विठ्ठला मायबापा ।
वारीं त्रिविधतापा ।
संसारी त्रासलो मी ॥
वय लागलें मापा ॥ धृ. ॥
बाळपणीं नाठविले ॥
व्यर्थ तारुण्य गेलें ॥
जरा हे दु:ख मोठे ॥
पुढे ठाकुनि आले ॥ विठ्ठला. ॥ १ ॥
भक्तीचा लेश कांही ॥
सत्यमागम नाही ॥
परिणामीं काय आतां ॥
शरण आलों तुझें पायी ॥ विठ्ठला ॥ २ ॥
हरी हरी माझी भ्रांती ॥
म्हणुनी आलो काकूळती ॥
कृपाळुबा जगन्नाथा ॥
तारी गंगाधरसूता ॥ विठ्ठला ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.