतें ॥३७॥

ब्रह्मापासुन नाहीं, अलग असोनी असेंच अव्यक्त ।

आत्मा म्हणती त्याला, मायेपासून तो असे मुक्त ॥३८॥

तिजपासुन गुण जन्मति, ते गुण भोगी खुशाल हा आत्मा ।

३०.

मायाचालक आहे, यास्तव म्हणती तयास परमात्मा ॥३९॥

माया-देहामध्यें, तीन गुणांनीं सुबद्ध करि जीवा ।

३१.

सत्त्वगुणाची वृद्धी, वाढविते शांति तेजशीं जीवा ॥४०॥

समजे रजोगुणाला, शांती नसणें नि लोभप्रवृत्ती ।

दुसर्‍याचा उत्कर्षहि, सोसत नाहीं अशीच प्रवृत्ती ॥४१॥

समजे तमोगुणाचें, प्रमाद मोहप्रवृत्ति अज्ञान ।

३२.

ऐसे धर्म तयाला, असती हे भक्तराजसा जाण ॥४२॥

सत्त्वगुणानें राया, सुख आणिक ज्ञान लाभतें जाण ।

३३.

कर्म करावें ऐसी, बुद्धी होते रजोगुणें जाण ॥४३॥

निद्रा आळस गुण हे, वाढति राया तमोगुणें दोनी ।

तीन गुणांचें लक्षण, कथितों तुजला सुभक्त हो ज्ञानी ॥४४॥

सत्त्वरजादि तम हे, तीनी गुण वाढती क्रमें काय ।

मुक्ती संसृति दुर्गति, मानव पावे म्हणून कर काय ॥४५॥

सत्त्वगुणांनीं युक्‍तचि, व्हावें हें बोधितों तुला राजा ।

३४.

सर्वव्यापक आहे, जाणुन मजला सुभावसा राजा ॥४६॥

अव्यभिचारी भक्ती, करुनी राजा सुखी सदा व्हावें ।

३५-३८.

अग्नी सूर्य नि इंद्रां, तारागण नी सुविद्य द्विज पावे ॥४७॥

तेजस्वी असती, ते समजे ज्ञानें सुपूर्ण राया ते ।

जगताचा उत्पादक, नाशज आहें तसाच मी त्यातें ॥४८॥

औषधि विश्वहि युक्‍तचि, करितों मी सांगतोंहि तें समजें ।

राहे जठराग्नी नी, इंद्रियं सारीं तपामधें साजे ॥४९॥

पुण्य नि पातक दोनी, रहितचि करुनी सुभोग भोगीं मी ।

ऐशा उपदेशातें, जाणाया सांगतों नृपा नामी ॥५०॥

विधि-हरि हर-गौरी, गणपति मी कीं समस्त देव असे ।

३९.

माझ्या अंशापासुन, झाले इंद्रादि लोकपाल असे ॥५१॥

ज्या ज्या रुपीं माझी, करिती पूजा समस्त जन सारे ।

४०.

त्या-त्यापरि मी त्यांना, सुभक्‍तियोगें सुरुपसे बा रे ॥५२॥

क्षेत्रज्ञाता ज्ञान नि, ज्ञेय हिं सारीं समस्त मीं श्रविलीं ।

उत्तम प्रश्नांपरि मी, सुलभ अशीं उत्तरें नृपा दिधलीं ॥५३॥

क्षेत्रादिक विषयांचा, प्रसंग नववा सुपूर्ण सिद्धीस ।

४१.

गेला पुढेंचि सांगें, गणेशगीता प्रसंग दशमास ॥५४॥

कवनें करुन माला, नवरत्‍नांची सुगुंफिली साची ।

मोरेश्वरसुत अर्पी, गणेशकंठीं सुभक्‍तिनें तेची ॥५५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel