आवडती भारी मला माझे आजोबा

पाय त्यांचे थकलेले गुडघ्यात वाकलेले

केस सारे पिकलेले ओटीवर गाती गीता

माझे आजोबा

नातवंडा बोलावून घोगर्‍याशा आवाजानं

सांगती ग रामायण मोबदला पापा घेती

माझे आजोबा

रागेजता बाबा-आई आजोबांना माया येई

जवळी ते घेती बाई कुटलेला विडा देती

माझे आजोबा

खोडी करी खोडकर आजोबांची शिक्षा थोर

उन्हामध्ये त्यांचे घर पोरांसंगे पोर होती

माझे आजोबा

गीत - ग. दि. माडगूळकर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel