आरती रामदासा । भक्त विरक्त ईशा उगवला ज्ञान सूर्य । उजळोनी प्रकाशा ॥ध्रु०॥
साक्षात् शंकराचा । अवतार मारूति कलिमाजीं तेचि जाली । रामदासाची मूर्ति ॥१॥
वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला । जडजीवा उद्धरीले नृप शिवासि तारिलें ॥२॥
ब्रह्मचर्य व्रत ज्याचें । रामरूप सृष्टि पाहे । कल्याण तिहीं लोकीं समर्थ सद्गुरूपाय ॥३॥
आरती रामदास०॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel