१८८०
"मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला.
त्याने फक्त एका नमावर पूर्ण निष्ठा ठेवली. त्याचे फळ म्हणून ही योग्यता त्याला प्राप्त झाली."
श्री उज्जैनला काही दिवस राहिले. श्री तेथे आहेत हे समजताच जीजीबाई तेथे आली व श्रींना मोठया हटटाने आणि आग्रहाने इंदूरला घेऊन गेली. पूर्वीचा गवळी श्रींना तेथे भेटला. त्याने सत्तरी ओलांडली होती व त्याची बायको पण वारली होती. एकदा श्रींना त्याने आपल्या घरी नेले, त्यांची पूजा केली व म्हणाला, "महाराज, मला आता किती दिवस ठेवणार ? आपल्या हाताने या देहाची राख व्हावी अशी इच्छा आहे." त्यावर श्री म्हणाले, "राम तुझी इच्छा पूर्ण करील." नंतर एका आठवडयाने पहाटे चार वाजता श्री उठले व भर थंडीत उघडेच गवळ्याच्या घरी गेले, तो जागा असून श्रींचीच मानसपूजा करीत आपल्या अंथरूणावर बसला होता, मानसपूजा करीत आपल्या अंथरुणावर बसला होता, मानसपूजेत त्याने घटट दही श्रींच्यासमोर ठेवले व ’श्री आत्ता असते तर किती बरे झाले असते ! असा विचार त्याच्या मनात आला तोच श्रींची स्वारी प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभी राहायला एकच गाठ पडली. त्याच्या खांद्यावर हात ठेवून श्री म्हणाले, "माझे दही कुठे आहे ते आण बघू !" त्याने डोळे उघडले तर आपल्या डोळ्यांवर त्याचा विश्र्वासम बसेना. मोठया आनंदाने श्रींना त्याने आपल्या अंथरुणावर बसवले व आपली खरी पूजा ग्रहण करण्याची विनंती केली. सूर्योदय झाल्यावर त्याच्या मुलाने श्रींना स्नान घातले. नंतर श्रींनी स्वतः गवळीदादाला स्नान घातले. स्नान आटोपल्यावर त्याने श्रींची अगदी मनापासून पूजा केली. त्यांना घटट दह्याच नैवेद्य दाखवला. श्रींनी थीडे दही तोंडाला लावले, थोडेसे गवळीदादाला म्हणाले, "भगवंताने तुझा प्रपंच आता कडेला लावला आहे, त्याच्यापाशी मागण्यासारखे आता काही उरले नाही. म्हणून त्याच्या चरणावर मस्तक ठेवावे आणि त्या चरणांसकट ते उचलावे," तेव्हा "जी महाराज " असे बोलून गवळीदादाने श्रींच्या पायावर डोके ठेवले व पुन्हा वर उचललेच नाही. श्रींचे त्याला मांडीवर घेतला, त्याच्या कुडीतून प्राण निघून गेले होते. श्रीने त्याच्या मुलांना व इतर मंडळींना सांगितले, "गवळीदादा गेल्याचे दुःख करू नका, मोठमोठया तपस्व्यांना साधणार नाही असा अंतकाळ त्याने साधला आहे. त्याने फक्त एका नामावर पूर्ण निष्ठा ठेवली. त्य निष्ठेचे फळ म्हणून ही योग्यता त्याला प्राप्त झाली. माझ्यावर त्याचे खरे प्रेम होते." श्रींनी स्वतः आपल्या हाताने त्याची उत्तरक्रिया केली व अस्थि गंगेमध्ये टाकल्या. श्री जीजीबाईकडेच राहत हेते. त्यावेळी जीजीबाईची मुलगी ताई, हिचे लग्न होऊन ४/५ वर्षे झाली होती व तिला दिवस गेले होते. प्रकृती फार अशक्त, रक्तक्षयाची लक्षणे तिच्या ठिकाणी दिसू लागली. श्री तिला म्हणाली, "ताई, तुला श्र्वास घ्यायलाही श्रम होत आहेत, तुझ्या अंगात रक्त राहिलें नाही, मला फार काळजी वाटते." त्यावर ताई म्हणाली, "महाराज आपण माझ्याजवळ जोपर्यंत आहात तोपर्यंत मला भीती वाटत नाही, मी सारखे नामस्मरण करते." पुढे आठ दिवस गेल्यावर एके दिवशी दुपारी ताईचे पोट दुखू लागले, रात्री जोराने कळा येऊ लागल्या; तेव्हा तिने श्रींना निरोप पाठविला की, "मला लवकर सोडवा " त्यावर श्री जीजीबाईना म्हणाले, "जीजीमाय, आजमाझी कंबर फार दुखते आहे, मला पांघरायला एक घोंगडं दे." घोंगडी पांघरून श्री कण्हत बसले. तिकडे ताईच्या कळा एकदम थांबल्या. पाच मिनिटांनी घोंगडीमध्ये "टयाँ, टयाँ ’ असा तान्हे मूल रडण्याचा आवाजऐकू आला. जीजीमाय म्हणाली,"महाराज, इथे कोण रडत
आहे ?" श्रींनी घोंगडी बाजूला केली आणि म्हणाले, "ताईचे मूल इकडे कसे आले, जा लवकर तिकडे घेऊन जा." जीजीमायने मूल उचलले व सरळ ताईकडे नेले. ताई बेशुद्धच होती. तिने डोळे उघडताच पहिला प्रश्र केला "महाराजकुठे आहेत ?" ते माझ्याजवळ सारखे बसून होते. त्यांनी बाळाला माझ्या हातात दिले व मला जाग आली." श्री नंतर तिच्या खोलीत गेले व म्हणाले, "बाळ, आता तुला घाबरण्याचे कारण नाही, स्वस्थ विश्रांती घे व जमेल तेवढे नाम घे." श्रीमहाराजखोलीबाहेर आले. जीजीमायच्या डोळ्यांना आनंदाश्रू आवरेनात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel