सूर्यपुत्र श्री शनिदेव मृत्युलोकाचा असा स्वामी आहे , कि जो वेळ आल्यावर मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्माच्या आधारे त्याला शिक्षा देवून पुनश्च सुधारण्यासाठी प्रेरणा देत असतो म्हणून -

१) श्री शनिदेव आधुनिक युगातील न्यायाधीश आहेत आणि दिलेला न्याय हा बऱ्याच वेळेला आपल्याला अप्रिय वाटतो , म्हणून क्रूर संबोधण्यात येते.
२) श्री शनिदेवाला असलेला काळा रंग, हा एक असा रंग आहे ज्यावर दुसरा रंग चढत नाही.
३) शनीचा धातू लोखंड पोलाद आहे, जो सर्वात उपयुक्त व शक्तिशाली असतो.
४) शनीचा प्रिय छंद -गरीब,दिन,पिडीत लोकांची सेवा करणे व रक्षण करणे.
५) शनीला प्रिय असलेल्या वस्तू - तेल,कोळसा,लोखंड,काळे तिळ,उडीद,चप्पल बूट दान रूपाने प्रदान केले जाते.
६) श्री शनिदेव अध्यात्माचे अधिपती आहेत म्हणून रिद्धी-सिद्धी साठी श्री शनिदेवाची उपासना सर्वश्रेष्ठ होय.
७) श्री शनिदेव भक्ताला कौटुंबिक,सामाजिक, राजनीतिक ,सांस्कृतिक,आध्यात्मिक,प्रशासनिक,व्यापारिक क्षेत्रात मोठ्या पदावर प्रस्थापित करतो.
८) श्री शनिदेव रोगमुक्ती व दीर्घायुष्याची कामना करीत आसतो.
९) श्री शनिदेवाला विपुल नावें आहेत, त्यांचे कार्यक्षेत्र विस्तृत व विशाल आहे.
१०) शनैश्वर जगातील एक शाश्वत असामान्य देव होय.
११) शनीचे वाहन लोखंडी रथावरील गिधाड होय.
१२) श्री शनी देवाचे शस्त्र - धनुष्य बाण व त्रिशूल होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel