#MeToo या मोहिमेत आता अभिनेत्री चित्रांगदा सिंगनेही तिचा अनुभव कथन केला आहे. २०१७ मध्ये ‘बाबूमोशाय बंदुकबाज’ या सिनेमातून मी काढता पाय घेतला होता कारण या सिनेमाच्या दिग्दर्शकाने कथानकात बदल करून ऐनवेळी मला नवाजुद्दीन सिद्दीकीस सोबत बेड सीन करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने वापरलेली भाषाही चुकीची होती. ”तुझी साडी सोड, हिरोच्या अंगावर चढ” आणि अशाच आशयाची अत्यंत अश्लाघ्य वाक्यं मला सीन समजावून सांगण्यासाठी वापरण्यात आली.  मी अभिनेत्री आहे की आणखी कुणी? असाच प्रश्न मला त्यावेळी पडला. मी या वाक्यांविरोधात आवाजही उठवला होता. तसेच मी सिनेमात काम न करता तो सोडणेच पसंत केले. असे असले तरीही त्यावेळी नवाजुद्दीनने त्यावेळी माझी बाजू घेतली नाही.

जे काही त्यावेळी घडले त्यामुळे मी अस्वस्थ झाले होते. मी नवाजुद्दीनसोबत ऐनवेळी तो प्रसंग साकारण्यास असमर्थ होते. तरीही मला हा सीन करण्याची धमकी दिग्दर्शक आणि निर्मात्याने दिली. हा सगळा प्रकार नवाजच्या समोर सुरु होता. तो काहीतरी बोलेल माझी बाजू घेईल अशी मला अपेक्षा होती पण तो मूग गिळून गप्प बसला. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही म्हणूनच मी तो सिनेमा सोडला. बॉलिवुडमध्ये अभिनेत्रीशी संवाद साधण्याची ही कोणती पद्धत आहे? असेही तिने विचारले आहे. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकीने कोणतीही भूमिका घेतली नाही याचा आपल्याला राग आल्याचेही तिने म्हटले आहे.

#MeToo ही सोशल मीडियावरची चळवळ भारतात अभिनेत्री तनुश्री दत्ताने सुरु केली. दहा वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला. तिच्यानंतर अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. #MeToo प्रकरणात आत्तापर्यंत आलोकनाथ, चेतन भगत, विनोद दुआ, लव रंजन, कैलाश खेर, साजिद खान यांच्यासह अनेकांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. यामध्ये आता चित्रांगदा सिंगने बाबूमोशाय बंदुकबाजचा दिग्दर्शक आणि निर्माता या दोघांवरही आरोप केले आहेत. चित्रांगदा याच महिन्यात येणाऱ्या बाजार या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात सैफ अली खान, रोहन मेहरा यांच्या भूमिका आहेत. [source]


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel