आशिष अरुण कर्ले
३२ शिराळा (सांगली)
खेळ हा लोकांमध्ये एकोपा, उत्साह, जिंकण्याची भावना निर्माण करण्यासाठी असतो. कधीकधी खेळ विरंगुळ्याचा भाग बनून जातो परंतु जेव्हा या खेळाचे व्यवसायीकरण होतं तेव्हा तो खेळ खेळ न राहता बाजार बनून जातो आणि असंच काहीसं क्रिकेटच्या बाबतीत झाल्याचे दिसून येतं....
आयपीएल मुळे क्रिकेट हा एक बाजार बनला आहे खरंतर क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखला जातो परंतु आयपीएल मुळे हा खेळ आता एक व्यवसायच बनला आहे
क्रिकेट साठी लागणारा सट्टा, मॅच फिक्सिंग या सगळ्यामुळे आयपीएलचे सामने नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आयपीएलच्या सामन्यांमुळे लोक इतर खेळाकडे दुर्लक्ष करत आहेत. आयपीएलच्या सामन्यादरम्यान कित्येक भारतीय खेळाडूंनी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली दमदार कामगिरी केलेली असते परंतु याबद्दललोकांना माहिती राहत नाही लोकांना फक्त आयपीएलचेच वेड असते. क्रिकेटच्या लोकप्रियतेपेक्षा आयपीएलसारख्या सामन्यांमुळे झालेले व्यवसायीकरणच यालाकारणीभूत ठरते.
आयपीएल च्या दरम्यान करोडो रुपयांची उलाढाल होत असते सरकारलाही या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर उपलब्ध होत असतो मात्र याच दरम्यान मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुन्हेगारीतही वाढ होत असते.
एकीकडे क्रिकेटला खेळ म्हणून जिवापाड प्रेम करणारे प्रेक्षक चाहते असतात तर दुसरीकडे मॅच फिक्सिंग, सट्टा या माध्यमातून खेळाचा फक्त बाजार मांडला जातो.
यात आयपीएलच्या सामन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात वादविवाद होत असतात लोकांमध्ये प्रादेशिकतेची भावना निर्माण होते. ही टीम जिंकणार की ती टीम जिंकणारयावरून लोकांमध्ये हाणामारीपर्यंत वाद येतात.
आयपीएल च्या काळात खेळाच्या मैदानासाठी लागणारे पाणी हा तर खूप मोठा वादाचा मुद्दा बनून जातो एकीकडे असणारा दुष्काळ आणि खेळासाठी होणारा पाण्याचाअपव्यय....
शिवाय हे सामने आणि त्यासंदर्भातील वाद-विवाद राजकारण्यांसाठी एक आयताच विषय बनून जातो...
सामन्यांच्या काळात लोकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा,पुरवले जाणारे सुरक्षा बळ सुरक्षा यंत्रणांवर येणारा ताण असे अनेक प्रश्न उपस्थित होतात...
याशिवाय हे आयपीएलचे सामने बरोबर परीक्षांच्या काळातच असतात कित्येक विद्यार्थी आय पीएलच्या पायी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात.
क्रिकेट शिवाय असे अनेक खेळ आहेत की त्यांमध्ये भारतातील अनेक खेळाडूंनी दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे परंतु क्रिकेटची वाढलेली लोकप्रियता यामुळे लोक इतर खेळांकडे दुर्लक्ष करत आहेत शिवाय त्या इतर खेळाडूंना प्रोत्साहन मिळत नाही...
इकडे आयपीएलमुळे करोडो रुपयांची उलाढाल कित्येक रुपये खर्च होत असताना दुसरीकडे मात्र अनेक खेळाडू त्यांना मिळणाऱ्या सुविधा यामुळे वंचित राहतात आता ते खूप मोठी कामगिरी करू शकले असते परंतु त्यांना मिळणाऱ्या सुविधांमुळे ते म्हणावी तशी कामगिरी करू शकत नाहीत परंतु हलाखीच्या परिस्थितीत हे खेळाडू खूप चांगले प्रयत्न करून चांगले यश संपादित करतात
राष्ट्रकुल स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त केले असते परंतु कित्येक खेळाडूंना न मिळणाऱ्या सुविधा यामुळे हवे तसं यश प्राप्त करू शकत नाहीत. किती खेळाडू तर आर्थिक मदतीअभावी खेळापासून दूर राहतात
अशा पद्धतीने आयपीएलमुळे खेळाचा बाजार मांडला गेला आहे व समाजाच्या आर्थिक सामाजिक नुकसान होत आहे अशा पद्धतीने आयपीएलमुळे खेळाचा बाजार मांडला गेला आहे व त्यामुळे इतर खेळांचे नुकसान होत आहे आयपीएल वर होणाऱ्या खर्चाऐवजी तोच पैसा इतर खेळांच्या वृद्धिसाठी वापरला तर आपल्या देशामध्ये इतर खेळही नावारुपाला येतील आणि मोठमोठ्या क्रीडास्पर्धांमध्येही आपल्या देशाचा नावलौकिक होईल...