अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, गृहिणी, मराठी व्यावसाईक अशा अनेक मराठी भाषिकांना टेक्नॉलॉजीबद्दल उत्सुकता, शिकण्याची आवड असते परंतू केवळ भाषेच्या अडचणीमुळे टेक्नॉलॉजीबद्दल अशा उपयुक्त माहितीपासून तसेच शिकण्यापासून वंचित रहावे लागते. किंवा ही सर्व माहिती केवळ इंग्रजी भाषेतूनच उपलब्ध असल्याने आपल्याला अतिशय उपयोगी असलेल्या सुविधा आपण वापरूच शकत नाही. ही निर्माण झालेली दरी कमी करून आपल्या मातृभाषेत अर्थात मराठीमध्ये ही माहिती उपलब्ध झाल्यास, त्याचा फायदा आपल्या मराठी भाषिक वर्गास व्हावा यासाठी टेक मराठी प्रामुख्याने कार्यरत आहे.

टेक्नॉलॉजी आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध करून देते. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात मोबाईल फोन्सपासून ते कॉम्पुटरपर्यंत अनेक गोष्टींद्वारे मुक्तहस्ते टेक्नॉलॉजीचा वापर करतो. टेक्नॉलॉजी आपले जीवन सुसह्य करतो. तेव्हा नवनवीन येणा-या टेक्नॉलॉजीबद्दल आपण माहिती मिळवणे ही फार उपयुक्त आणि फायद्याचे आहे. हा दृष्टीकोन ठेऊन टेक मराठी, टेक्नॉलॉजीविषयी अनेक विषयांवर लेख, सभा, कार्यशाळा आयोजित करते आणि टेक्नॉलॉजीविषयी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाविण्याचे काम करते.
विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालायामध्ये, शाळामध्ये टेक मराठी व्याख्याने आयोजित करते.

याचा कार्यभाग, निखील कदडी व पल्लवी कदडी हे टेक मराठीचे संस्थापक पाहतात. निखील व पल्लवी हे software क्षेत्रात कार्यरत असून ते “Krishna Infosoft” ह्या कंपनीचे सह-संस्थापक आहेत. गेले ४ वर्षे या क्षेत्रात ते कार्यरत आहेत.
टेक मराठीमध्ये अनेक लोक सल्ल्लागार म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय अनेक लोक उस्फूर्तपणे स्वयंसेवक म्हणूनदेखील कार्यरत आहेत.
टेक मराठी आपल्यासाठी काही करू शकते असे आपल्याला वाटत असल्यास तुम्ही आम्हाला खालील पत्यावर इ-मेल करू शकता:

सौ. पल्लवी कदडी : pallavi@techmarathi.com
श्री. निखील कदडी : nikhil@techmarathi.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel