एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की , " तू आपल्या मुखानेच सांग की आम्हांला तुझी प्राप्ती कशी होईल . " तेव्हा परमात्मा म्हणाला , " भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते . " भक्तीची तीन साधने आहेत - शास्त्रवचन , थोरवचन आणि आत्मसंशोधन . आपले सध्या सगळेच विपरीत झाले आहे . शास्त्रवचन म्हणावे , तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की , हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते . थोर वचन म्हणावे , तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटते , ‘ मी या गांवढळ बापाचे कसे ऐकू ? त्यापासून माझा काय फायदा होणार ? ’ तसेच आत्मसंशोधनाचे . आपण शोधन करतो ते कसले , तर पांडव कुठे राहात होते ? रामाचा जन्म कोणत्या गावी झाला ? कौरव -पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले ? मला सांगा , अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार ? एक प्राध्यापक मला म्हणाले , " मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते , निर्याणस्थळ कोणते , याची आता खात्री झाली . " मी म्हणतो की , ते करतात ते ठीक आहे . पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी , कृष्णजन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरुरी वाटली नाही ; त्यांनी दृढ उपासना करुन कृष्णाला आपलेसे केले . खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने ह्रदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे .

आपण जर आपले वर्तन पाहिले , मनातले विचार बघितले , तर आपल्याला असे आढळून येईल की , लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत ; आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो , याला काय म्हणावे ? अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार ? आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसर्‍या कुणी सांगण्याची गरजच नाही . आपल्याला तो पुरता ठाऊक असतो . अभिमान खोल गेलेला , विचारांवर ताबा नाही , साधनात आळशीपणा ; मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार ? साधुसंतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे , आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती . रामाला अगदी विनवणी करुन सांगा की , " रामा , आता मी तुझा झालो ; ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन , आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन ; तू मला आपला म्हण . ’ देव खरोखरच किती दयाळू आहे ! लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही , शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास


ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास
दासबोध
ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास
ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
आत्माराम
हरिपाठ
ज्ञानेश्वरी Dnyaneshwari