सर्वांचें राखावें समाधान । पण रामाकडे लावावें मन ॥ रामाला स्मरुन वागावे जगांत आपण । तेथें पश्चात्तापाला नाहीं कारण ॥ म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत । हा जाणावा खरा परमार्थ ॥ व्यवहार करावा व्यवहारज्ञानानें । परमार्थ करावा गुरुआज्ञेनें ॥ कलि अत्यंत माजला । गलबला चोहोंकडून जरी झाला । चित्त ठेवावें रामावर स्थिर । कार्य घडतें बरोबर ॥ स्वस्थ बसावें एके ठिकाणीं । राम आणत जावा मनीं ॥ प्रयत्नांतीं परमात्मा । ही खूण घालावी चित्ता । व्यवहारीं ठेवावी दक्षता ॥ मागील झालें तें होऊन गेले । पुढील होणार तें होऊं द्यावें भलें । त्याचा न करावा विचार । आज चित्तीं स्मरावा रघुवीर ॥ आंतबट्ट्याचा नाहीं व्यापार । ज्यानें घरीं आणला रघुवीर ॥ नुसत्या प्रयत्नानें जग सुखी होतें । तर दुःखाचें वारें न भरतें ॥ म्हणून परमात्मा आणि प्रयत्न । यांची घालावी सांगड । म्हणजे मनीं न वाटे अवघड ॥ जेथें वाटतें हित । तेथें गुंतत असतें चित्त । चित्त गुंतवावें भगवंतापाशीं । देह ठेवावा व्यवहारापाशीं ॥ चित्तीं ठेवावी एक मात । कधीं न सुटावा भगवंत ॥ राम माझा धनी । तोच माझा रक्षिता जनीं । हें आणून चित्तीं । विषयाची योग्येतेनें करावी संगति ॥

देह करावा रामार्पण । मुखीं घ्यावें नामस्मरण ॥ संताची संगति । रामावर प्रीति । तोच होईल धन्य जगतीं ॥ व्यवहार सांभाळून । करावा परमार्थ जतन ॥ राम ठेवावा ह्रदयांत । जपून असावें व्यवहारांत ॥ रामाचें चिंतन , नामाचें अनुसंधान । वृत्ति भगवत्परायण , साधुसंतास मान , । आल्या अतिथा अन्नदान , । भगवंताला भिऊन वागणें जाण , । याविण परमार्थ नाहीं आन ॥ प्रपंचांत असावी खबरदारी । मन लावावें रामावरी । त्याचा राम होईल दाता । न करावी कशाचीहि चिंता ॥ कवरंटीचें कारण । खोबरें राहावें सुखरुप जाण । तैसे आपले देहाचे संबंध ठेवून । चित्तीं असावा रघुनंदन ॥ परमार्थ करावा जतन । मन करुन रामाला अर्पण ॥ प्रपंचीं असावें सावध । कर्तव्यीं असावें दक्ष । तरी न सोडावा रामाचा पक्ष ॥ प्रयत्नांतीं परमेश्वर हे सज्जनांचे बोल । मनीं ठसवावे खोल ॥ पण आरंभीं स्मरला राम । त्यालाच प्रयत्नांतीं राम । हा ठेवावा विश्वास । सुखें साधावे संसारास ॥ कर्तव्यांत भगवंताचे स्मरण । हेंच समाधान मिळण्याचें साधन ॥ प्रयत्न करावा मनापासून । फळाची अपेक्षा न ठेवून ॥ कर्तव्यात असावें तत्पर । निःस्वार्थबुद्धि त्याचे बरोबर ॥ जोंवर देहाची आठवण । तोंवर व्यवहार करणें जतन । म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून । यश देणें न देणें भगवंताचे अधीन ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास


ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास
दासबोध
ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास
ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
आत्माराम
हरिपाठ
ज्ञानेश्वरी Dnyaneshwari