वेदां शास्त्र आणि अठरा पुराणां ।
सद्गुरुची आरती न कळे जना ॥ १ ॥
नवल गुरुरायाची धन्य आरती ।
ब्रह्मा, विष्णु रुद्र जय जय म्हणती ॥ धृ. ॥
सिद्ध मुनी ऋषी तटस्थ पाहती ।
न कळे न कळे ऎसे आम्हां बोलती ॥ २ ॥
रमावल्लभदासीं अलभ्य प्राप्ती सकळिक मिळोनि जय जय कारे गर्जती ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.