रातराणीच्या सुगंधासवे स्वपन पडे
शाश्वत गंधापरि विरुन जाते क्षणी
व्यथा मनीची उरे का डोळ्यात मग पाणी भरे ||
विश्वासाची फुले वेचता वेचता हळुवार
आयुष्य फुलता फुलता नकळत कोमेजते
व्यथा मनीची उरे का डोळ्यात मग पाणी भरे||
निशब्द सारा आसमंत परि नाद त्या गंधाचा
अलगद चालता चालता मनाला जागवते
व्यथा मनीची उरे का डोळ्यात पाणी मग भरे||
ती बहरते भारते जना गंधरुपी सुगंधाने
भासे सारे क्षणभंगुर ते अविश्वसनीय जग स्वपनी
का हा घाट सोहळा रंगे मनी मग स्वपनाचा
व्यथा मनीची उरे का डोळ्यात मग पाणी भरे||
व्हा आशवस्त क्षणांनो त्या स्वपनीच्या
बहर येईल तो आनंदाचा मुग्ध करील
मनीच्या आसवांना व्यथेच्या कोंदणातुनि
गाऊनी गाथा आनंदाने मग डोळ्यात पाणी उरे!!
© मधुरा धायगुडे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.