शशांकचं शंभू हे  नामकरण  त्याला अंगाला लावायला येणार्‍या बाईनी केलं

आणि आज पावेतो त्याला शशांक म्हणणारं कोणी भेटलं नाही

शंभू लहानपणी जसा लोभस गोंडस होता तो तसाच राहिला , तरूण झाल्यावरसुद्धा मनात भरायचा तो त्याच्या प्रांजळ डोळ्यातला ाआल्हाददायक भाव,  मग त्याचं प्रसन्न हसणं आणि मग त्याचे शुभ्र दंतकळी सारखे दात

त्याच्या सावळ्या गालावरच्या खळ्या

आणि कुणालाही  मागे सारायचा मोहं होईल अशा काळ्याभोर कुरळ्या केसांच्या लड्या

मी ताईला म्हणायचो याच्या डोक्यावर आपण मुकुट का नाही चढवत?  अगदी बाळकृष्ण दिसेल, ताईला तेंव्हा भारी कौतूक वाटायचं

पण अताशा ताईला जाणवायला लागलं होतं इतका देखणा सुशील सूंदर मुलगा चार चौघांसारखा नाही निर्मळ आहे तितकाच तो बुजरा आहे काहीसा भित्रा सुद्धा

तरी आमचा शंभू भाग्यवान, लहानपणी भित्रा भागुभाई असूनही कोणी त्याची टिंगल केली नाही की  स्वत:च्या करमणुकीसाठी त्याला घाबरवलं नाही

नाहीतर असं मुल पदरात म्हणजे नातेवाईकाना आयतीच संधी

पण शंभूला आम्ही सगळ्यानीच सांभाळला आणि तो होताही तसाच खूप साधा प्रेमळ आणि जिव्हाळा जपणारा.. त्याच्या हातालाही विलक्षण गूण होता म्हणजे आहे कुणाचा पाय मुरगळला कोणाचा हात लचकला आणि त्याने त्यावर मसाज केला तर शंभर टक्के गूण यायचा म्हणजे येतो

एखादा पदार्थ नजरचुकीने कमी पडेल अशी शंका आली तर ताई त्याला वाढायला सांगायची, म्हणजे सांगते काय होतं कळत नाही पण सगळे जेवेपर्यंत पदार्थ पुरतो..

तर असा आमचा शंभू खूप शिकला, जात्याच हुशार त्यात शिकायची हौस

मग काय, छान शिकला नोकरीला लागला

पण रहदारीची भीती, रस्ता क्राँस करताना तर त्याची त्रेधा तिरपीट अजून लपत नाही, नशिबाने नोकरी लागली ती तशी सोयीची , म्हणजे त्याच्या घरापासून बस पकडली की थेट त्याच्या आँफीस पर्यंत

दहा अकरा स्टाँप मधे लागायचे पण शेवटच्याच स्टाँपला उतरायचं असल्याने तशी ताईला काळजी नव्हती

तरी मी ताईला सांगितलं नाही कधी की सुरुवातीचे दोन आठवडे मी त्याला सोडायला जात होतो

शेवटी ताईने त्याची पत्रिका कशाळकराना दाखवली

पत्रिका बघून ते खुषच झाले म्हणाले पुण्यात्मा जन्मलाय, फार क्वचीत पाहयला मिळते अशी पत्रिका

ताईने डोळ्यात पाणी आणत विचारलं पण या भित्रेपणाचं काय करू? त्यावर काही उपाय सांगा आता स्थळं सांगून यायला सुरुवात झाली आहे, आम्हाला त्याचं हे बावरणं खटकतं तर बाहेरच्याना नाही का खटकणार?

कशाळकर काहीसा विचार करून म्हणाले, काळजीचं कारण नाही

त्याला रोज मारुतीचं दर्शन घ्यायला सांगा

अहो हा रोज मारुतीला जायला लागला ना... तर तो  हनुमंतच हा येण्याची वाट बघत बसेल

ताईला परत प्रश्न पडला, लेकाला घरी यायलाच साडेसात होतात.. कधी एकदा घरात शिरतोय असं त्याला झालेलं असतं

त्याला परत मारुतीला जायला सांगायचं म्हणजे घरच्या कुणाला तरी रपेट

मी ताईला म्हणालो अगं हनुमंत त्याची वाट  बघत आँलरेडी बसलाय..

तो ज्या स्टाँपला उतरतो तिथेच डाव्या हातला हनुमंताचं जुनं अष्ट्कोनी देऊळ  आहे, ताईने डोळे वटारले तुला कसं रे माहीत

मी गालात हसत म्ह्णालो आमचा संचार सर्वत्र असतो

मग झालं शंभूला रोज मारुतीला जायला सांगण्यात आलं

अगं पण मला घरी यायला अर्धा तास उशीर होईल तो कुरकुरला , पण कोणी लक्ष दिलं नाही, मग मी त्याला बसस्टाँपवर न्यायला यायचं कबूल केल्यावर

तो दर्शनाला जायला तयार झाला, दर्शन घेऊन झालं की  मी तुला फोन करेन

मग तू तुझ्याअंदाजाने स्टाँपवर ये असं त्याने मला बजावलं

पहिल्या दिवशी तो मारुतीला गेला..

आणि पाहतो तर तिथल्या चौथर्‍यावर एक मुलगी आपला उजवा हात धरून वेदनेने कळवळत होती  चारजण बघे तिच्या भोवती जमले होते तिची मैत्रीण असह्यपणे शेजारी उभी होती, ती  नेमकी शशांकची क्लासमेट निघाली तिने हाक मारल्यावर शंभूला जावच लागलं

त्या मुलीच्या चेहर्‍यावरच्या वेदना बघून तोच कळवळला

मी बघू का? तो पुटपुटला...

बसमधून उतरताना तिच्या हाताला गचका बसला होता, बसची सवय नाही इंटर्व्ह्यु साठी बिचारी आली होती  कळवळत होती पण हा जवळ गेला आणि दोन्ही हाताने तिचा हात त्याने सरळ केला त्याच्या स्पर्शानेच तिचा ठणका कमी झाला आणि मग उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटाने त्याने जे मसाज केलं अक्षरश: जादू व्हावी तसा तिचा हात पुर्ववत झाला

ती त्याच्याकडे  बघतच बसली आणि त्यालाही तिच्याकडॆ बघायचा मोह आवरत नव्हता पण घरी जायची घाई होती आणि तिलाही घरी जायची घाई होती

त्यादिवशी  जो शंभू बसस्टाँपला  उतरला ना तो आमचा शंभू नव्हताच

मी घरी येऊन  हिला म्हंटलं सुद्धा एक चीरा ढासळलाय भिंतीचा

आणि मग असे चिरे ढासळतच राहिले कधी एक कधी दोन

हनुमंताच्या दर्शनाला जाणं अगदी गरजेचं होऊन बसलं, ती ही रोज दिसायला लागली म्हणजे तिलाही जाँब लागला असणार

देऊळ हनुमंताचं पण आधी दर्शन देवीचं आणि मग आराध्य  दैवताचं

हळू हळू तो मला मग सांगायला लागला, आम्ही रोज भेटतो

अरे वा! मग कशी आहे बोलायला?

 शंभू नुसत्या बोलायच्या कल्पनेनेच गळपट्ला

पण असं किती दिवस चालणार ? कुणाला तरी  पुढाकार घ्यावाच लागणार होता, मी सारखा बजावत होतो  जास्त वेळ वाया जाऊ देऊ नकोस, नाँर्मली मुलालाच पुढे होऊन बोलावं लागतं

पण ती वेळ आलीच नाही तो दुसर्‍या दिवशी गेला तर ती त्याचीच वाट बघत होती तो आल्यावर तिने देवाला हात जोडले आणि त्याला दाखवत लग्नाची पत्रिका देवासमोर ठेऊन ती झरकन निघून  गेली

या पुण्यात्म्याचं हृदय वीदीर्ण झालं ... आपण चार महिने वाया घालवले, अगदी त्याच्या नकळत त्याने ती  हनुमंतासमोरची पत्रिका उचलली

अलकनंदा पारसनीस मुलीचं नाव होतं

दसर्‍याच्या मुहुर्तावर लग्न होतं, सायनला कुठल्यातरी  हाँलचा पत्ता होता

ती पण तिथेच राहणारी होती

त्या दिवशी हा पठ्ठ्या स्टाँपला उतरलाच नाही, काळजी वाटली म्हणून घरी फोन केला कारण याचा फोन बंद येत होता

ताई म्हणाली मुलगा जरा सुधारलाय, आज बस ने नं येता टँक्सीने आलाय, बरं वाटत नाही म्हणून झोपलाय, जेवला पण नाही

मला काही ही लक्षणं ठीक दिसेनात मी घर गाठलं , महाशय भिंतीकडे तोंड करून पडले होते

बाबा पुता करून बाहेर नेलं

तसे समजुतदारपणे बोलायला लागले

म्ह्णाले आपल्याला नाही जमणार रे असं ओळख वगैरे काढून बोलायला

खरं तर तिने बोलायला यायला हवं होतं कारण मी तिचा हात बरा केला होता निदान  थँक्स म्हणायला तरी भेटायचं

सगळेच चिरे ढासळले होते बोलण्यासारखं त्यात काही नव्हतं

चार दिवस तो कामावर गेलाच नाही, मग जायला लागला पण शंभू बदलला असं ताई कुरकुरायला लागली

आणि दसर्‍याला तर त्याने कमालच केली, ताई त्याला सोबत यायचा आग्रहं करत असताना तो पहिल्यांदी म्हणाला तू जा मला जरा बाहेर जायचय

 तयार होऊन तो सरळ माझ्याकडॆ आला

दसर्‍याला आला म्हणून हिने बासूंदी दिली एरवी अर्ध पातेलं संपल्यावर तो विचारायचा तुमच्यासाठी आहे ना?

पण आज अर्धी वाटी बासुंदी त्याला संपत नव्हती

शेवटी तो म्हणाला मामा जरा माझ्याबरोबर चल

कुठे? विचारावं लागलच नाही, हातात पत्रिका होती

 मी म्हणालो अरे वेडा आहेस का? कधी एक शब्द जिच्याशी बोलला नाहीस तिच्या लग्नात जाऊन तू कोणाशी आणि काय बोलणार आहेस

तो हट्टी मुला सारखं म्हणाला मी तिचा बरा केलेला हात ती कोणाच्या हातात देतेय हे मला बघायचय

मान्य ! की आमच्यात बोलणं झालं नाही

पण तरी माझ्याकडून काहीतरी होतं जे असं मी  असच सोडू शकत नाही, तिला नवरीच्या वेशात बघितलं की  मला स्विकारायला सोपं जाईल

अगदी जिवापाड लाडका भाचा होता म्हणून मी त्याच्या या वेडेपणात सामील झालो ही पण म्हणाली एकटं नका सोडू त्याला

आम्ही निघालो, अख्खा रस्ता तो गप्प होता

पत्रिकेवरून त्याची नजर हटत नव्हती

आम्ही कार्यालयावर पोहोचलो, प्रस्त बडं दिसत होतं

त्यात मी अगदीच झंप्या दिसत असणार शंभूचा प्रश्नच नव्हता तो कसाही लाखोमें एकच असतो आणि दिसतो

पण हाँलपाशी पोहोचलो आणि त्याच्या पायातली ताकदच गेल्यासारखी झाली जेम्तेम मी त्याला धरला नाहीतर खाली कोसळला असता

मामा आपण घरी जाऊया तो पुटपुटला

त्याला आधी पाणी पाजणं गरजेचं वाटलं , भोवताली हजार माणसं वावरत होती पण हाक मारायला एकजण नाही अशी परिस्तिथी

मी त्याला धरून तसाच उभा असताना त्या हजाराच्या घोळक्यातून एकजण जुनी नाही पुरातन ओळख सांगत आली

जशी गंगा शिवाच्या शिरावर अवतीर्ण झाली

तशीच ही अलकनंदा त्या हजाराच्या गोतावळ्यातून येताना दिसली

तिच्या हातात ट्रे होता त्यात पाण्याचे ग्लास होते

ते दृष्य  खरच ताईला दाखवायला शूट करायला हवं होतं

तो अधीर होता तर ती सुद्धा तितकीच आतूर होती

दोघे बोललेच नाहीत पण त्यांच्या नजरेतला संवाद मला कळला ऐकू आला

ती म्हणत होती मी तुमची नाही माझीच परिक्षा  घेतली

माझं प्रेम खरं असेल तर  लग्नाची पत्रिका बघूनही तुम्ही याल, मी नक्की कुणाशी लग्न करतेय हे तुम्हाला बघावासं वाटेलअसं काय काय ती म्हणत असणार

आणि  हा म्हणत होता तुझ्यासाठी मी इअतकं धाडस करायला मजबूर झालो,तू दुसर्‍याचा हात धरून जाणार ही कल्पनाच मला सहन होत नव्हती

तो आकंठ पाणी प्यायला, पाणी पिऊन त्याची  तहान भागली की नाही कोणजाणे? पण मग एक एक करत तिच्या घरचे आमच्या भोवती जमा झाले, अलकनंदा तिच्या मोठया बहिणीचं नाव तिचं लग्न दसर्‍याच्या मुहुर्तावर झालं होतं तिच्या लग्नाची पत्रिका ठेऊन हिने आमच्या शंभूला पुढाकार घ्यायला भाग पाडलं, खरी हिमतीची पोर

ती चार महिने केवळ वेळ पाळायला त्यावेळी हनुमंताच्या देवळात वाट वाकडी करून येत राहीली हे ऐकून मी चक्रावलोच कारण तिला नोकरी लागलीच नाही

मुळात तिला नोकरीची गरजच नाही, मैत्रीणी बरोबर पहिल्यांदी ती बसने प्रवास करत होती नाहीतर पब्लीक ट्रांस्पोर्ट कसा तो तिला माहीतच नव्हता

शंभू  कोण काय कुठला काही माहीत नसताना तिचे वडील म्हणाले हिने आम्हाला याच्या बद्दल सगळं सांगितलं होतं

जिथे नावही माहीत नव्हतं तिथे ती शंभू बद्दल सगळं काय सांगणार होती?

तिची आई म्हणाली निर्मला म्हणाली होती त्याला बघितल्यावर तुमच्या मनात आशीर्वादाशिवाय दुसरं काहीच येणार नाही

आणि खरच अत्ता आमच्या मनात आशीर्वादाशिवाय दुसरं काही नाही

दोघे पाया पडायला वाकले तेंव्हा दसर्‍याचं सोनं दाही दिशाना लुटावं तसं तिच्या आई बाबाना.. त्यानाच का?

तिथे हजर असलेल्या प्रत्येकाला होऊन गेल

Chandrasekhar Gokhale
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel