नमनस्तोत्रप्रारंभः ॥ नमोकाळकौतूहळा ॥ नमोचक्रचाळकगोपाळा ॥ नमोविश्वप्रतिपाळा ॥ प्रभंजना ॥१॥

नमोशिवाशिवेशा ॥ नमोभेदनिवासा ॥ नमोरूपाअष्टदिशा ॥ नारायना ॥२॥

नमोसकळगर्भोद्भवा ॥ नमोचित्तचाळकभावा ॥ नमोविश्वमूर्तेदेवाधिदेवा ॥ श्रीविठ्ठला ॥३॥

नमोभजनशीलव्यापका ॥ नमोज्योतिर्लिंगदीपका ॥ नमोनमोतुजएका ॥ आत्मव्यापकाजगद्गुरू ॥४॥

नमोश्रीधरनिवासा ॥ नमोअगमपरेशा ॥ नमोज्ञानगम्याधीशा ॥ प्रतिकूळा ॥५॥

नमोस्वलीलाविनटा ॥ नमोस्तुतीवैकुंठपीठा ॥ नमोरूपादिश्रेष्ठा ॥ वैकुंठीचिया ॥६॥

नमोदर्शनास्पर्शना ॥ नमौपरतिनिधाना ॥ नमोतितिक्षादारुणा ॥ कमलालया ॥७॥

नमोत्रिगुणाआदटा ॥ नमोत्रिगुणउद्भटा ॥ नमोसत्स्वरूपसदटा ॥ ब्रह्मनामा ॥८॥

नमोतुजचराचराहरी ॥ नमोविगळितसंहारी ॥ नमोवाचावक्ताकारी ॥ वागपुष्पी ॥९॥

नमोतमहर्ताकर्ता ॥ नमोसकळसंहर्ता ॥ नमोकाळकौळुदाता ॥ रक्षिताहरिभक्तांसी ॥१०॥

नमोहरिहरेश्वरा ॥ नमोनदेवोदुसरा ॥ नमोवेदांतसागरा ॥ सर्वेश्वरातुजनमो ॥११॥

श्रुतिनिरामयनमोनमो ॥ नमोद्वैतानिरसनानमो ॥ ज्ञानरूपानमो ॥ करीतूनिजकरे ॥१२॥

नमोव्यक्ताव्यक्तहरी ॥ नमोमायासंहारकेसरी ॥ नमोविद्येच्यामाजघरी ॥ नांदसीतूआत्मराजा ॥१३॥

जीवशिवनमोतुज ॥ ज्ञानविज्ञानतुजसहज ॥ नमोसर्वबीजतुज ॥ तुजसहजश्रीविठ्ठला ॥१४॥

लीलास्तवनप्रारंभ ॥ नमोजगदादिखलस्तंभ ॥ उभाराहोनीस्तंभ ॥ भीमातीरीपंढरीये ॥१५॥

नमोऐशियारूपेशा ॥ नमोत्रैलोक्यविस्तारठसा ॥ नमोआदिपरेशा ॥ जगदीशायुगारी ॥१६॥

नमोपुरुषोत्तमपुरुषा ॥ नमोसकळहीउदासा ॥ करूनीजीवरूपठसा ॥ नांदसीतूचराचरी ॥१७॥

मधुसूदनातुजनमो ॥ मधुमाधवाह्रदयीरमो ॥ नमोमधुगीतनमो ॥ माजघरीअंबेचिया ॥१८॥

त्रिविधतिमिरनाशा ॥ परमपरमानंद उल्हासा ॥ नमोपुरारिआशा ॥ पूर्णकरिशीश्रीहरे ॥१९॥

नमोवासनाचक्रचाळी ॥ नमोतंडवितंडवेगळी ॥ नमोसर्वहरली ॥ प्रपंचरचना ॥२०॥

नमोश्रीधरश्रीकर ॥ नमोसर्वसंगीविकार ॥ नमोविकृतिअविकार ॥ हरिसीनामे एका ॥२१॥

नमोशांतिदयाक्षमा ॥ नमोकृपाकरीपुरुषोत्तमा ॥ नमोकासवदृष्टीरामा ॥ निष्कलंकनाथा ॥२२॥

नमोद्वैविध्यछेदका ॥ नमोअर्णवपाळका ॥ नमोद्वादशार्का ॥ शुभांशकावेदवंद्या ॥२३॥

नमोचित्तचकोरहर्ता ॥ सर्वकारणकार्यकर्ता ॥ नमोतुजवर्णितासंता ॥ विवेकप्रत्ययायेतसे ॥२४॥

नमोअद्वैतअनंता ॥ नमोनिर्द्वंद्वभोक्ता ॥ नमोनित्यानित्यसरता ॥ तुजनमो ॥२५॥

नमोदुर्गतीहरणा ॥ नमोसर्वहरणभरणा ॥ नमोसर्वदशानिवारणा ॥ भयहरणाजगदीशा ॥२६॥

नमोशिवशक्तीसमलिंगा ॥ नमोभक्षककाळवेगा ॥ रुद्रादित्यावसुपैगा ॥ ममसर्वांगापरमेश्वरा ॥२७॥

नमोकृत्रिमदमना ॥ नमोकृशकरणहरणा ॥ नमोप्रतिपाळकरणा ॥ नारायणातुजनमो ॥२८॥

नमोइंद्रियनियंता ॥ नमोदिनादित्या ॥ नमोदानानंद अद्वैता ॥ सकळवृद्धीतूचि ॥२९॥

नमोअवधूतदत्ता ॥ नमोअपरिमितमिता ॥ नमोसर्वांवरिष्ठसत्ता ॥ तूचाळिताह्रषीकेशी ॥३०॥

नमोदृश्यदर्पदर्पा ॥ नमोचमत्कारागसर्पा ॥ नमोहरणकरणपापा ॥ नमोस्वल्पारामकृष्णा ॥३१॥

नमोतूत्रिविधदीप्ता ॥ हरणकरणतूसुप्ता ॥ जागृतीसमसुषुप्ता ॥ सत्यसुक्तामहाविष्णु ॥३२॥

नमोदेवेश्वरमुक्ता ॥ महामोहमहाहर्ता ॥ मंदमंदनियंता ॥ नमोनारायणा ॥३३॥

क्षीरनीरपरिहारा ॥ नमोविद्वद्वंद अनुकारा ॥ नमोविवेकसागरा ॥ महानादा ॥३४॥

नमोखदंतसदना ॥ नभभक्षकभुवना ॥ शुक्लांबरशुक्लवर्णा ॥ दयाघनागुणनिधे ॥३५॥

मृतामृतानमोनमो ॥ नमोश्रुतिशास्त्रनमो ॥ नमोविगतगर्वनमो ॥ पद्मगर्भा अनंता ॥३६॥

नमोचिदाकाशव्याप्ता ॥ चित्तसत्ताचालनसत्ता ॥ चित्स्वरूपादिरूपा ॥ भुवनदीपामहामूर्ते ॥३७॥

नमोएकएकार्णवा ॥ नमोकल्पादिगुणवैभवा ॥ नमोसकळहेदेवा ॥ अहंभावपैतुझा ॥३८॥

गोगोपाळनमोनमो ॥ गोविंदगुणविष्णुधर्मो ॥ नमोचित्ताचित्तविरामो ॥ सर्वकाळतुझेचरणा ॥३९॥

ध्वजवज्रांकुशा ॥ ध्वजनीळविशा ॥ नीळनाभासतीशा ॥ शामांकिता ॥४०॥

सुषुप्तीजेसंत ॥ नमोतुजकृत्य ॥ असोसीजेअमित ॥ मातेक्षमाकराकाही ॥४१॥

नमोनिर्धारनियंता ॥ नमोसुखरूपादाता ॥ नमोआलियापदार्था ॥ क्षमाकरीस्वामी ॥४२॥

नमोचित्तविभ्रमा ॥ नमोधैर्यनामा ॥ नमोपुराणपुरुषोत्तमा ॥ पाहेकासवदृष्टी ॥४३॥

प्रसाददानानमो ॥ नमोपरमपुरुषानमो ॥ ध्यानांतरगमो ॥ तुझ्याचरणीकेशवा ॥४४॥

अग्र्यनियंतानमो ॥ अनित्यानित्यधर्मो ॥ वैकुंटगुणग्रामो ॥ नमोनमस्ते ॥४५॥

अनादृश्यदृश्यमाना ॥ दृश्यादृश्यनित्यध्याना ॥ सुखरूपजगज्जीवना ॥ नारायणातुजनमो ॥४६॥

