एकदा पुरुषार्थ व भाग्य यांच्यात कोण श्रेष्ठ आहे? यावरून वाजले होते. पुरुषार्थाच्या मते परिश्रमाशिवाय काहीच प्राप्त होत नाही. मात्र भाग्याला हे मान्य नव्हते. दोघे आपापसातील वाद मिटविण्‍यासाठी देवराज इंद्राच्या दरबारी आले. त्यांचे भांडण ऐकून इंद्राला आश्चर्य वाटले. खूप विचार करून त्याला राजा विक्रमादित्याचे स्मरण झाले. इंद्राला वाटले, या दोघांमधील वाद केवळ विक्रमादित्यच करू शकेल.

इंद्राने त्या दोघांना राजा विक्रमादित्यकडे पाठवून दिले. पुरुषार्थ व भाग्य मानवरूपात विक्रमाकडे पोहचले. विक्रमकडे जाऊन या दोघांनी आपापल्या बाजू मांडल्या. मात्र दोघांचे ऐकल्या नंतर विक्रमादित्यसमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. राजाने त्या दोघांकडून दोन महिन्यांची मुदत मागितली. वादाचे मुळ शोधण्‍यासाठी राजा विक्रमने जनतेमध्ये सामान्य पुरुषाच्या वेशभुषेत हिंडणे-फिरणे सुरू केले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर राजाने एका व्यापाराकडे नोकरी केली.

काही दिवसांनी व्यापारी जहाजावर आपला माल लादून दूसर्‍या देशात व्यापार करण्‍यासाठी निघून जातो. परंतू समुद्रात मोठे वादळ येते. एका टापूला पोहचल्यानंतर तेथे त्यांनी लंगर टाकला. वादळ क्षमल्यानंतर व्यापारीने विक्रमाला लंगर उचलण्यास सांगितले. लंगर उचलताच जहाचाचा वेग अचानक वाढला व विक्रम त्याच टापूवर राहून गेला.

विक्रम द्वीपवर एकटात हिंडत होता. तेथे त्याला एक राजकुमारी भेटली. दोघांनी एकमेंकांना पसंत केले. विवाह करून राजा नव्या राणीला घेऊन राजधानीकडे निघला होता. वाटेत त्यांना एक संन्यासी भेटला. त्याने राजाला एक माळा व काठी दिली‍. माळा धारण करणारा व्यक्ती क्षणात अदृश्‍य होते व सारे काही पाहू शकतो. तसेच त्याचे सर्व कार्य सफल होते. संन्यासीने दिलेली काठी ही जादूची काठी होती. या काठीचा मालक झोपण्यापूर्वी तिच्याकडून हवा तो दागिना मागू शकतो.

संन्यासीचे आभार माणून विक्रम आपल्या राणीसह राज्यात परतला. एके दिवशी उद्याणात त्यांना एक ब्राह्मण व एक भाट भेटले. ते फार गरीब होते. तेथे ते राजाचीच वाट पहात होते. राजा त्यांना मदत करण्‍याचे ठरवून संन्यासीने दिलेली माळा भाटला व काठी ब्राह्मणाला देऊन टाकतो. अमूल्य वस्तू मिळाल्यानंतर ते राजा विक्रमाचे गुणगान करत निघून जातात.

सहा महिन्यांनतर पुरुषार्थ व भाग्य राजाकडे येऊन उभे राहतात. राजा विक्रम त्यांना म्हणाला, ''तुम्ही एकमेकांसाठी पुरक आहात.'' त्या दोघांना राजाने माळा व काठीचे उदाहरण सांगितले. ती राजाला परिश्रम व भाग्याने मिळाली होती. राजाचे उत्तर ऐकून पुरुषार्थ व भाग्य यांचे पूर्णपणे समाधान होते.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel