विक्रमादिल्याने हट्ट सोडला नाही. तो जाडाजवळ गेला, प्रेत खांद्यावर काढून घेतले आणि नेहमीप्रमाणे मौनपणे स्मशा- नाच्या दिशेने चालू लागला. तेव्हा प्रेतात बसलला वेताळ त्याला म्हणाला-"राजा, तू कोणाला तरी वचन देऊन ते पालन करण्यासाठी इतके पष्ट सहन करोत आहेस असे वाटते आहे. परंतु गत्यंतर नसल्यान मगध देशाचा राजा वीरसिंह याला आपल वचन मोडावे लागले होते. त्याची गोष्ट मी तुला सांगतो. लक्ष देऊन ऐक." असे सांगून बेताळ गोष्ट सांगू लागला. राजा वीरसिंह युवराज असतांना नित्य शिकारीला जात असे. एकदा तो शिकारीला गेला असता तहान लागल्यावर एका सरोवराच्या काठी गेला. तेथे त्याला एक रानटी जातीची तरुण युवती स्नान करीत असलेली दिसली. तिने मौंदर्य

 

पाहून वीरसिंहाच्या मनात तिच्याशी लग्न करण्याची इच्छा उत्पन्न झाली त्याने तिला विचारले-"तू अरण्यवास करते आहेस, हे बरोबर दिसत नाही. तू एक राज- महिषी होण्यालायक आहेस. तू माझ्याशी लग्न केलेस तर मी तुला आपली पट्टराणी करून घेईन." ती म्हणाली-" मी एका अटीवर तुमच्याशी लग्नाला तयार आहे. माझ्या पोटी जो मुलगा जन्मेल त्यालाच तुमच्या मागे गादी मिळाली पाहिजे." त्या गोष्टीस वीरसिंहाने होकार दिला. त्याने तिच्याशी विवाह केला आणि तिच्या महालातच राहू लागला.

 

भागविण्यासाठी गेला. तेथे त्याला पहिल्या तरुण युवतीपेक्षा जास्त सुंदर वा स्नान करीत असलेली दिसली. तिच्याशी लग्न करून घेण्याची इच्छा त्याच्या मनात उपजली. त्याने तिला तसे विचारले व तिने, तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुला- लाच गादी दिली पाहिजे, या अटीवर विवाह करून घेण्यास होकार दिला. तिला तसे वचन दिले आणि विवाह करून तिच्या महालात राहू लागला. पुढे काही दिवसांनी तो पुन्हा त्याच अरण्यात शिकारीला गेला. तहान भाग- विण्यासाठी पुन्हां त्याच सरोवरावर गेला असतां त्याला पहिल्या दोषीपेक्षा जास्त सुंदर अशी रानटी जातीची एक स्त्री स्नान करीत असलेली दिसली तिच्याशी सुखा विवाह करून घेण्याची इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली तिने तिच्य पोटी जन्माला येणान्या मुलालाच गादी मिळाली पाहिजे ही अट घातल्यावर राजाने ती अट मान्य करून तिच्याशी विवाह करून घेतला आणि काही काळ तिच्या महालात राहला. पुढे पुन्हा एकदा तो त्याच जंगलात शिकारीला गेला असतां तहान भागविण्या- साठी त्याच सरोवरावर गला तेथे त्याला

 

पेक्षा ही जास्त सुदर होते. परंतु त्याने ती लग्नाला तयार आहे का, असा प्रश्न न विचारतां विचारले-" कोण ग बाई तू? येथे एकटी को बसली आहेस?" माझ्या तिषी मोठ्या बहिणी एका- मागून एक, मला काही सांगितल्याशिवाय कोठे तरी निघून गेल्या आणि मी एकटी मागे राहिल्ये. आता मला काय करावे, कळत नाही." ती म्हणाली. त्याच्या तिघी बायकाच तिच्या मोठया बहिणी असल्या पाहिजेत हे ओळखून तो तिला राजवाड्यात घऊन गेला आणि तिच्याशी लग्न करून घेतले त्यानंतर वीरसिंहाचा राज्याभिषेक झाला, त्याच्या चौधों राण्यांना एकेक मुलगा झाला. चारही मुले दोषा बहिणीचीच होती तरी चयथा मुलगा आपल्या इतर भावां- पेक्षा प्रत्येक बाबतीत निराळाच होता. तो त्यांच्याबरोबर कधीच रहात नसे. तो बापापासूनही दूर दूरच राही. तो नेहमी रानात जाऊन आपल्या आईच्या जातीच्या लोकांमध्येच जास्त मिसळून राही. तिघे मोठे नेहमी बापाच्या सेवेला हजर रहात. तिघांपैकी कोणी तरी राजा होणार

 

हे समजून मंत्री, प्रधान वगैरे तिघांना खूप ठेवण्याचा प्रयत्न करीत. ते मंत्र्याने सांगि- तल्याप्रमाणे वागत. चवथामात्र राजाने सांगितलेले काम स्वतः न करता दुसन्या कोणाकडून करवून घेई. मध्यंतरी एक विचित्र गोष्ट पडली जगली जातीच्या लोकांनी चवथ्याला आपला नायक म्हणून निवडले आणि त्यालाच जंगलाचा राजा म्हणून घोषित केलं राजाला उतारवय येऊ लागल तेव्हा प्रधानाने, चौघां मुलांपैकी कोणाला तरी आपला बाररा करून घ्यावे असे सुचविले. राजाने जंगलात जाऊन आपल्या चवथ्या मुलाला बोलावून आणून त्यालाच आपला

 

वारस म्हणून जाहीर करून युवराज्यपद दिले. येथवर गोष्ट सांगून वेताळाने राजाला विचारले-" राजा! मला हे नाही कळत की नीरसिंहाने आपल्या तिपा राण्यांना दिलेले वचन का मोडले? तिचे मोठे राजकुमार कधी त्याच्या आज्ञेबाहेर नव्हते. परंतु त्यांच्या पैकी एकालाही आपला वारस न करून घेता, नेहमी वफिकीरवृत्तीने राहणान्या बंडखोर मुलालाच युवराज्यपद का दिले? या शंकांचे समाधानकारक उत्तर माहीत असून तू दिले नाहीस तर, तुला माहीतच आहे, तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायांवर लोळू लागतील." विक्रमादित्य म्हणाला-" राजाने आपल्या चवथ्या मुलाला युवराज्यपद दिले, त्यात नवीन वचनभंग असा झाला नाही. तिमा राण्यांना तो एकच वचन देत गेला, तेव्हाच वचनभंग झाला होता. मोहवश बिलेली वचने होती ती आणि रानटी जातीच्या स्त्रियांना दिलेली वचने ती. राजकन्यांना

 

राजकुमारात राज्यकारभार संभाळण्याची योग्यता नव्हती, फक्त 'हाजी' ' हाजी' करण्याचीच योग्यता त्यांच्यात होती. राजाने किंवा मंत्र्याने सांगितलेली कामे ते डोळे मिटून करीत. परंतु चवथ्यात राजपुरुषाला शोभेसे गुण होते. बापाने सांगितलेले काम करण्याची योग्यता कोणात आहे हे ओळखून त्याला ते काम करण्यास चवथा सांगत असे. तो स्वतंत्र विचारांचा राजकुमार होता. त्याने ते गुण ओळखून रानटी जातीच्या लोकांनी त्याला आपला राजा करून घेतले होता. या सर्व गोष्टीचा विचार करून त्याला युवराज्यपद देऊन वीरसिंहाने काही चूक केली असे नाही वाटत." अशा त-हेने राजाचे मौन अंग होलाप वेताळ प्रेतासह अदृश्य झाला आणि पुन्हां झाडाला जाऊन लोंबकळू लागला. (कल्पित)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel