ऐसेबोलोनिपांडुरंगा ॥ आणिलेदिव्यप्रावर्णसर्वांग ॥ दिलेअलंकारअव्यंग ॥ हिरेमोतीसुरंगलेवविले ॥१॥

धन्यजन्मलेभूमंडळी ॥ कीर्तनीनाचतीगदारोळी ॥ तोविष्णुसन्निधसर्वकाळी ॥ ऐसेवनमाळीबोलिले ॥२॥

राहीरुक्मिणीसत्यभामा ॥ विचारितीपुरुषोत्तमा ॥ बहुत अगाधयेथींचामहिमा ॥ असेसर्वोत्तमावरिष्ठ ॥३॥

म्हणेविठोजववरीधरा ॥ तववरीसमाधीधीरा ॥ हरिकीर्तनकरितीसैरा ॥ वंशपरंपराउद्धरिला ॥४॥

आणिमूळपीठशिवाचे ॥ हेचिपूर्वस्थान अगस्तीचे ॥ जाणोनिजन्मझालेचौघांचे ॥ सर्वक्षेत्रांचीआदिभूमी ॥५॥

पूर्वकल्याणयुगायुगी ॥ आणिकपुण्यजोडिलेप्रसंगी ॥ तपतपिन्नलेमहायोगी ॥ शुद्धवीतरागीयासाठी ॥६॥

येथेरामकृष्णकथा ॥ करीजोशुद्धभावार्था ॥ नपावेतोभवव्यथा ॥ संसारसर्वथानबाधी ॥७॥

आणितप्तद्वीपनवखंड ॥ गणितकेलेअवघेब्रह्मांड ॥ त्याहूनपुण्य अखंड ॥ येथेजीवासी ॥८॥

ऐसेउत्तमाउत्तमथोर ॥ सकळजीवांचेमाहेर ॥ नामेतरतीसचराचर ॥ दिलावररुक्मिणी ॥९॥

नामाम्हणेदेवराव ॥ महिमासांगतसेभाव ॥ धन्य अलंकापुरीगाव ॥ आदिठाववरिष्ठ ॥१०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 2


वसन्तसेना
डिटेक्टिव्ह अल्फा आणि 'देखावा'
श्रीनारदपुराण - पूर्वभाग
मंत्रसाधना : इच्छापूर्ति
नवरात्रोत्सव
हर हर महादेव- भाग ४
मंत्रसिद्धि - अपने ख्वाब पूर्ण करे इन मंत्रो से
इच्छापूर्ती शाबरी मंत्र
ओवी गीते : समाजदर्शन
साईबाबांची उपासना
महिन्यांची नावं कशी पडली?
साई बाबा स्तोत्र
संत मुक्ताई
तुकाराम गाथा
अष्टविनायक