दीप्तादीप्तअदृश्य ॥ जीवनींदिसेतसादृश्य ॥ जीवमयहेभास ॥ तुजनमोस्वामी ॥४७॥

परमपरब्रह्मा ॥ आदिब्रह्मातूरामा ॥ भक्तालागीविश्रामा ॥ नमोस्वामी ॥४८॥

नमोनमोएकतत्वा ॥ बाह्यमुद्राशुद्धसत्वा ॥ योगारूढपदतत्वा ॥ सबाह्यपावसीतुजनमो ॥४९॥

वेदादिपरमवक्ता ॥ वेदादितूचिकर्ता ॥ तुजवाचोनिसर्वसत्ता ॥ नदेखोआणिक ॥५०॥

ज्योतिर्मयरूपतुझे ॥ सर्वतत्वतूचिबीज ॥ नमोतुजसहज ॥ पुढतीपुढतीनमोनमो ॥५१॥

परब्रह्मपरात्पर ॥ परत्वपरमसार ॥ परमगुह्यपरमविचार ॥ नारायणातुजनमो ॥५२॥

दिघडविघडसुघड ॥ जडाजड अवघड ॥ द्वैताद्वैतजोड ॥ कर्ताकार्यतुजनमो ॥५३॥

संख्याविरहितजीवना ॥ असंख्यजीवपाळणा ॥ नमोतुजसंजीवना ॥ पुंडलीकधनापांडुरंगा ॥५४॥

निर्गुणासगुणरूपा ॥ देवाधिदेवातूसोपा ॥ तुझीझालियाकृपा ॥ नमनबापातुझेचरणी ॥५५॥

नमोनमोतारका ॥ तुब्रह्मनामविशेषा ॥ नमोतुजवाचूनसंखा ॥ योगियासीपैनाही ॥५६॥

युगादिजनत्रय ॥ युगयोगयोगमय ॥ हेतुजपासावहोय ॥ ऐशियातुजनमो ॥५७॥

नमोनमोपरम ॥ नाहीतुजसम ॥ ऐसापरापश्यंतीनेम ॥ वदलियाचारी ॥५८॥

चहूमुक्तीपरता ॥ पंचमजोनिजसखा ॥ षण्मार्गगुणसत्वा ॥ ग्रासनकरीतीतुजनमो ॥५९॥

विद्वद्वंदचिद्विलासा ॥ भानुबिंबामतिप्रकाशा ॥ नमोतेजसेतेजसा ॥ आदिसूर्या ॥६०॥

ऐसाचहूग्रंथींचाक्लेश ॥ वाउगाचिवाहेसोस ॥ त्रिगुणातिमिर असोस ॥ तोतूसत्यांशतोडीमाझा ॥६१॥

साहीनाहीचक्रभ्रमे ॥ वाहतोइंद्रियांचीग्रामे ॥ अडखळोनिसाहीमे ॥ नयेऐसेकरीनमो ॥६२॥

बाध्यबाधाकर्माची ॥ सर्वसत्तायाभ्रमाची ॥ नमनकरूनियातुमची ॥ तुम्हाअर्पिलीस्वामी ॥६३॥

यमधर्माचियासत्ता ॥ कर्मधर्माचियापंथा ॥ कर्मधर्मतोविधाता ॥ ऐसामीतोतुजअर्पिला ॥६४॥

दशमसमान ॥ इडापिंगलासुषुम्ना ॥ साहीचक्रेकर्षून ॥ तुझीतुजअर्पिली ॥६५॥

मनपवनयोगधारण ॥ तुर्यासीपैकारण ॥ समतुकेअवघेगुण ॥ तुझेचरणीक्षेपिली ॥६६॥

हेभूतभौतिकप्रचंड ॥ जन्म उत्पत्तीचेअखंड ॥ जन्मजुगादिब्रह्मांड ॥ खंडविखंडतूजाणता ॥६७॥

प्रचुरचर्याचित्ताची ॥ धावनवळणाआकुंचनाची ॥सुलभतेचमत्काराची ॥ तेहीअर्पणतुजसदा ॥६८॥

निर्वासनावासनायुक्त ॥ गुंफलेराहिलेतेथिचेतेथे ॥ तेथेतूधावोनिअगत्य ॥ सोडवीवासनामय ॥६९॥

तुझियाविचारबोला ॥ बोलीनमिळेव्यर्थगेला ॥ तोमीजाऊनिसमाखिला ॥ मगलागलातुझ्यापंथी ॥७०॥

नित्यधर्माचियाओळी ॥ चळल्याचुकल्याकोणचाळी ॥ त्यासीवेदतुझापाळी ॥ त्यासांभाळीपरब्रह्मा ॥७१॥

श्रुतिस्मृतीचीवचने ॥ समचातुर्यपरमगहन ॥ त्यांचेअंगिकारामार्गस्थान ॥ तेनारायणअंगीकारवी ॥७२॥

उदंडविदंडवितंड ॥ देहद्वयाचेअभंड ॥ जेजेदिसेअंडअंड ॥ तेभुचंडसांभाळी ॥७३॥

देहभरणाचीममता ॥ देहपोषितीनिजसत्ता ॥ त्याहीवरीलसूक्ष्मता ॥ तीकृपावंतासांभाळी ॥७४॥

तिमिरत्रिगुण अवघे ॥ जेजेआलेअसेलवोघे ॥ तेतेमीनेघे ॥ सकळवेगेसांभाळी ॥७५॥

योनिच्याकष्टा ॥ वरीवासनाहोत्याभ्रष्टा ॥ त्यात्याकरूनियाप्रविष्टा ॥ रतलोतुझेचरणी ॥७६॥

विद्यावयेसानुकूळ ॥ जन्मकर्माआचारशीळ ॥ गेलेआलेविव्हळ ॥ तूदयाळसांभाळी ॥७७॥

नानाजन्म अवतार ॥ नानाशाखांचेनिर्धार ॥ नानागोत्र उच्चार ॥ तुझाविचारतूजाणसी ॥७८॥

आठवेदांचीवचने ॥ शास्त्रदृष्टीअवलोकने ॥ कीर्तनीगुणवानणे ॥ तेतेनारायणेअंगिकारावी ॥७९॥

तवडीचेब्रह्मांड ॥ मीनम्हणेअंडांड ॥ खंडकरूनिविखंड ॥ प्रचंडमीतुजसीबोले ॥८०॥

रोमरंध्रीअनंतब्रह्मांड ॥ सकळविराटमयखंड ॥ ऐसीमहद्‍ब्रह्मेप्रचंड ॥ तुझेअंगीदातारा ॥८१॥

तूविश्वरूपाचीघडी ॥ तारकब्रह्मांडाचीउघडी ॥ म्यानिजदृष्टीनेचोखडी ॥ तुझीमूर्तीन्याहाळिली ॥८२॥

तीनसुटेनिजकळे ॥ एर्‍हवीहेनाकळे ॥ तुझियाकृपागुणेआकळे ॥ तुझियादासानिजभक्ता ॥८३॥

अनंतनामाचासंकेत ॥ मनमुरालेजेथेनिर्धात ॥ तूपुण्यपरमअद्भुत ॥ परमानंदा ॥८४॥

गुणाग्रगोसावीराम ॥ गुणसमुद्रतूराम ॥ सकळभूताचाविश्राम ॥ तुजनमोस्वामिया ॥८५॥

नमनकेलियाविभूती ॥ चित्तरमलेझालीविश्रांती ॥ तुजदेखिलियाश्रीपती ॥ नराहेचित्तीतळमळ ॥८६॥

नमनहेचिथोरदिसे ॥ येरवीतेसाकारभासे ॥ देखिलेतितुकेभासेनासे ॥ नैश्वराऐसेश्रुतिबोले ॥८७॥

नमनहेचिपरम ॥ नमनहेचितूवर्म ॥ नमनहेचिआत्माराम ॥ करूनिघाली ॥८८॥

नमनहाचिअनुभव ॥ नमनहाचिमुख्यभाव ॥ नमनहाचिपैदेव ॥ देवाधिदेवतूसोपा ॥८९॥

नमनहेचिश्रेष्ठपीठा ॥ नेतसेतुझियावाटा ॥ तुजऐसाश्रेष्ठा ॥ मगयावाटाकायकरविया ॥९०॥

नमनहेचितारक ॥ नमनहाचिविवेक ॥ नमनावीणत्रिलोक ॥ आडमार्गेरिघताती ॥९१॥

नमनलटकेनोहेनोहे ॥ नमनभलतीयासीनसाहे ॥ जैसाह्यसखाहोये ॥ श्रीगुरुनिवृत्ती ॥९२॥

नमनाएवढामंत्र ॥ नाहिनाहिधुंडिताशास्त्र ॥ विचारिताक्षणमात्र ॥ तोचिजाणेयेथीचे ॥९३॥

नमनकरीब्रह्माश्रेष्ठ ॥ नाभिकमळीधरीवैकुंठ ॥ नमनकरीनीळकंठ ॥ तीर्थेमस्तकीवंदिती ॥९॥

इंद्रचंद्रमहिंद्रथोर ॥ नमनेविणनश्वर ॥ अंडामध्येचराचर ॥ नमनेवीणनतरती ॥९५॥

श्रीगुरुकृपाजैहोय ॥ तैनमनाचीसोय ॥ पावनसुगमउपाय ॥ नमस्तेतुजनमो ॥९६॥

नमस्तेनमस्तेनमस्ते ॥ पुढतीपुढतीनमस्ते ॥ समाधिसुखअरते ॥ नमोनमनकरिता ॥९७॥

नमोनमोआदिपीठा ॥ शिवादिगुणवरिष्ठा ॥ येथेयेवोनिवैकुंठपीठा ॥ समाधिसेजघातली ॥९८॥

महाविष्णुतूयोगरूपा ॥ महारूपाचियाआदिरूपा ॥ महादित्याअमूपा ॥ कोटिसूर्यतेजसा ॥९९॥

शंखचक्रानेमंडित ॥ करकमळतुझेमिरवित ॥ पदकह्रदयावरीशोभत ॥ आणिश्रीवत्सलांछन ॥१००॥

अनंतबाहूंचामेळ ॥ तोतूचतुर्भुजगोपाळ ॥ मुगुटविराजिततेजाळ ॥ कंठीसूर्याहूनप्रभा ॥१॥

पीतांबरमाळकंठी ॥ सर्वांगीचंदनाचीउटी ॥ हिरेमाणिकेकटितटी ॥ आणिककिरणेफाकती ॥२॥

क्षुद्रघंटिकांचीओळी ॥ घनघनाटतयातळी ॥ देहुडापाउलीनिश्चळी ॥ वेणुवाजविसीसुस्वरे ॥३॥

रुणझुणरुणुझुणु ॥ ऐसावाजविसीवेणु ॥ तोतूप्रत्यक्षनारायणु ॥ अलंकापुरीनांदसी ॥४॥

सभोवतेगोपाळतुजे ॥ तेअंतरंगसखेमाझे ॥ पुंडरीकतरीसहजे ॥ प्राणसखापैमाझा ॥५॥

ऐसाज्ञानउद्‍बोधबोले ॥ ज्ञानेअज्ञाननिरसिले ॥ विज्ञानहीहरपले ॥ दृश्यदृष्टेनसी ॥६॥

बापरखुमादेवीवर ॥ समाधीदेउनिस्थिर ॥ वरीठेवूनिअभयकर ॥ वरदेऊनिराहिला ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 2


वसन्तसेना
डिटेक्टिव्ह अल्फा आणि 'देखावा'
श्रीनारदपुराण - पूर्वभाग
मंत्रसाधना : इच्छापूर्ति
नवरात्रोत्सव
हर हर महादेव- भाग ४
मंत्रसिद्धि - अपने ख्वाब पूर्ण करे इन मंत्रो से
इच्छापूर्ती शाबरी मंत्र
ओवी गीते : समाजदर्शन
साईबाबांची उपासना
महिन्यांची नावं कशी पडली?
साई बाबा स्तोत्र
संत मुक्ताई
तुकाराम गाथा
अष्टविनायक