अरयश्च मनुष्येण विज्ञेयाश्छद्म चारिणः ।।२२।।

(वाल्मिकि रामायण किष्किन्धा काण्ड सर्ग २)

अर्थ

सुग्रीवाने स्वतःबद्दल सांगितले की, कपटाच्या वेषात फिरणाऱ्या शत्रूंमधला फरक मानवाला कळला पाहिजे. , सुग्रीवाने स्वत:ला मानव म्हणून घोषित केल्याने वानर (म्हणजे वनात राहणारे) नावाची त्याची मानवाची जात होती हे सिद्ध होते.

 

सुग्रीवाचे सिंहासन

ततः सुग्रीवमासीन कांचने परमासने ।

महार्हास्तरणोपेते ददर्शा दित्य यन्निभम् ।। ६३।।

(वाल्मिकि रामायण किष्किन्धा काण्ड सर्ग ३३)

अर्थ

राजा सुग्रीव एका सुंदर सुवर्ण सिंहासनावर बसला होता. आणि त्यावर एक सुंदर वस्त्र  अंथरुन ठेवले होते.

 

सोन्याची भांडी

अप: कनक कुम्भेषु निधाय बिमला जलः ।

शुभंऋषभश्रृन्गश्च कलशश्चैव कांचनेः ।।३४||

अभ्यषिन्चन्त सुग्रीवं प्रसन्नेक सुगन्धिना ||३५।।

सलिलेनसहस्त्राक्ष बसवावासवं यथा ॥३६||

(वाल्मिकि रामायण किष्किन्धा काण्ड सर्ग २६)

अर्थ

सोन्याच्या कलशात पवित्र पाणी भरून, जसे वसुगण इंद्राला स्नान घालतात. त्याप्रमाणे वानर  वनवासी सुग्रीवाला सुगंधी पाण्याने स्नान घालतात

 

सोन्याच्या छत्र्या आणि झुंबर

तस्य पाण्डुरमाजुह्रश्छ–हेमपरिष्कृतम् । –

शुक्ले च वाल ब्यजने हेमदण्डेयशस्करे ||२३||

(बाल्मिकी रामायण किष्किन्धा काण्ड सर्ग २६)

अर्थ

सुग्रीवाचा राज्याभिषेक झाला तेव्हा काही वानरांनी त्याच्यावर सोन्याचे छत्र धरले होते आणि काहींनी सोन्याची काठी, झुंबरे आणि पंखा धरला होता.

वरील काही पुराव्यांवरून हे सिद्ध होते की वानर जाती शब्दश: माकडे नव्हती, ती माणसं होती, ते दागिने आणि कपडे घालत, राजसिंहासनावर बसत, सोने वापरत असत. माकडांना यापैकी कशाचीही आवश्यकता नसते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel