पुष्कळ मंडळी यावीत , आलेल्याला खायला घालावे , आणि भगवंताचे नाम घ्यावे , या तीन गोष्टी मला फार आवडतात . त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही . जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो , त्याच्या प्रपंचात मी आहे . माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही . उलट , इतरांच्यापेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे . कमी आहे त्याची काळजी न करता , जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता , जो येईल तसा खर्च करतो , तो मनुष्य ते सर्व मला देतो . मला विकत -श्राद्ध घ्यायची सवय आहे . मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही ; पण दुसर्‍याचा मात्र चांगला करता येतो . माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती ; पण मी कधीही काळजी केली नाही . मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही . उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले , तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने चार आणे मिळवून पोट भरीन . मला आवडते की , एक लंगोटी घालावी , मारुतीच्या देवळात राहावे , भिक्षा मागावी , आणि अखंड नाम घ्यावे . हे करायला कोण तयार आहे ? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही . मी जरी जास्त गरीबांचाच आहे , तरी मला प्रपंचांत कधी दैन्यपणा आवडत नाही . दुसर्‍याकरता निःस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही .

व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की , मला कुणाचे दुःख पाहवत नाही . माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही . माझ्यातले प्रेम काढले तर मग ‘ मी ’ नाहीच ! मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे . माझ्याकडे येणार्‍या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे ; तो परत जाताना त्याच्या डोळ्यांत पाणी आले पाहिजे . दुसर्‍याला आपला आधार वाटला पाहिजे . मी असून काहीच होत नाही ; ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात . पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे . माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक ! मी पुढे असो वा नसो , जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो ; तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका . रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी . ही माझी त्याला प्रार्थना आहे . तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे . या कष्टांचा मोबदला रामरायाच तुम्हाला देईल . तुम्ही सर्वजण आनंदात राहा , हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास


ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास
दासबोध
ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास
ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
आत्माराम
हरिपाठ
ज्ञानेश्वरी Dnyaneshwari