( मोहन घरात प्रवेश करतो. त्याची बायको त्याला पाहते.)

चमेली:- अरे... ये क्या हुआ... आइए बैठिए पहले इधर.
( त्याला खाली बसवून पाणी देते.)

मोहन:-( पाणी पिऊन ग्लास बाजूला ठेवत....) बहुत मारा आज मेरे को.

चमेली:- पर क्यों? ऐसा क्या हुआ?

मोहन:- अरे वही यहाँ के लोगो की मगमग. हमे यहाँ नही रहने देना वगैरा.

चमेली:- अरे पर....

मोहन:- छोड! हे राज्य त्यांचयं. आपल्याला नाही जमू द्यायचे ते.

चमेली:- हम किसी का सहारा लेकर देखे तो.

मोहन:- छोड, जाऊ दे.

( इतनेमें मुन्नी घरके अंदर आती है.)

मुन्नी:- ( मोहनकडे पाहत.) पापा क्या हुआ आपके चेहरो को.

मोहन:- तू लवकर आली आज.

मुन्नी:- हो बाबा, पण तुम्ही का रडतायं?

चमेली:- अगं वो आँखमें उनके कुछ चला गया था और आज बहुत थककर भी आये है.

मोहन:- (मुन्नीच्या हातातली ट्रॉफी पाहून...) वो तेरे हाँथमें क्या है?

मुन्नी:- (ट्रॉफी दाखवत...) कशी आहे?

मोहन:- छान आहे.

चमेली:- बढिया है.

मुन्नी:- मला मिळाली, बक्षीस म्हणून.

मोहन:- व्वा. क्यों मिली मगर?

मुन्नी:- मैने भाषण दिया था, "माझा महाराष्ट्र" के उपर इसलिए.

चमेली:- खूब बात.

मोहन:- क्या बोली तू वहाँपर? जरा सुना तो.

मुन्नी:- सुनिए.

मोहन:- हाँ.

मुन्नी:- माझा महाराष्ट्र एका महान राष्ट्रासारखा आहे. खूप विविधतेने नटलेला, शिवाजी महाराजांच्या किल्यांचा त्यांच्या विचारांचा, सागरी तटांचा तसेच अप्रतिम सुरेख अशी प्रेक्षणीय स्थळे असलेला. इथल्या मातीचा सुगंधच काही वेगळा ज्याची तुलनाच नसावी. अगदी प्रेमाने राहतात आपुलकीने वागवतात इथले लोक सर्वांना. 

(मोहनच्या डोळ्यात अश्रू यायला सुरू होतात.)

आजवर न जाणो आमच्यासारख्या कितीतरी परप्रांतियांना या महाराष्ट्राने घडवलं; जगवलं, जगायचं कसब शिकवलं. मातृभुमीच ऋण काय असतं ना ते याच महान राष्ट्रामुळे कळायला लागलं. जिवाला जीव देणारी माणसं म्हणजे काय? ते या महाराष्ट्रालाच विचारा. आणि महत्वाचं म्हणजे, मी आता इथे जन्मले नसले तरी आयुष्य याच मातीत जगायचं ठरवलयं. 

जय हिंद! जय महाराष्ट्र!

( मुन्नी हसत असते. आणि चमेली- मोहन नकळत रडत असतात.)

समाप्त. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel