जय देव गुरुराया ।
ब्रह्मानंद हे आचार्या ॥
आरती ओवाळीतों ॥
स्वामी रघुराया ॥ धृ. ॥
अज्ञानभ्रांतियोगें ।
जगी लोपले ज्ञान ॥
प्रगटोनि जनस्थानीं ।
करुनि अज्ञानखंडन ॥
अधिकारी शिष्यजीव ।
करि ब्रह्मपरिपूर्ण ॥ १ ॥
तत्वंपदजीवेशांची छेदुनि वाच्यांश उपाधी ।
लक्ष्यार्थि साक्षिबोधें ॥
करिसि ऎक्य असिपदी अखंड स्वस्वरूपीं ॥
स्थापिसी तूं परमानंदी ॥ २ ॥
जगद्भ्रमवितर्ताचें ।
अधिष्ठान तूं साचार ॥
अनंतब्रह्मांडांचे ।
खाली मध्ये आणि वर ।
मौनी म्हणे तूंची सर्व ॥
रामा व्यापक निर्धार ॥ जय. ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.