ब्रह्मानंद सुखाचा तूं कंद बापा ।
भावातीता हरसी दासत्रयतापा ॥
अगाध महिमा तुझा कोण करी मापा ॥
मंगळधामा रामा सद्गुरु निष्पापा ॥ १ ॥
जय देव जय देव जय आलक्ष्य लक्ष्या ।
जय गुरुराज दयाघन शिश्वांतर साक्षा ॥ धृ. ॥
होउनि सकृप मूढां तूं हातीं धरिसी ।
अधनग भस्म करोनि त्यांतें उद्धरिसी ॥
स्पर्शुनिं मस्तकीपाणी त्यां ब्रह्म करिसी ।
आत्मस्वरुपा दाविसीं होउनियां आग्सी ॥ २ ॥
अग्नी काष्ठां देता अपुलें रुप जसें ।
आपण करितां प्रेमें शिष्यांलागि तसे ॥
शिष्यांचें तव स्मरणें भवभय नासतसे ।
सदैव ब्रह्मस्वरुपीं होउनि राहतसे ॥ ३ ॥
ऎसा तूं गुरुराया विश्वाचा दाता ।
सकृत होउनि कळवी मजला वेदांता ॥
महाराजा अजुनी तारि अंत किती पाहतां ।
दास म्हणे मी बुडतों काढि धरुनि हाता ॥ जय. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.