श्रीशिवबांची माय जिजाई महाराष्‍ट्राची शान

हिच्या यशाचे, पराक्रमाचे गाऊया जयगान !

मूर्तिमंत ही तेज प्रसवली तेजवती माता

शककर्त्याला काळ म्हणे ’त्या’ -तू युगनिर्माता

मंगला, स्वातंत्र्याचे पावन अर्पी दान

श्रीशिवबांची माय जिजाई महाराष्‍ट्राची शान !

शिवरायांच्या बालमनावर करिता संस्कार

युगायुगांचे स्वप्न मराठी झाले साकार

देशासाठी जळत राहिली ज्योती हीच महान

श्रीशिवबांची माय जिजाई महाराष्‍ट्राची शान !

स्वतंत्रतेचे सूर घुमवुनी शिवबांच्या कानी

साधीभोळी माय मराठी झाली रणराणी

या तेजाने शतकोटींचे फुलोत पंचप्राण

श्रीशिवबांची माय जिजाई महाराष्‍ट्राची शान !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel