या पुस्तकात अनेक पुरावे दिले आहेत, ज्यावरून असे सिद्ध होईल की श्री हनुमान एक महान विद्वान, ब्रह्मचारी, शक्तिशाली पुरुष होता, परंतु आपल्याच बांधवांनी त्याला माकड घोषित केले आहे. ज्या धर्माचा किंवा देशाचा इतिहास नष्ट झाला किंवा बिघडला, तो देश किंवा धर्म टिकू शकत नाही, ते निश्चितच विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, हे लक्षात घ्या.

हनुमान हा माकड नव्हता, हनुमान ज्याला महावीर जी असेही म्हणतात त्याचे हिंदू समाजात विशेष स्थान आहे. श्रीरामासोबतच ते रामायणातील एक मुख्य पात्र आहे. जर रामाला हनुमानाची मदत मिळाली नसती तर रामाला सीतेचा शोध घेणे शक्य झाले नसते आणि श्रीराम रावण युद्धात श्रीरामाचा विजय संशयास्पद ठरला असता.

लक्ष्मणाच्या पतनानंतर, संजीवनी वनौषधी शोधून परत आणणे आणि लक्ष्मणाला पुनरुज्जीवित करणे हे सर्व हनुमानाच्या प्रयत्नांचे फळ होते, अन्यथा श्रीरामांना लक्ष्मणाच्या जगण्याची आशाच नव्हती.

हनुमान सीतेला शोधण्यासाठी एकटाच लंकेला गेला, तिथे रावणाकडे कैद झाला आणि नंतर  संपूर्ण लंकेत खळबळ माजवली, ज्याचे वर्णन कवींनी आपल्या भाषेत आग लावणे असे लिहिले आहे. यातून हनुमानाच्या शौर्य, तग धरण्याची क्षमता, राज्यकर्तृत्व, हुशारी आणि शारीरिक ताकद यांचा अद्भुत पुरावा सादर मिळतो आणि म्हणूनच हनुमान भारतीय आर्य वंशामध्ये अत्यंत आदरणीय आहे.

त्याच्या मूर्ती आणि चित्र या देशात सर्वत्र प्रतिष्ठेने स्थापित केली जातात आणि त्यांची पूजा केली जाते. त्याच्या ब्रह्मचर्याच्या महान कथा मुलांना सांगून, त्यांच्यावर संस्कार केले जातात. संस्कृत साहित्यात त्याला एक महान आदित्य ब्रह्मचारी म्हणून आदराने स्मरण केले जाते. संस्कृत आणि इतर भाषांमधील रामायणे हनुमानाच्या शौर्याच्या कथांनी ओतप्रोत भरलेल्या आहेत.

म्हणजे तात्पर्य असे की महावीर हनुमान हे आर्य जातीतील एक महान आदरणीय आणि अनुकरणीय चारित्र्यवान महापुरुष आहेत आणि संपूर्ण समाज त्यांना आपला पूर्वज म्हणून अभिमानाने स्वीकारतो.

महावीर हनुमानाचे कोणतेही चरित्र स्वतंत्रपणे लिहिले गेले नाही. त्यांची काही छोटी चरित्रे एक दोन ठिकाणांहून छापली गेली, पण ती अपूर्ण आहेत किंवा विशेष अभ्यासपूर्ण नाहीत

पुराण वाङ्मयातही अनेक पुराणिकानी हनुमानाविषयी विविध प्रकारचे परस्परविरोधी तपशील मांडले आहेत, ज्यामध्ये हनुमानाचे जीवन उजळण्याऐवजी कलंकित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर ती वर्णनेही बुद्धीला इतकी ण पटणारी आहेत की ती वाचून त्या लेखकांच्या बुद्धीची कीव येते.

तुलसीदासांनी स्पष्टपणे हनुमानाला "कपी" संबोधून माकड घोषित केले आहे तर इतर रामायण लेखकांनी त्याला वैदिक आदर्शांनी ओतप्रोत असलेला एक महामानव म्हणून संबोधलेआहे. सर्व प्रथम हनुमानाच्या उत्पत्तीसंबंधी आम्ही विविध पौराणिक ग्रंथांचे काही तपशील उद्धृत करतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel