उठा उठा हो वेगेंसी ।
चला जाऊं पंढरीसी ।
भेटों विठ्ठ्ल-रखुमाईसी ।
त्रिविधताप हरतील ॥ ध्रु. ॥

चंद्रभागे करु स्नान ।
घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन ।
तेणे मन निवेल ॥ १ ॥

गंगा यमुना सरस्वती ।
क्रुष्णा वेण्या भागिरथी ।
तुंगभद्रा भोगावती ।
येती श्रीपतिदर्शना ॥ २ ॥

तापी नर्मदा कावेरी ।
पंचगंगा गोदावरी ।
स्नाने केलिया बाहेरी ।
महादोश हरतील ॥ ३ ॥

रामानंदाचे माहेर ।
क्षेत्र नाम पंढरपूर ।
माता पिता विश्र्वंभर ।
पैलपार तरतील ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel