गौरी आणि निशांतच लग्न   होऊन एक महिना झाला तरी त्या दोघांमध्ये दुरावा होता ....ती मनाने अजूनही त्याची झाली नव्हती .....तो तिला हसवायचा ....चिडवायचा ......मस्करी करून ....काहीतरी निमित्त करून तो रोज नवीन प्रयोग करायचा ...पण तीच्या  पाषाण हृदयाला पाझर फुटत नव्हता .ती फक्त ...हो ...नाही ...ठीक ...असं औपचारिकच वागायची ....पण त्याची आणि त्याच्या घरच्यांची मात्र अगदी मनापासून सेवा करायची ....कुठेच काहीच कमी  पडणार नाही .....याची काळजी घ्यायची ...येणाऱ्या जाणाऱ्याचा आदर सत्कार ....पाहुणचार .....सगळं सगळं राजिखुशीने ती करायची पण तो जवळ आला कि ......ती अगदीच औपचारिक भूमिका वठवायची ...  निशांत  नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला ....आणि  ...गौरी   तिची काम आटपून आपल्या खोलीत जाऊन पडली ....आणि तिची आवडती गाणी लावलीत ......अखियोंके झरोखोमे मैने देखा जो सावरे .......गाणं लागताच ती ताडकन उठली आणि प्लेयर बंद केला .आणि मुसमुसत रडायला लागली ....तिचा भूतकाळ डोळ्यासमोर फेऱ्या घालू लागला ......  गौरी स्वभावानी शांत ...सुंदर ...नाकी डोळी अगदी कोरीव ...घरात थोरली .....त्यामुळे समजदार ...ऐन तारुण्यात पाउल टाकलेली गौरी ...आणखीनच लोभस दिसायला लागली .... त्या दिवशी तो कुठलीतरी पत्रिका द्यायला तिच्याकडे आला ...तो ..."माधव " त्याच नाव ....गौरीने त्याला पाणी आणले ....काय कोण जाणे पण एका भेटीत तो तिच्या मनात शिरला ....एका लग्नाच्या निमित्ताने त्याची भेटही झाली .....एव्हाना त्याला कळून चुकलं होतं ...ती त्याच्या प्रेमात पडलीय ....  गौरीला स्थळ यायला सुरुवात झाली ...पण ती मनातल्या भावना कोणाला बोलून दाखवणार ? ती आपल्याच मनाशी द्वंद्वव खेळत होती .उद्या तिला बघायला कोणीतरी येणार होता ...गौरीने काहीच चौकशी केली नाही की स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या नाही .

तिची आई ,छोटी बहीण तिला सारखी ...हि साडी घाल .तो दागिना घाल ....दोघीही तिला सुचवत होत्या ....पण गौरीच्या मनात मात्र त्याचेच विचार येत होते ....पण घरच्यांशी विरोध करणे तिला आवडलं नसतं ...सर्वजण आनंदी आहेत हे बघून गौरी तयार झाली ....पाहुणे घरी आले गौरी तयार होऊन पुढे चहा ...नाश्ता घेऊन गेली .ओळख परिचय झाला ....मुलाची बहीण चिडवत गौरीला म्हणाली ....वाहिनी आवडला का आमचा माधव दादा ...लाखात एक आहे . माधव नाव ऐकताच तिच्या काळजाचा ठोका चुकला ...आतापर्यंत खाली मान घालून बसलेल्या गौरीने वर बघितले तर साक्षात तोच माधव तिला बघायला आला होता .तिचा चेहरा खुलला ....आनंद ओसंडून वाहू लागला .   .  गौरी आणि माधवचं मोठ्या थाटामाटात लग्न उरकलं .गौरीला अजूनही विश्वास बसत नव्हता की माधव तिचा झालाय ...काहीही असो तिने ठरवलं ,आपणही आपलं गुपित याला सांगायचं नाही कि तो पहिल्याच भेटीत तिच्या मनात उतरला होता .

माधवनीच तिला प्रश्न केला काय गं तुझी पसंती होती ना लग्नाला ...तिला हसायला आलं पण तिने न दाखवता उत्तर दिलं अहो घरच्यांची पसंती तीच माझी पसंती ...माधवनी तिला मिठीत घेतलं ...कानावरच्या केसांच्या बटाना दूर करत हळूच तिच्या कानाजवळ तो  कुजबुजला ....अच्छा जी आम्ही तुमच्यासाठी इतके खटाटोप केले ....खरं म्हणजे ज्या लग्नात आपली परत भेट झाली होती ...तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी असणार प्रेम मी हेरलं होत ....खात्री करायला तुझ्या बहिणीला तुझ्याविषयी विचारलं ....बोलण्याच्या ओघात तिने सांगून टाकलं ...की तिला तुम्ही खूप आवडता ....आपल्या बहिणीने आम्हाला खूप मदत केली .....बरं का ! आणि तुला न सांगता एका काकांना मध्यस्ती ठेवून हा योग जुळवून आणला ....गौरी लाजेनं चिंब झाली .  .        दोघेही एकमेकास अनुरूप होते ....संसार सुखाचा सुरु होता ....माधवचे आईवडीलही गौरीला अगदी मुलीसारखे समजायचे ....कोणत्याच गोष्टीची उणीव त्यांच्या संसारात नव्हती .हौशी नवरा ...प्रेमळ सासूसासरे ...एक पाच वर्षांची गोंडस मुलगी ...अदिती ...असं छान चाललेलं असताना  .....त्यादिवशी माधव गौरीला घेऊन डिनरला जाणार होता ....गौरीने छान माधवच्या आवडीची साडी घातली ,हलकासा मेकअप केला ........केसात गजरा माळला ....अगदी तयार होऊन गौरी बंगळीवर झुलत ....अखियोंके झरोखोमे गाणं गुणगुणत होती ...इतका वेळ त्याला कधी होत नाही तिने फोन लावला तर स्विच ऑफ येत होता ...अदिती पण कंटाळून झोपी गेली ....इतक्यात फोन खणखणला " आम्ही सिटी हॉस्पिटल मधून बोलतोय ,माधव सरनाईक यांच्या गाडीला अपघात झाला.

घरी येताना माधवच्या गाडीला ऍक्सिडंट झाला ...तो तिथेच हे जग सोडून गेला .नियती पण विचित्र खेळ खेळते ...कोणाचं अति प्रेम तिला बघवत नाही ....त्या प्रेमाला द्रुस्ट लागतेच . गौरीला आकाश कोसळल्यासारखे  झाले .तिचा आक्रोश वेदना बघवत नव्हत्या ....अगदी निस्तेज ...शून्यात हरवलेल्या  गौरीचं दुःख माधव च्या आईबाबाला बघवत नव्हतं ....अदिती कडे बघून ती सगळं विसरल्याचा भाव दाखवत असे पण माधवसोबतचे सुखद क्षण आठवल्यावर मात्र ती परत भूतकाळात जाऊन दुःखी व्हायची . आई...... बाबा देवाघरी का गेला गं आपल्याला सोडून ?अदितीच्या निरागस प्रश्नांची उत्तर तिच्याकडे नसायची ..  त्याला जाऊन दोन वर्ष झालीत .माधवच्या आईबाबांना गौरीच्या भविष्याची काळजी वाटायला लागली ....पुढे इतकं मोठं आयुष्य ....कशी काढणार ?मुलगी पण वडिलांच्या मायेसाठी  झुरते ...हे त्यांना स्पष्ट दिसत होतं  ....गौरीचं कन्यादान करून आपण डोळे मिटायला मोकळे होऊ ...असं त्यांनी ठरवूनच टाकलं पण गौरीला हे मान्य नव्हतं ....पण निदान अदितीसाठी तरी गौरीने पुनर्विवाह करायला हवा .  खूप समजावल्यावर गौरी तयार झाली पण मनात एक प्रश्न भेडसावत होता जो कोणी मला स्वीकारेल तो अदितीला पोटच्या मुलीसारखं प्रेम करेल ??????निशांतच स्थळ आलं .....त्याचा डिवोर्स झालेला ....घरी आईवडील आणि तो ...असं कुटुंब .....गौरी आणि निशांतच लग्न पार पडलं .माधवच्या आईबाबांनी तीच कन्यादान केलं ....त्यांना सोडतांना अश्रू अनावर होत होते ...शेवटी निशांतच्या घरी गौरी माप ओलांडून आली .  .त्या दिवसापासून आजतागायत ....निशांतसाठी तिचं वागणं अतिशय रुक्ष होत .अदितिमात्र छान रुळली होती .त्यादिवशी अदितीचा वाढदिवस निशांत सकाळपासून तयारीला लागलेला ...डेकोरेशन .....मेनू ....शॉपिंग ....सगळं सगळं तो सहज करत होता .अदिती शाळेतून आली आणि सरप्राईज बघून निशांतला बिलगली ....तोही तिचा लाड करू लागला अगदी घोडा घोडा खेळत तिला पूर्ण घरात चक्कर मारून आणलं .आदिती आईजवळ गेली आणि म्हणाली आई माझा बाबा जगातला नं वन बाबा आहे .अदितीला आनंदी बघून गौरी विचारात पडली .मी याच्याशी किती तुसाटपणे वागते पण हा किती जीव लावतो माझ्या मुलीला .तिचा प्रत्येक हट्ट पुरवतो .निशांतचाही एक भूतकाळ होता पण तो वर्तमानात जगतो .

सगळं विसरून .मान्य आहे मी माधवला कधीच विसरू शकणार नाही पण निशांतला दुःख द्यायचा मला काहीच अधिकार नाही ...मी त्याची बायको म्हणून तो हवं तसं वागला असता परंतु त्यांनी आधीच सांगितलं आपल्याला एक मुलगी आहे त्यामुळे दुसरं अपत्य असावं असा माझा अट्टाहास नाही .स्वतःच्या रक्ताचं मूल कोणाला नको असतं .? कदाचित माधव आणि माझी साथ इथपर्यंतच असावी ....पण निशांत जर अदितीचा बाबा बनू शकतो ...तर     मी पण ........?            गौरीला त्याच्याशी आता खूप बोलायचे होते .पण संकोचही  वाटत होता सुरुवात कशी करावी ....इतके दिवस एका घरात असूनही अगदी औपचारिक बोलचाल असायची .....तिला मन मोकळं करायचं होतं .....एक छान संधी चालून आली .सगळी घरची मंडळी एका लग्नाला बाहेरगावी गेलेली .....गौरीने छान तयारी केली ...पिंक कलरची साडी घातली ...हलकासा मेकअप केला ....केसांत गजरा मालाला .आणि त्याची वाट बघत बंगळीत बसून कसलीतरी कादंबरी वाचायला घेतली .....रोज सहाला येणार निशांत नऊ वाजले तरी ऑफिसमधून आलेला नव्हता .....ती चकरा मारत होती ....गेटजवळ जाऊन बघत होती ....फोन केला तर ...आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता ....आता मात्र ती अधीर झाली नको ते विचार मनात येऊ लागले ......ती श्वास रोखून वाट बघत होती ....इतक्यात बेल वाजली ....गौरीने  पळतच जाऊन दार उघडले ......समोर निशांत होता .......तिला रडू .कोसळले .......त्याला मिठी मारत ती रडायला लागली ....इतका वेळ होणार आहे हे सांगायचं नाही का ? किती फोन लावले ...त्याला कळेना काय झालं ? त्यांनी शांतपणे तिला खुर्चीत बसवलं आणि सांगितलं कि आज एक मिटिंग होती म्हणून यायला वेळ झाला .बस इतकच .......पण तुला रडायला काय झालं गं ? गौरी भानावर आली ..... जे मनात होतं ते बोलून मोकळी झाली .....निशांतनी तिला जवळ घेतलं आणि .......कानाजवळ जाऊन केसांच्या बटा दूर सारल्या ......आणि हळूच कुजबुजला ....अच्छाजी हे असं आहे मग .....ती लाजली ....आणि अख्खी रात्र मग बंगळीत गप्पा मारण्यात कशी गेली कळलं नाही ... ...जणू त्यांची पहिलीच भेट असावी ......  

प्रणाली देशमुख अमरावती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel