आयुष्याच्या संध्याकाळी डोक्यावरचे केस गळून पडले कानांनी शब्दांना झेलणेच बंद केले वाक्याची सुरुवात अन् शेवट यात अंतर पडले अशी काहीशी अवस्था आयुष्याच्या संध्याकाळी होते ते वार्धक्य.दुसरे बालपण यात आवश्यकता असते प्रेमाची स्पर्शाने भावना ओळखता येतात धुसर होत चाललेल्या आठवाणी पुन्हा एकदा मनाच्या हिंदोळ्यावर झुलायला लागतात . निसटलेले क्षण तर मिळालेल्या सुंदर क्षणांची गोळाबेरीज मन करायला लागते .अरे! हे तर आपले राहूनच गेले ? असे विचार येतात मग कोवळ्या बालवयात रममाण होत असताना घडलेल्या चुकांची प्रचिती निघून गेलेल्या संधीकडे बघताना कळते सरलेले ते बालपण अन् तशाच प्रेमाची अपेक्षा ठेवणारे वार्धक्य...!! पण त्या निसरड्या वाटेवर सतत चुकांवर पांघरुण घालणारी साथ देणारी आई या वयात नसते तरी तिची सावली शिदोरीसारखी वाटते जणू सांगते तुलाही हाच वसा चालवायचय मग मन खाडकन सावध होतं अरे हे आपण कधीच पार केलेय असे वाटते.

गतकाळच्या त्या आठवणीच फक्त साथ देत राहतात मायेची ऊब देणारी ती माणसं नाती गेली कुठे ? आपण एकाकी पडलो फक्त तू आणि मी असा विचार येतो अन् बालपणात बघितलेल्या त्या सुंदर स्वपनांची ओंजळ भरुन तारुण्य समोर येते....!

तारुण्यात येताना अनेक नाती उलगडत जातात नवीन आशा स्वपने घेवून ती पूर्ण करण्यासाठी केलेला जीवापाड अटृहास आठवतो .वयाच्या त्या टप्प्यावर स्वतःचेच खरे करताना घडलेल्या अक्ष्म्य चुका त्याची परिणीती म्हणजे मिळालेले अपयश...मग अरे मला असे नव्हते जगायचे! मला हे करायचे होते.असा विचार येतो तोच पुन्हा आठवते वार्धक्य..:...!! मन खिन्न होते. मला माझ्या चुका माझ्या मुलांपर्यत नव्हत्या पोहचवायच्या पण पुन्हा तेच तीच तत्वे मी लादत तर नाही ना असा विचार करुन मनाचे समाधान करावे लागते कारण माझ्या बरोबर माझ्या मनाचे समाधान कराणारे कुणीच नाही ?? खरच एवढे कठीण आहे का हे वार्धक्य.... असा विचार करत असतानाच तारुण्यात हातात हात घेवून चालणारी सहचारी चारिणी वाट अर्ध्यावरच सोडून गेलेली असते एकेक करत सर्व नाती गळून पडायला लागलेली असतात उरतात फक्त त्या गोड क्षणांची आठवण देणाऱ्या आठवणी चुकलेल्या गोष्टींची हुरहुर तीच कुठेतरी बोलावीशी वाटते पण ...?? लळा जिव्हाळा हे सगळे खोटे असे वाटते चिऊ काऊचा खास भरवणारी आई मागे पडते तिचा हात हातात घेणारी सहचारी चारिणी हात सोडून जाते बहीण भाऊ यांच्यासोबत घालवलेल्या आठवणी काळाच्या ओघात मागे पडत निसटून जातात कुणीच कुणाचे नसते?? मुलीला  आपल्या संसारात रममाणव्हावे लागते तर मुलगा पुन्हा तेच चक्र नकळत जगत असतो या वार्धक्यात कुणाला चौकशीची गरजही वाटत नाही का ?असे विचार येवून गेले पण म्हणून माझे भरपूर आनंदाचे क्षण माझ्या घालवलेल्या व माझ्या उरलेल्या आयुष्याची ग्वाही देतात

जीवन जगत असताना यश आणि सुख मिळवताना झालेली चढाओढ आठवते अन् स्वप्रयत्नाने मिळवलेले यश तर मिळालेल्या गोष्टीतच आनंद मानला ते सुख अशी गोळाबेरीज मागे वळून वार्धक्यात बघताना येवू लागते सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नसते काहींवर टीका ही करावी लागली हे क्षण ही आठवून गेले पण सतत विचार येतो कायम कमीपणा स्वतः कडे ठेवून इतरांना दाद देणे योग्य होते का ??पण आता काय उपयोग वाळू तर निसटून गेली ह्या कटू गोड आठवणी ऐकणारीच मंडळी आता नाही उरली ही खंत वार्धक्यात जाणवते.

वय वर्षे 56ते 92आता 50 ही म्हणू शकतो सर्व स्त्री पुरुष ज्येष्ठ नागरीक मधे येतील . काही एकत्र तर काही स्वतंत्र ..काहींना मानसिक त्रास सहन करावा लागतो तर काही अनेक व्याधींनी त्रस्त मग अशा ज्येष्ठांना ऊब लागते ती केवळ मायेची . आज्ञाधारक मुलगा किंवा मुलगी असणे हे सुखी जीवनाचे सूत्र तरच मग वार्धक्याच्या या वळणावर येताना मन त्या गतकाळच्या आठवणीत रममाण होताना एकटे पडणार नाही ...

"रस्त्यावर पडलेला वाळलेल्या पानावरुन चालताना सावकाश चालावं हे लक्षात ठेवावं कडक उन्हात या झाडाच्या सावलीचाच आपण आधार घेतलेला होता"

आपली मुलेच आपला आधार समजून त्यांनी मार्गक्रमण केलेले असते आपल्या आचरणातूनच मुलांवर तसे संस्कार होत असतात आपल्या कडून मोठ्यांचा मान ठेवला गेला तर मुलेही आपला मान ठेवतात आपला मान आपल्या लाही राखता यायला हवा आपली मुले उत्तम असणं ही भाग्याची गोष्ट आपले संस्कार आपल्या वागण्यातून मुलांपर्यत नंतर तेच वार्धक्यात आपली साथ देतात तेच मुलांच्या रुपाने पुढे समाजात दृढ होतात त्याची डोर भक्कम असेल तर वार्धक्य सुखावहच .आपल्या घरातील ज्येष्ठांचे तणावमुक्त आरोग्य पूर्ण आयुष्य देणे तरुणपिढीच्या हाती आहे आपणही वृद्ध होणार हे विसरुन कसे चालेल?

पण मुद्दा आहे समजून घेण्याचाच लहानांनी ज्येष्ठांना पण आधी ज्येष्ठांनीही लहानांना कुटुंबपद्धतीचा हि परिणाम यावर होत असावा संयुक्त कुटुंबपद्धतीत ते खूप सोपे सहज होउल मात्र एकत्र कुटुंबपद्धतीत ते विभागले जाईल तर कधी एखाद्या नात्यात   भाऊ बहीण एकापेक्षाअधिक पर्याय  उपलब्ध असताना एखाद्या नसला तरी चालेल आसे म्हणून अन्यायही होईल पण भावना सगळ्यांची एकच असते ती समजून घेता यायला हवी .असा कुटुंबपद्धतीनुसार फरक ही  जाणवेल.शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही त्यासाठी दोन्ही हातांची गरज मग निर्माण होणारा ताल सुरेल वार्धक्याची अनुभुति देईल .

वार्धक्य ही शिक्षा वाटून न घेता पुन्हा नव्याने म्हणत बालपणाची सुरुवातच असे मानले तर जगणे सुकर होईल दिर्घायुष्य लाभेल यात शंका नाही ..शेवटी माझे माझ्यातलेच माझ्या चसाठी मीच म्हणत वार्धक्याची दुलई ऊब निर्माण करेल हाच विचार .मांडण्याचा प्रयत्न ..:!!

व्यक्ती सापेक्षता

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel