`पेजिंग डॉक्टर हिरेमठ`, मुंबईतील प्रख्यात किंग्स हॉस्पिटल मध्ये आवाज घुमत होता. धावपळ करत डॉक्टर हिरेमठ इमर्जन्सी रम मध्ये पोचले. तिकडे अनेक जुनिअर डॉक्टर त्यांची वाट पाहत होते. हॉस्पिटलचे डीन विक्रम सिंग सुद्धा तिथेच होते. "काय झाले इतकी गर्दी का करून आहेत इकडे ?" डॉक्टर हिरेमठ नी विचारले. 

"हिरेमठ, तात्काळ OT मध्ये चला, मंत्री गजानन गायकवाड ह्यांना २ तास आधी भीषण अपघात झाला. हेलिकॉप्टरने त्यांना इथे आणले गेले आहे. सर्व तयारी केली आहे, त्यांच्या मेंदूवर सर्जरी नाही झाली तर त्यांचा जीव जाईल " विक्रम सिंग नि डॉक्टर हिरेमठ ला जवळ जवळ ओढत OT मध्ये नेले. "पेशंट मॅनिफेस्ट कुठे आहे ? " डॉक्टर हिरेमठ नी आपली सहकारी शाम्भवीला विचारले. 

"नरेश, मॅनिफेस्ट घेऊन काय करणार ? मंत्रीजी तिकडे शेवटच्या घटका मोजत आहेत" विक्रम सिंग नि जवळ जवळ रागाने प्रति प्रश्न केला. इमरजेंसी रूम मध्ये सर्वांत क्रिटिकल पेशंटला आधी पाहायचे आणि त्यांत सुद्धा तरुण पेशंट ना जास्त प्राधान्य द्यायचे असा नियम होता. शाम्भवीने पेशंट मॅनिफेस्ट डॉक्टर हिरेमठ च्या हाती दिला. 

"विक्रम... गायकवाड इथे ४:३० ला आले, त्याआधी हा लहान मुलगा सुद्धा इथे आला होता त्याशिवाय इथल्या प्राथमिक माहितीप्रमाणे मंत्री पेक्षा हा मुलगा वाचायची शक्यता जास्त आहे " डॉक्टर हिरेमठ नि आपला स्क्रब परिधान करत डिन ला विचारले. विक्रम ज्या पद्धतीने नरेश ला OT मध्ये नेण्याची घाई करत होता त्यावरून काही तरी पाणी मुरत आहे हे नरेशने ओळखले होते. आता तर हे स्पष्ट होते. 

प्रोटोकॉल प्रमाणे मंत्रीजीवर इलाज करण्याआधी त्या लहान मुलावर इलाज करणे आवश्यक होते. पण डीन ला मंत्री गायकवाड ची जास्त चिंता होती. इथे दोन जीवांचा प्रश्न होता असे नाही पण नरेशला आणखीन गोष्टी लक्षांत घ्यायला हव्या होत्या. डीन विक्रम ६४ वर्षांचे होते. हे त्यांचे शेवटचे वर्ष होते. ह्या नंतर डीन कोण बनेल ह्याची उत्सुकता सर्वानाच होती पण किंग्स हॉस्पिटल चा सर्वांत तरुण डीन म्हणून बनण्याची शक्यता नरेशच्या आवाक्यांत होती. त्याशिवाय डॉक्टर विक्रम सिंग ची एकुलती एक मुलगी, फ्रांस मधून शिकून आलेली अनन्या सिंग नरेश ची गल्फ्रेंड होती. पुढच्या वर्षी त्यांचे लग्न करण्याची मनीषा होती. 

डॉक्टर विक्रम ना नाही म्हणणे नरेश साठी अवघड होते. पण त्याच वेळी डॉक्टर नरेश हिरेमठ ना आपल्या वैद्यकीय पेशा पेक्षा जास्त महत्वाचे काहीही नव्हते. आपली शपथ भेदभाव न करता उपचार करण्याची आहे हे त्यांना ठाऊक होते. 

"सॉरी डॉक्टर विक्रम, मी मंत्री गायकवाड ना आता पाहू शकत नाही. शंकर गोंदिया ला पाहणे जास्त गरजेचे आहे. प्रोटोकॉल प्रमाणे हे अगदी बरोबर आहे हे तुम्ही सुद्धा जाणता. आमच्यासाठी मंत्री काय किंवा एक छोटा मुलगा काय, सर्व सामान असले पाहिजे" डॉक्टर हिरेमठ नि डॉक्टर विक्रम ना सर्वापुढे ठणकावून सांगितले. सर्व जुनिअर डॉक्टर्स डोळे विस्फारून हिरेमठकडे पाहत होते. कुठलाही डॉक्टर डीन च्या विरोधांत जाईल हे त्यांच्या पैकी कुणी स्वप्नात सुद्धा पहिले नव्हते. 

"डॉक्टर हिरेमठ, I wont tell you again. माझ्या मते तुम्ही मंत्रीजीवर उपचार करण्यात जास्त शहाणपणा आहे. शंकर गोंदिया हा एक १० वर्षांचा आदिवासी मुलगा आहे. तू मुंबईत का आला होता हे सुद्धा कुणाला ठाऊक नाही. रिक्षातून जाताना ट्रकने ठोकर मारली आणि त्याचे वडील त्यांत ठार झाले. हा मुलगा वाचला तरी त्याचे बिल भरायला कोणीही नाही, त्याला घ्यायला सुद्धा कोणी पुढे येणार नाही. ह्या उलट मंत्रीजी जर आज आमच्या हॉस्पिटल मध्ये वारले तर सगळी कडे आमची मानहानी होईल" डॉक्टर विक्रम नी नरेश चे उत्तर ऐकले सुद्धा नाही आणि ते आपल्या केबिन कडे चालू लागले. त्यांच्या मनात त्यांना नरेश चे उत्तर ठाऊक होते. ३० वर्षे आधी जर कदाचित नरेश च्या जागी ते असते तर त्यांनी सुद्धा तेच केले असते. पण you have to be प्रॅक्टिकल . 

डॉक्टर नरेश हिरेमठ नी त्या दिवशी मंत्री गायकवाड ऐवजी त्या लहान मुलावर सर्जरी केली. कृश शरीराचा तो मुलगा त्या दिवशी वाचला. त्याचे नाव शंकर होते हे त्याच्या खिशांतील रेशन कार्ड वरून समजले होते. त्याचे वडील त्याच दिवशी वारले होते आणि सरकारी स्मशानभूमीत बेवारशी म्हणून त्याचा अंत्यसंस्कार झाला होता. पुढील १ महिना शंकर हॉस्पिटल मध्येच होता. ब्रेन सर्जरी मधून रिकव्हर होण्यातखूप वेळ जातो पण शंकर ने फारच चांगली प्रगती दाखवली होती. 

मंत्री गायकवाड ह्यांच्यावर सर्जरी जुनिअर डॉक्टर जोसेफ ने केली पण त्यांचा जीव वाचला नाही. मुख्यमंत्री हॉस्पिटलच्या बोर्डवर प्रचंड चिडले होते. बोर्ड तर्फे डॉक्टर हिरेमठ ची चौकशी सुद्धा झाली आणि त्यातून ते सुटले सुद्धा. पण विक्रम आणि नरेश चे संबंध मंत्र तुटले. अनन्या ने सुद्धा नरेश बरोबर ब्रेकअप केला. विक्रम ह्यांनी डीन म्हणून ओंकोलॉजिस्ट शेखर सबनीस ह्याचे नाव पुढे केले आणि  स्टार डॉक्टर म्हणून डॉक्टर हिरेमठ हळू हळू विस्मृतीत जाऊ लागले. 

७ वर्षे गेली आणि एक विचित्र घटना घडली. एक पेशंट OT मध्ये मरणशय्येवर होता. डॉक्टर हिरेमठ त्याला पाहण्यासाठी आले होते. ऑपरेशन करून काही फायदा नव्हता. पण पेशंट ला थोडी फार शुद्ध होती. डॉक्टर हिरेमठ जवळ येतंच त्याच्या तोंडातून काही तरी शब्द बाहेर पडले. तो काही तरी पुटपुटत आहे हे ऐकून डॉक्टर हिरेमठ नी आपला कान त्याच्या तोंडाजवळ नेला. "डॉक्टर, तुम्ही .. शंकर ... ला वाचवायला .. नको होते ..." 

डॉक्टर हिरेमठ च्या काळजाचा ठोका चुकला. दृष्ट लागावी असे त्यांचे करियर होते पण त्या दिवशी शंकर गोंदियावर त्यांनी सर्जरी केली आणि त्यांना दृष्ट लागली. त्या दिवसापासून त्यांच्या जीवनात एक प्रकारची सावली प्रगट झाली होती जी जाता जात नव्हती. 

डॉक्टर हिरेमठ नि त्या दिवसापासून विचार करायला सुरुवात केली. शंकर गोदीया कुठे असेल ? त्याचे आयुष्य कसे जात असेल ? डॉक्टर हिरेमठ च्या मनात प्रश्न उठला होता. आणि त्यांनी ठरवले. त्याच दिवशी डॉक्टर हिरेमठ नि आपला राजीनामा दिला.  शंकर गोंदियाला शोधून काढायच हे त्याचं नवीन ध्येय होतं

पुढील भाग : काही दिवसांत प्रकाशित होईल. 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel