एकदा राजा विक्रमादित्यच्या दरबारात एक ब्राह्मण आला होता. ''राजाने राज्यात एक भव्य महल बांधला तर राज्यातील जनता सुखी होईल'', असे त्या ब्राह्मणाने राजाला सांगितले. राज्याने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन एक भव्य महाल बांधला. त्याला सोने-चांदी, हिरे व मणी-मोत्यांनी पूर्णपणे सजवून टाकले. राजा विक्रम आपल्या राजअधिकारी व त्या ब्राह्मणासह आपल्या महालात पोहचले. महालाचे सौंदर्यपाहून ब्राम्हण मंत्रमुग्ध होवून गेला. ब्राह्मणाने महालाची इच्छा प्रगट करताच राजा विक्रमादित्यने भव्य महाल ब्राह्मणाला दान दिला.

ब्राह्मणाला खूप आनंद झाला. त्याने त्याच्या पत्नीला सारी हकिकत सांग‍ितली. तो तिला महलात घेऊन आला.

एका रात्री महालात चारही बाजूंना सुगंध दरवळला होता. ब्राह्मण झोपेतून जागी झाला. स्वयं लक्ष्मीने महालात प्रवेश केला होता. ब्राह्मण दाम्पतीची कुठलीही इच्छा पूर्ण करण्‍यासाठीच देवी तेथे प्रगट झाली होती. मा‍त्र ब्राह्मण पती- पत्नी फारच घाबरले होते. देवी तात्काळ तेथून अदृश्य झाली.

ब्राह्माणाच्या पत्नीला वाटते येथे भूत येत असल्याने राजाने हा महाल आपल्या पतीला दान देऊन टाकला होता. तिने आपला बोर्‍याबिस्तार उचलला व आपल्या आधीच्या झोपडीत जाऊन राहायला लागले.

दुसर्‍या दिवशी ब्राह्मण राजभवनात आला. विक्रमादित्य राजाला महाल परत घेण्‍यास विनंती केली. मात्र राजा महान होता. दान दिलेली वस्तू परत कशी घेणार? म्हणून राजाने त्यातून एक मार्ग काढून महालाची योग्य ती किंमत लावून ब्राह्मणाला रक्कम देऊन महाल ताब्यात घेतला. रक्कम मिळाल्यावर ब्राह्मण खूष झाला व घरी निघून गेला.

ब्राह्मणाकडून खरेदी केलेल्या महालात राजा विक्रमादित्य रहायला लागला. एके दिवशी रात्री लक्ष्मी पुन्हा प्रगट झाली. लक्ष्मीने राजाला वरदान देऊ केले. पण राजाने त्याच्याकडे लक्ष्मीच्या कृपेने सर्वकाही आहे. जर द्यायचेच झाले तर सार्‍या राज्यात धनवर्षा करून टाकण्याची राजाने लक्ष्मी मातेला विनंती केली.

दुसर्‍या दिवशी संपूर्ण राज्यात धनवर्षा झाली. प्रजा सारी संपत्ती घेऊन राजाच्या दरबारात आली. मात्र राजाने सारी संपत्ती प्रजेत वाटून दिली. राजाचा दिलदारपणा पाहून प्रजा राजाचा जयजयकार करू लागली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel