फार काळापूर्वी महाकाल वनात एक रीपुंजय नावाचा राजा राज्य करत होता. तो प्रजेचा उत्तम पालनकर्ता होता. तो नेहमी भगवान विष्णूंचे ध्यान करत असे. त्याच्या राज्यात प्रजेला कोणतेही दुःख नव्हते. राजाचा प्रभाव एवढा होता की त्याच्या तेजामुळे पृथ्वी कायम होती आणि कोणीही शंकराचे पूजन करत नसे.
राजा रीपुंजय याच्या काळातच शंकराने महाकाल वनात शिवलिंगाची स्थापना केली होती, परंतु उज्जैन मध्ये शिवलिंगाची स्थापना करू शकले नाहीत. हा विचार करून त्यांनी आपला गणेश शिवागणाला आज्ञा दिली की उज्जैन मध्ये शिवलिंगाची स्थापना कर.
गण ब्राम्हण वेशात उज्जैन मध्ये येऊन राहू लागला आणि प्रजेच्या विभिन्न व्याधी दूर करू लागला. ज्यांना अपत्य नव्हते त्यांना औषध देऊन अपत्य प्राप्त करून देऊ लागला. त्याची ख्याती वाढू लागली परंतु राजा त्याच्याकडे गेला नाही. एकदा राजाची प्रिय राणी बहुला देवी हिला पुत्र होत नव्हता म्हणून तिची एक सखी ब्राम्हणाकडे गेली आणि राणीला पुत्र प्राप्त करून दे अशी विनंती केली.
ब्राम्हणाने सांगितले की राजाच्या आज्ञेशिवाय तो महालात येणार नाही. तेव्हा राणीने आजारी असल्याचा बहाणा केला आणि राजासोबत त्या ब्राम्हणाकडे आली. राजा आणि राणीने ब्राम्हणाचे दर्शन घेताच ब्राम्हण शिवलिंगात रुपांतरीत झाला. राजा राणीने तिथे शिवलिंगाचे पूजन केले.
तेव्हा प्रसन्न होऊन शंकराने सांगितले की राजा, तुझ्याकडे पुत्र जन्माला येईल जो धर्मात्मा, यशस्वी होऊन सार्वभौम राज्य करेल. गणाचे शिवलिंग झाल्यामुळे हे शिवलिंग शिवेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते की जो कोणी मनुष्य या शिवलिंगाचे दर्शन पूजन करेल तो सर्व पापांतून मुक्त होऊन अंती शिवाच्या गणांत सामील होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel